Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramtek Film City : रामटेक फिल्मसिटीसाठी जागेचा प्रश्न सुटेना? दोन महिन्यांत होता हस्तांतरणाचा प्रयत्न

चित्रपट निर्मिती आणि विदर्भात रोजगाराची संधी उपलब्ध होण्याच्यादृष्टीने रामटेक येथे उभारण्यात येणाऱ्या चित्रनगरीसाठी येत्या १५ दिवसात ६० एकर जमीन हस्तांतरित करण्याचा  प्रयत्न असल्याची माहिती मिळत आहे.  

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 04, 2025 | 12:20 PM
रामटेक फिल्मसिटीसाठी जागेचा प्रश्न सुटेना? दोन महिन्यांत होता हस्तांतरणाचा प्रयत्न (फोटो सौजन्य-X)

रामटेक फिल्मसिटीसाठी जागेचा प्रश्न सुटेना? दोन महिन्यांत होता हस्तांतरणाचा प्रयत्न (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:
  • मुंबईनंतर दुसरी चित्रनगरी रामटेक परिसरात
  • रामटेक फिल्मसिटीसाठी जागेचा प्रश्न सुटेना
  • दोन महिन्यांत होता हस्तांतरणाचा प्रयत्न

नागपूर : विदर्भात चित्रपट निर्मिती आणि रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी रामटेक येथे चित्रनगरी उभारण्यात येत आहे. मात्र या चित्रनगरीसाठी येत्या दोन महिन्यात जमीन हस्तांतरित करण्याचा आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता. मात्र, हा कालावधी लोटल्यानंतरही अद्याप जागेचा प्रश्न सुटेनासा झाला आहे. तर, जागेचा तिढा सुटत नसल्याने प्रकल्प सल्लागाराचीही नियुक्ती रखडली आहे.

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी नागपुरात येऊन ही घोषणा केली होती. परंतु गेल्या दोन महिन्यात विदर्भांतील सांस्कृतिक क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाच्या ठरू पाहणाऱ्या या प्रकल्पाचे नेमके काय होणार, याबद्दल नागपूरवासियांसह वैदर्भीय कलावंतांचेही लक्ष लागले आहे.

मनमानी कर आकारणीने नागरिक संतप्त, दारव्हानगर पालिकेच्या कारभारावर रोष; नोटीसची केली होळी

रामटेक जवळच्या नवरगाव येथे प्रस्तावित चित्रनगरीच्या जागेची पाहणी सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी दोन महिन्यात जमीन हस्तारण व प्रकल्प सललागार नियुक्तीची घोषणा केली होती. रामटेकच्या प्राचीन गड मंदिर परिसरात भाविकांसाठी अद्ययावत सोयी सुविधा उभारण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

रामटेकमध्ये चित्रनगरी उभारण्यासाठी, विशेषतः नवरगाव येथे, शासनाने प्रक्रिया सुरू केली असली तरी ती संथगतीने होत आहे. या चित्रनगरीमुळे विदर्भात चित्रपट निर्मितीला चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, परंतु, तुर्तास हा प्रकल्प अधांतरी अडकल्याची चिंता पसरली आहे.

प्रकल्पासाठी ६० एकर जमिनीची आवश्यकता

या प्रकल्पासाठी सुमारे ६० एकर जमीन हस्तांतरित करण्यासोबत प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमग्याचेही ठरले आहे. परंतु त्यापुढे प्रशासनस्तरावर कुठेही काहीच झाले नाही. त्यामुळे या प्रकल्पाबाबत चिता व्यक्त केली जात आहे. विदर्भातील कलावंतांना वाव मिळावा, यासाठी नागपुरात चित्रनगरी साकारण्याचा निर्णय तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यानी निर्णय घेतला होता. त्यानंतर जागेचा शोध घेत रामटेक येथील डिसीजवळील जागा निश्चित करण्यात आली, येथे शासनाच्या मालकीची १२८ एकर जागा आहे. चित्रपटाच्या निर्मितीसाठी आवश्यक सर्व प्रकारचे लोकवान्स, शूटिंग स्टुडिओ, विद्युत उपकरणे, उच्च दाबाची जनरेटर्स, कॅमेरा, लेन्सेस, ट्रैक, ट्रॉलीज, कपडेपट मेकअप व्यवस्था, प्रीव्वा विएटर्स, संकलन स्टुडिओ, प्राविवस तंत्र अशा अनेक गोष्टीची उभारणी या प्रकल्पांतर्गत केली जाणार आहे.

