Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी! वर्षाअखेरीस प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत वीज पोहोचवण्याचे लक्ष्य

राज्यातील 75 टक्के शेतकऱ्यांना सध्या दिवसा वीजपुरवठा करण्यात येत असून, उर्वरित 25 टक्के शेतकऱ्यांनाही यावर्षाअखेरीस दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा वाढवण्यावर राज्य सरकारचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 24, 2026 | 05:30 PM
शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी! वर्षाअखेरीस प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत वीज पोहोचवण्याचे लक्ष्य : मुख्यमंत्री फडणवीस

शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी! वर्षाअखेरीस प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत वीज पोहोचवण्याचे लक्ष्य : मुख्यमंत्री फडणवीस

Follow Us
Follow Us:
  • राज्यातील ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा
  • यावर्षाअखेरीस उर्वरित २५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा
  • वर्षाअखेरीस प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत वीज पोहोचवण्याचे लक्ष्य
मुंबई : राज्यात सध्या वीजेची कोणतीही टंचाई नसून कृषी पंपांना नियमानुसार दिवसा आठ तास वीजपुरवठा केला जात आहे. राज्यातील सुमारे ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली असून उर्वरित २५ टक्के शेतकऱ्यांनाही यावर्षाअखेरीस दिवसा वीजपुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य सदाभाऊ खोत यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य बच्चू कडू, प्रविण दरेकर यांनी उपप्रश्न उपस्थित केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मे महिन्यात काही वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये एकाच वेळी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने अल्पकाळासाठी भारनियमन करावे लागले होते. मात्र सध्या राज्यात कोणतेही भारनियमन करण्यात येत नाही. शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या सौर कृषी पंप योजनेंतर्गत विविध भौगोलिक परिस्थितींना अनुरूप मॉडेल विकसित करण्यात आली आहेत. नदीकाठ, पूररेषा, कालवे तसेच खोल जलस्रोतांमधून पाणी उपसा करण्यासाठी मोनोपोल, बूस्टर पंप आणि तरंगत्या सौर पंपांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांत राज्यात १० लाखांहून अधिक सौर पंप बसविण्यात आले असून शेतकऱ्यांकडून या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Maharashtra Budget 2026:  महाराष्ट्र बजेट २०२६ मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा; जाणून घ्या सविस्तर 

वीज वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र शासनाच्या आरडीएसएस योजनेअंतर्गत राज्यात सुमारे २५ हजार कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये फीडर विभक्तीकरण, नवीन उपकेंद्रे, अतिरिक्त रोहित्रे (डीपी) आणि वितरण यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. पुढील तीन वर्षांत या कामांमुळे डीपी निकामी होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. डार्क झोन भागातील शेतकऱ्यांनाही दिलासा देण्यासाठी खोल जलस्तर असलेल्या भागांमध्ये अधिक क्षमतेचे पंप, बूस्टर पंप आणि त्यावर अनुदान देण्याची व्यवस्था केली आहे. तसेच सौर पंपधारकांना वीजबिलाचा कोणताही प्रश्न राहत नसल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील वाढत्या वीज मागणीच्या पार्श्वभूमीवर २०३१-३२ पर्यंत ७८ हजार मेगावॅट वीज क्षमता उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या क्षमतेचे प्रभावी वहन सुनिश्चित करण्यासाठी ट्रान्समिशन कॉरिडॉर उभारणीवर विशेष भर देण्यात येत असून टीबीसीबी पद्धतीद्वारे १६ हजार कोटी रुपयांची कामे सुरू झाली आहेत. पुढील तीन वर्षांत ट्रान्समिशन क्षेत्रात सुमारे ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. मुंबईच्या वीज सुरक्षेसाठी ‘मुंबई आयलँडिंग’ संकल्पनेअंतर्गत महत्त्वाचे ट्रान्समिशन कॉरिडॉर पूर्ण करण्यात आले असून आता मुंबईत अतिरिक्त ३ हजार मेगावॅट वीज आणण्याची क्षमता निर्माण झाली आहे. त्यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मुंबईचा वीजपुरवठा अबाधित ठेवणे शक्य होणार आहे. पीएम सूर्य घर योजनेंतर्गत रूफटॉप सौर ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर पोहोचला असून गृहसंकुलांनी मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा स्वीकारल्यास त्यांच्या सामाईक वीज खर्चात मोठी बचत होऊ शकते, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ योजनेस मुदतवाढ; ३८ हजार २२ शाळांची माहिती अद्याप प्रलंबित

Web Title: 75 percent farmers get daytime electricity supply in maharashtra remaining 25 percent by year end devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Farmers
  • maharashtra

संबंधित बातम्या

RTO Employees Strike : आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे; राज्यातील परिवहन विभागाचे कामकाज पूर्ववत सुरू होणार
1

RTO Employees Strike : आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे; राज्यातील परिवहन विभागाचे कामकाज पूर्ववत सुरू होणार

Anna Hazare : ‘जनतेचं हित धोक्यात आलं तर पुन्हा मैदानात उतरणार!’; अण्णा हजारेंचा थेट केंद्र सरकारला इशारा
2

Anna Hazare : ‘जनतेचं हित धोक्यात आलं तर पुन्हा मैदानात उतरणार!’; अण्णा हजारेंचा थेट केंद्र सरकारला इशारा

Dharashiv News : सुरक्षा रक्षकांच्या वेतनावर डल्ला? शासकीय कार्यालयांतील कंत्राटी व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी
3

Dharashiv News : सुरक्षा रक्षकांच्या वेतनावर डल्ला? शासकीय कार्यालयांतील कंत्राटी व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

Mumbai News: वर्सोव्यातील पदपथ केले मोकळे! पादचाऱ्यांची अडवणूक करणाऱ्या १७ व्यावसायिकांवर बडगा
4

Mumbai News: वर्सोव्यातील पदपथ केले मोकळे! पादचाऱ्यांची अडवणूक करणाऱ्या १७ व्यावसायिकांवर बडगा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.