Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Alibaug News : हलगर्जीपणाचा फटका! अपूर्ण पुलामुळे देहेन गावाचा संपर्क तुटला, ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल

अलिबाग तालुक्यातील भाकरवड-देहेन येथे सुरू असलेले पुलाचे काम अपूर्ण राहिल्याने गावाचा बाहेरील भागाशी संपर्क तुटला आहे. पर्यायी मार्ग नसल्याने ग्रामस्थ, कामगार, दुग्धव्यवसायिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 24, 2026 | 06:32 PM
हलगर्जीपणाचा फटका! अपूर्ण पुलामुळे देहेन गावाचा संपर्क तुटला, ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल

हलगर्जीपणाचा फटका! अपूर्ण पुलामुळे देहेन गावाचा संपर्क तुटला, ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल

Follow Us
Follow Us:
  • देहेन ग्रामस्थांचा संपर्क तुटला
  • ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
  • अर्धवट फुलाच्या निष्काळजीपणामुळे देहेन गावचा संपर्क तुटला
भारत रांजणकर, अलिबाग : अलिबाग तालुक्यातील भाकरवड-देहेन येथे सुरू असलेले पुलाचे काम अपूर्ण राहिल्याने गावाचा बाहेरील जगाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह शाळकरी विद्यार्थी, कामगार, दुग्धव्यवसायिक आणि शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पोयनाड, अलिबाग आणि इतर ठिकाणी दैनंदिन कामांसाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.

बंधारा वाहून गेल्याने संकट अधिक गडद

भाकरवड-देहेन गावाला जोडणारा जुना पूल निकामी झाल्यानंतर नव्या पुलाचे काम हाती घेण्यात आले. मात्र, हे काम उशिरा सुरू झाल्याने पावसाळ्यापूर्वी पूर्ण होऊ शकले नाही. पुलाच्या बांधकामासाठी नदीवर उभारण्यात आलेला तात्पुरता बंधारा मुसळधार पावसामुळे आणि पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे वाहून गेला. त्यामुळे गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला असून नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.

गावात पाणी शिरण्याची भीती

भाकरवड आणि देहेन गावाजवळील नदीतून धरमतर खाडीमार्गे समुद्राचे भरतीचे पाणी येते. नदीचे पात्र अपुरे असल्यामुळे भरतीचे पाणी आणि पावसाचे पाणी मोठ्या वेगाने गावाच्या दिशेने येते. त्यामुळे दोन्ही गावांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता वाढली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

१९८९ च्या महापुराची आठवण

ग्रामस्थांनी सांगितले की, १९८९ च्या महापुरात भाकरवड आणि देहेन गावांमध्ये २० ते २५ फूट पाणी शिरले होते. त्यावेळी घरांचे, शेतीचे आणि अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या परिस्थितीची प्रशासनाला पूर्ण कल्पना असूनही योग्य नियोजन करण्यात आले नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

Raigad News: शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे! रायगडमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम; पेरणीची कामे खोळंबली

प्रशासनाला वारंवार निवेदने

ग्रामस्थांनी यापूर्वीच शासन आणि गेल कंपनीच्या व्यवस्थापनाला निवेदने देऊन, प्रथम पाण्याचा योग्य निचरा होईल याची व्यवस्था करूनच काम करावे, अशी मागणी केली होती. रस्त्यालगत सुरू असलेले काम पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा नैसर्गिक मार्ग बंद होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. असे झाल्यास संपूर्ण गाव पाण्याने वेढले जाऊन गोरगरीब शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान होऊ शकते, असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता.

ग्रामस्थांची प्रशासनाकडे तोडगा काढण्याची मागणी

ग्रामस्थ मंडळ भाकरवडचे अध्यक्ष शंकर बाळू पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. गावातील नागरिक आणि शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हे काम सुरू करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे असताना ते अपूर्ण राहिल्याने आता गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत आहे. ग्रामस्थ, शेतकरी, गेल समिती आणि प्रशासन यांनी एकत्रित बसून या समस्येवर तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

साऊथ सुपरस्टार Yash झाला अलिबागकर! पत्नी राधिकासह खरेदी केली ‘इतक्या’ कोटींची प्रॉपर्टी, समुद्रकिनारी उभारणार आलिशान घर

Web Title: Bhakarwad dehen village cut off due to incomplete bridge work alibag rain crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 06:32 PM

Topics:  

  • Alibag
  • maharashtra
  • raigad

संबंधित बातम्या

Shiv Sena Protest: ‘बाळासाहेब ठाकरे कलादालन १ नोव्हेंबरपूर्वी खुले करा; अन्यथा…’ शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा!
1

Shiv Sena Protest: ‘बाळासाहेब ठाकरे कलादालन १ नोव्हेंबरपूर्वी खुले करा; अन्यथा…’ शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा!

बावधनमध्ये महापालिकेचा बुलडोझर! पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मोठी कारवाई
2

बावधनमध्ये महापालिकेचा बुलडोझर! पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मोठी कारवाई

Pratap Sarnaik: महामार्गांवर धावणार ‘हवाई रुग्णवाहिका’! अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये मिळणार उपचार; सरनाईकांची मोठी घोषणा
3

Pratap Sarnaik: महामार्गांवर धावणार ‘हवाई रुग्णवाहिका’! अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये मिळणार उपचार; सरनाईकांची मोठी घोषणा

Maharashtra UK Partnership : ब्रिटनचे राज्य सचिव महाराष्ट्रावर फिदा; परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
4

Maharashtra UK Partnership : ब्रिटनचे राज्य सचिव महाराष्ट्रावर फिदा; परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.