Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manisha Kayande : सोलापूर ITI मध्ये १५० मुलींच्या कथित धर्मांतरण छळाचा आरोप; विधान परिषदेत डॉ. मनीषा कायंदे यांचा गौप्यस्फोट

शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत सोलापूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) सुमारे १५० मुलींना कथित धर्मांतरणासाठी छळ सहन करावा लागत असल्याचा आरोप केला आहे. संबंधित मुलींनी लेखी तक्रार दिल्याचा दावा केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 24, 2026 | 06:53 PM
सोलापूरातील शासकीय ‘आयटीआय’मध्ये १५० मुलींचा धर्मांतरणासाठी छळ

सोलापूरातील शासकीय ‘आयटीआय’मध्ये १५० मुलींचा धर्मांतरणासाठी छळ

Follow Us
Follow Us:
  • सोलापूरातील शासकीय ‘आयटीआय’मध्ये १५० मुलींचा धर्मांतरणासाठी छळ
  • शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांचा विधान परिषदेत गौप्यस्फोट
  • धर्मांतरणासाठी महिलांचा छळ करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची चौकशी करा
मुंबई : टीसीएस, विप्रोसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना धर्मांतरणासाठी भाग पाडले जात असतानाचा सोलापूरातील मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १५० मुलींचे जबरदस्तीने धर्मांतरण करण्यासाठी छळ सुरु असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत केला. या प्रकरणी तातडीनं लक्ष घालून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आमदार डॉ. कायंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

विधान परिषदेत आज प्रश्नोत्तराच्या तासात आमदार डॉ. कायंदे यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये महिलांचा धर्मांतरणासाठी सुरु असलेल्या छळाबद्दल प्रश्न उपस्थित केला. आमदार डॉ. कायंदे म्हणाल्या की टीसीएस, विप्रो, एसबीआय, लेन्सकार्ट नंतर आता सोलापूरातील शासकीय ‘आयटीआय’मध्ये १५० मुलींना धर्मांतरणासाठी त्रास आणि छळ सहन करावा लागतोय. या मुलींनी आपल्याकडे लेखी तक्रार केल्याचे आमदार डॉ. कायंदे यांनी सभागृहात सांगितले. या प्रकरणी लक्ष घालून मुलींचा छळ करणाऱ्यांना तातडीने सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी आमदार डॉ. कायंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे केली.

Alibaug News : हलगर्जीपणाचा फटका! अपूर्ण पुलामुळे देहेन गावाचा संपर्क तुटला, ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल

त्या पुढे म्हणाल्या की पुणे तळेगाव दाभाडे येथील सीकात्सो इंडिया या स्पॅनिश कंपनीमधील गणेश कदम आणि सीईओ राहुल रामोस या दोघांवर लैंगिक शोषणाचा आरोप एका महिला कर्मचाऱ्याने केला आहे. १६ एप्रिल २०२६ रोजी या महिला कर्मचाऱ्याने मदत पेटीमध्ये आणि आयसीसी कमिटीकडे लेखी तक्रार केली, मात्र त्यानंतर त्वरीत तिला कामावरुन काढून टाकण्यात आले. या प्रकरणी कामगार आयुक्तांकडे दाद मागण्यात आली, महिला आयोगाने यात सुरवातीला लक्ष घातले नाही, असा आरोप आमदार डॉ. कायंदे यांनी केला. तीन महिन्यांपासून ती महिला कर्मचारी नोकरीविना घरात बसून आहे. या महिलेने सगळीकडे दाद मागितली मात्र तिला न्याय मिळाला नाही. कंपनीनेही तिला सेवेत परत घेतले नाही. त्यामुळे महीला धोरण २०२४ आणि कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ कायदा २०१३ नुसार कंपनीचा परवाना रद्द करावा, अशी मागणी आमदार डॉ. कायंदे यांनी यावेळी केली.

तक्रार करणाऱ्या महिलांना संरक्षण द्या

महामुंबई मेट्रोमध्ये एका महिलेने छळासंदर्भात महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर तिला त्वरीत कामावर घेण्यात आले. मग पिडित महिलांमध्ये भेदभाव कशाला हवा. महिलांना तक्रारीसाठी सुरु केलेल्या शी बॉक्स पोर्टलचा उपयोग काय, असा सवाल आमदार डॉ. कायंदे यांनी उपस्थित केला. तक्रार करणाऱ्या महिलांना न्यायासाठी पायपीट करावी लागते. त्यांना कामावरुन काढले जाते. तक्रार करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावे आणि कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार डॉ. कायंदे यांनी केली.

RTO Employees Strike : आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे; राज्यातील परिवहन विभागाचे कामकाज पूर्ववत सुरू होणार

Web Title: Dr manisha kayande alleges harassment for religious conversion of 150 girls at solapur government iti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 06:53 PM

Topics:  

  • maharashtra
  • Manisha Kayande
  • Solapur

संबंधित बातम्या

Shiv Sena Protest: ‘बाळासाहेब ठाकरे कलादालन १ नोव्हेंबरपूर्वी खुले करा; अन्यथा…’ शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा!
1

Shiv Sena Protest: ‘बाळासाहेब ठाकरे कलादालन १ नोव्हेंबरपूर्वी खुले करा; अन्यथा…’ शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा!

बावधनमध्ये महापालिकेचा बुलडोझर! पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मोठी कारवाई
2

बावधनमध्ये महापालिकेचा बुलडोझर! पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मोठी कारवाई

Pratap Sarnaik: महामार्गांवर धावणार ‘हवाई रुग्णवाहिका’! अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये मिळणार उपचार; सरनाईकांची मोठी घोषणा
3

Pratap Sarnaik: महामार्गांवर धावणार ‘हवाई रुग्णवाहिका’! अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये मिळणार उपचार; सरनाईकांची मोठी घोषणा

Maharashtra UK Partnership : ब्रिटनचे राज्य सचिव महाराष्ट्रावर फिदा; परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
4

Maharashtra UK Partnership : ब्रिटनचे राज्य सचिव महाराष्ट्रावर फिदा; परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.