चित्रपटांच्या शूटिंगसाठी २ वर्षात केवळ एक अर्ज

२०२३ मध्ये महापालिकेकडे जंबुदीप प्रॉडक्शन प्रा. लिमिटेड या चित्रपटनिर्मिती कंपनीचा अर्ज आला होता. २०२४ मध्ये या कंपनीला वित्रीकरणासाठी परवानगी दिली होती. २६ नोव्हेंबर असे या चित्रपटाचे नाव होते. सयाजी शिंदे, अनिकेत विश्वासराव, विजय पाटकर, मुश्ताक खान आणी नावाजलेल्या अभिनेत्याचा या चित्रपटात समावेश असल्याचे कंपनीने नमुद केले होते. संविधान बौक, मोरभवन, सक्करदरा बाजार, सोमलवाडा, फुटाळा तलाय, महान, भगवाननगर येथे एकूण १२ दिवसांच्या शुटींगसाठी परवानगी मागण्यात आली होती, महापालिकेने या कंपनीला मार्च २०२४ मध्ये चित्रीकरणासाठी परवानगी दिली होती.

चित्रीकरणासाठी यंदा २ अर्ज

१८ व २८ फेब्रुवारीला महापालिकेकडे अनुक्रमे रिव्हरलैंड एन्टरटेन्मेंट प्रा. लि. मुंबई व अरिंज सिटी प्रॉडक्शन कंपनीकडून चित्रीकरणासाठी परवानगीचे अर्ज आले आहेत. रिव्हरलँड एन्टरटेन्मेंट प्रा. लि. मुंबई व हॉसशु मिडिया प्रा. लि. हरियाणा या दोन प्रॉडक्शन कंपन्यांनी संयुक्तपणे अर्ज केला. या कंपन्यांनी फ्रिडम पार्क मेट्रो स्टेशन, झिरो माईल, रामझुला, वर्धमाननगर कॉलनी, रामबाग ले-आऊट, इस्कॉन, आयटी पार्क, मिहान, आयआयएम, व्हीएनआयटी, नॅशनल कॅन्सर इर्नस्टट्‌यूट, दीक्षाभूमी आदी ठिकाणी चित्रीकरणासाठी परवानगी मागितली होती. रिंज सिटी प्रॉडक्शन हाऊसनेही शहरातील विविध ठिकाणी चित्रीकरणासाठी परवानगी मागितली आहे. महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून ही परवानगी दिली जाते. विशेष म्हणजे या चित्रीकरणासाठी आकाशचिन्ह विभागाकडून महापालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभाग, उद्यान विभाग व झोन सहायक आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे.

‘ऑक्टोबर हिट’नंतरही विजेच्या मागणीत मोठी घसरण; वितरण कंपन्यांनी उत्पादनात केली कपात

Web Title: Nagapur in land for ramtek film city be resolved an attempt was made to transfer it over two months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2025 | 12:20 PM

Topics:  

  • Ashish Shelar
  • maharashtra

संबंधित बातम्या

बंगाडीवासींना लाकडी पुलाचाच आधार! प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष; दरवर्षी श्रमदानातून उभारतात पूल
1

बंगाडीवासींना लाकडी पुलाचाच आधार! प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष; दरवर्षी श्रमदानातून उभारतात पूल

रेशन दुकानदारावरील अन्याय कायम! ५ महिन्यांपासून कमिशन थकीत; दिवाळीही गेली अंधारात
2

रेशन दुकानदारावरील अन्याय कायम! ५ महिन्यांपासून कमिशन थकीत; दिवाळीही गेली अंधारात

Cabinet Meeting: गंभीर आजारांसाठी ‘या’ योजनेतून मिळणार 10 लाख रुपये…; मंत्रिमंडळ बैठकीत 21 महत्त्वाचे निर्णय
3

Cabinet Meeting: गंभीर आजारांसाठी ‘या’ योजनेतून मिळणार 10 लाख रुपये…; मंत्रिमंडळ बैठकीत 21 महत्त्वाचे निर्णय

BMC Elections : मोठी बातमी! महापालिकांचे बिगुल वाजण्याची शक्यता, निवडणूकीची तारीख होणार जाहीर
4

BMC Elections : मोठी बातमी! महापालिकांचे बिगुल वाजण्याची शक्यता, निवडणूकीची तारीख होणार जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.