नागपुरमध्ये रविवारी (17 जून 2024) ला सायंकाळी ५ वाजता कन्हान नदीच्या पुलावर भरधाव वेगाने जाणारी खासगी बस आणि ऑटो रिक्षा यांच्यात धडक झाली. या अपघातात लष्कराच्या 2 जवानांचा मृत्यू झाला असून 6 जवान आणि रिक्षा चालक असे 7 जण जखमी झाले आहेत. या अपघातात ऑटो चालकालाही गंभीर दुखापत झाल्याचे त्यांनी सांगितले. अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे या अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
नागपूरच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऑटोमध्ये प्रवास करणाऱ्या 8 जवानांपैकी विघ्नेश आणि धीरज राय यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. दीन प्रधान, कुमार पी, शेखर जाधव, अरविंद, मुरुगन आणि नगररत्नम अशी इतर जखमी जवानांची नावे आहेत, असे पोलिसांनी सांगितले. केम्प्टी येथील रुग्णालयात दाखल असलेले कुमार पी आणि नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नगररत्नम यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. जखमींमध्ये ऑटोचालक शंकर खारकबानची प्रकृती चिंताजनक आहे. नागपूरपासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेल्या केम्पटी येथे असलेल्या लष्कराच्या गार्ड रेजिमेंटल ट्रेनिंग सेंटरचे (जीआरसी) एकूण 15 सैनिक कन्हान येथे दोन ऑटोमधून खरेदीसाठी गेले होते.
#WATCH | Maharashtra: Two jawans of the Indian Army died and 7 including 6 jawans and an auto driver injured after a speeding private bus collided with an auto-rickshaw at Kanhan River Bridge in Nagpur, today, evening: Pramod Pore, Police Inspector, Old Kamptee PS pic.twitter.com/VORBxJGNiJ
— ANI (@ANI) June 16, 2024
दरम्यान, ही धडक इतकी भीषण होती की, रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. तसेच अपघातानंतर संतप्त स्थानिक नागरिकांनी बसची तोडफोड केली आणि नागपूर-जबलपूर महामार्ग ही रोखला. आता पोलिस या अपघाताचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. या अपघाताचे कारण समोर आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मृतांच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे.