सौजन्य - नवराष्ट्र टीम
आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रावर आधारित ऊसाच्या शेतीवरती सर्वाधिक गर्दी शेतकऱ्यांनी केली होती. या ठिकाणी ऊसाच्या विविध जाती कशा प्रकारे वाढलेल्या आहेत आणि आर्टिफिशल इंटेलिजन्स हे तंत्र नेमके कसे काम करते हे शेतकऱ्यांनी या ठिकाणी जाणून घेतले व प्रकल्पामध्ये सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी केली.
भीमथडी – अश्व प्रदर्शन उत्साहात
प्रदर्शनात कृषि विज्ञान केंद्रामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांनी माहिती घेतली व नाव नोंदणी केली. तसेच पिकांच्या विविध वाणांची माहिती घेण्यासाठी शेतकरी कंपन्यांच्या स्टॉलला गर्दी करताना दिसून आले. आजच्या दिवशी ट्रस्टचे विश्वस्त रणजीत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भीमथडी – अश्व प्रदर्शन पार पडले.
तरुण शेतकरी, महिला वर्गांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
राज्याचे कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे ललित कुमार धायगुडे यांनी कृषिक प्रदर्शनास भेट दिली. ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे यांनी गर्दीत येणाऱ्या शेतकऱ्यांना अडचण येऊ नये, म्हणून सूचना देऊन योग्य मार्गदर्शन करत होते. सदर कृषी प्रदर्शन शनिवार दिनांक २४ जानेवारी पर्यंत सुरु रहाणार असून, शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्राचे प्रमुख डॉ. धीरज शिंदे यांच्यातर्फे करण्यात आले. दरम्यान दरवर्षी हे प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दीमध्ये वाढ होत आहे. यामध्ये तरुण शेतकऱ्यांसह महिला वर्गांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.






