Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Fishing Boat Incident: गूढ वर्तुळामुळे मच्छिमारांमध्ये भीती! वसई समुद्रात अचानक नेमकं काय घडलं?

११ जानेवारीला एका व्हिडीओतून समुद्रात पाण्याच्या प्रवाहाचे मोठे रिंगण तयार झाल्याचे दिसून आले. या घटनेनंतर सर्वच यंत्रणा सजग झाल्या. परंतु, या घटनेस ७ दिवस होऊनही हा प्रवाह नक्की कशामुळे तयार झाला हे अद्याप अस्पष्ट आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Jan 19, 2026 | 05:27 PM
Vasai Fishing Boat Incident: गूढ वर्तुळामुळे मच्छिमारांमध्ये भीती! वसई समुद्रात अचानक नेमकं काय घडलं?

Vasai Fishing Boat Incident: गूढ वर्तुळामुळे मच्छिमारांमध्ये भीती! वसई समुद्रात अचानक नेमकं काय घडलं?

Follow Us
Close
Follow Us:
  • वसईतल्या समुद्राचे वर्तुळ ‘गुढ’ अजून कायम
  • गूढ वर्तुळामुळे मच्छिमारांमध्ये चिंता
  • पाचुबंदरमधील बोट सुदैवाने बचावली
 

Vasai Fishing Boat Incident: वसई किनाऱ्यापासून ६६ नॉटिकल अंतरावर खोल समुद्रात पाण्याच्या प्रवाहाचे मोठे रिंगण तयार झाल्याचे दिसून आले होते. परंतु, ११ जानेवारी रोजी एका व्हिडीओच्या माध्यमातून उघडकीस आलेल्या या घटनेनंतर सर्वच यंत्रणा सजग झाल्या होत्या. परंतु, घटनेस सात दिवसांचा अवधी गेला तरीही हा प्रवाह नक्की कशामुळे तयार झाला आहे. याचा मागमुस कुठल्याच यंत्रणेला लागलेला नाही. त्यामुळे मच्छिमारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. समुद्राच्या त्या गूढ वर्तुळाचे अजूनही समोर आले नाही.

हे देखील वाचा: Social Media Rumors Alert: उरणमध्ये ‘मुले पळवणारी टोळी’ ची अफवा? पोलिस तपासात झाले उघड

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, वसईतील पाचुबंदर येथील ‘ओम नमः शिवाय’ ही कृष्णा मोरलीखांड्या यांच्या मालकीची मच्छीमार नौका समुद्रात मासेमारीसाठी निघाली होती. जीपीएस क्रमांक ३०-१५ ५५४, ७१-५८-५७६ या ठिकाणी मोठे गोलाकार वर्तुळ पाण्यामध्ये तयार झाले होते. त्यातून मादकट रंगाचे पाणी वेगाने निघत असल्याचे निदर्शनास आले. मात्र, त्याआधीच सदर बोट या ठिकाणी अडकली होती. हे लक्षात येताच इंजिनाचा वेग वाढवून मच्छीमारांनी ही बोट बाहेर काढली. सुदैवाने ती बोट बाहेर पडली, त्यानंतर सदर घडलेली घटनेची मत्स्य अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर याबाबत तटरक्षक दल व नौदलाला कळवण्यात आले.

हे देखील वाचा: बारामतीतील कृषी प्रदर्शनात गर्दी; तरुण शेतकरी, महिला वर्गांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गूढ प्रवाहाचा भूकंपाशी संबंध आहे का?

पालघर जिल्हा हा भूकंप प्रवण क्षेत्र आहे, त्यामुळे शेकडो सौम्य धक्के या भागात कायम सुरू असतात. सदर प्रवाह भूकंपामुळे निर्माण झाला आहे का? असा प्रश्न मच्छिमारांमार्फत उपस्थित करण्यात येत आहे. कारण सप्टेंबर २०२३ मध्ये वसईपासून ३७ किमी दूर समुद्रात ३.८ तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला होता, ज्यामुळे जमीन हादरल्याचा अनुभव आला होता. या नव्या घटनेमुळे मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कारण भूकंपाच्या धक्क्याने नवीन आपत्तीला देखील सामोरे जावे लागू शकण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

ठाणे-पालघर मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त दिनेश पाटील यांनी घटनेची माहिती नौदल व तटरक्षक दलाला दिलेली असून त्यांच्याकडून अजूनही घटनेचा खुलासा झालेला नाही. सदर घटनेत भूकंप किवा तशा स्वरूपाची शक्यता नाही, तर ओएनजीसी च्या गॅसलाईनमुळे असे होऊ शकते. मात्र, तशी माहिती अजूनही प्राप्त नाही. असे सांगितले.

Web Title: Mysterious sea water phenomenon alarms fishermen near vasai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 05:27 PM

Topics:  

  • Earthquake
  • fishermen
  • vasai

संबंधित बातम्या

VASAI : वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व
1

VASAI : वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व

मच्छीमार व्यवसायाकरिता अद्ययावत, प्रशस्त जेट्टीची मागणी; मंत्री नितेश राणेंना दिले निवेदन
2

मच्छीमार व्यवसायाकरिता अद्ययावत, प्रशस्त जेट्टीची मागणी; मंत्री नितेश राणेंना दिले निवेदन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.