Nagpur violence case to be heard in Judicial Magistrate First Class (JMFC) court at midnight
नागपूर : नागपूरमध्ये औरंगजेब कबर या मुद्द्यावरुन दंगल झाली. सोमवारी (दि.17) एका संतप्त जमावाने जोरदार दगडफेक आणि जाळपोळ केली. महाल परिसरामध्ये झालेल्या या दंगलीमध्ये पोलिसांवर देखील हल्ला करत दगडफेक करण्यात आली. यामध्ये 34 पोलीस जखमी झाले आहेत. तर एका महिला पोलीस कॉन्स्टेबलचा विनयभंग देखील झाला असल्याचे दिसून आला आहे. दरम्यान, नागपूरच्या या दंगलीबाबत न भूतो न भविष्यती अशी सुनावणी पार पडली.
नागपूर न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक अनोखी सुनावणी पाहयाला मिळाली. शहरात झालेल्या हिंसाचारानंतर, पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता, तर दुसरीकडे, नागपूर शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात तणावाचे वातावरण होते. नागपूरमध्ये संचारबंदी देखील लागू करण्यात आली होती. त्याचबरोबर केंद्रीय आणि नागपूरमधील नेते शांतता राखण्याचे आवाहन करत होते. रात्री 12 वाजल्यानंतर संपूर्ण शहरात विचित्र आणि तणावपूर्ण शांतता पसरली. पण दुसरीकडे, नागपूर न्यायालयातील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी सुलताना मैमुना यांच्या न्यायालयात दुपारी 2.50 वाजेपर्यंत सुनावणी सुरू राहिली. संपूर्ण नागपूर शहर झोपेत असताना, न्यायालयात वादविवाद आणि युक्तिवाद सुरू होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सोमवारी नागपूरच्या महाल परिसरात झालेल्या हिंसाचारामुळे वातावरण तणावपूर्ण आहे. मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटनांनंतर संपूर्ण शहर पोलिसांच्या देखरेखीखाली आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे आणि अनेक ठिकाणी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
मंगळवारी, महाल परिसरामधील दंगल प्रकरणा पोलिसांनी 51 आरोपींना अटक केली. या अटक केलेल्या 51 आरोपींपैकी 27 आरोपींना गणेशपेठ पोलिसांनी न्यायिक दंडाधिकारी प्रथम श्रेणी (जेएमएफसी) न्यायालयात हजर केले. या सुनावणीसाठी न्यायालयात विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सरकारी वकिलांनी आरोपींच्या चौकशीदरम्यान, बचाव पक्षाच्या वकिलांनी असा आरोप केला की अनेक आरोपींचा दंगलीत काहीही संबंध नव्हता. बचाव पक्षाचे वकील रफिक अकाबानी आणि इतर वकिलांनी सांगितले की, दंगल स्थानिक लोकांनी केली नव्हती तर बाहेरील लोकांनी केली होती. पोलिसांनी अनेक आरोपींना अत्यंत वाईट आणि कठोरपणे वागवले आणि त्यांना गंभीर जखमी केले, असा दावाही त्यांनी केला.
बचाव पक्षाचे आरोप फेटाळून लावताना सरकारी वकील मेघा बुरुंगे यांनी न्यायालयाला सांगितले की, प्रकरणाचा तपास करण्यासाठी आरोपीची पोलिस कोठडी आवश्यक आहे. अखेर न्यायालयाने चौघांनाही दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली, तर काहींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर काहींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.