Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : दलित वस्ती सुधार निधी अडचणीत; ३५ कोटींच्या तरतुदीत ५५ कोटींच्या कामांना मंजुरी!

Nagpur News : नागपूर महानगरपालिकेच्या दलित वस्ती सुधार निधीवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. ३५ कोटी रुपयांची तरतूद असताना तब्बल ५५ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे अतिरिक्त २० कोटी रुपयांची तरतूद कशी करणार, असा प्रश्न उपस्थित झाला असून मंजूर कामांच्या निधीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 23, 2026 | 05:26 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • वरिष्ठांच्या निर्देशानुसार मंजुरी :समिती अध्यक्ष
  • सुधारित अर्थसंकल्पाकडे लक्ष
  • संजय महाकाळकर, विरोधी पक्षनेते, मनपा
Nagpur News : नागपूर महापालिकेच्या अनुसूचित जाती-जमाती आणि बौद्ध वस्त्यांच्या विकासासाठी राखीव असलेल्या ‘दलित वस्ती सुधार निधी’मध्ये मोठा आर्थिक पेच निर्माण झाला आहे. चालू आर्थिक वर्ष २०२६-२७च्या पहिल्या टप्प्यात दुर्बल घटक समितीसाठी ३५ कोटींची तरतूद केली असताना समितीने तब्बल ५५ कोटींच्या विकासकामांना मंजुरीपत्रे दिल्याची माहिती समोर आली आहे.

उपलब्ध निधीपेक्षा २० कोटी रुपये अधिक रकमेच्या कामांना मंजुरी दिल्याने मनपाच्या वित्त विभागासह संबंधित विभागही अडचणीत सापडले आहेत.महापालिकेच्या नियमानुसार, एकूण अर्थसंकल्पातील पाच टक्के निधी दुर्बल घटक समितीसाठी राखीव ठेवला जातो. या निधीतून नगरसेवक आपापल्या प्रभागांतील दलित वस्त्यांमध्ये भूमिगत सांडपाणी वाहिन्या, वीज व्यवस्था,सार्वजनिक शौचालये आणि समाजमंदिरांच्या बांधकामांसाठी प्रस्ताव तयार करतात.

स्थायी समितीनंतर दुर्बल घटक समितीच्या अध्यक्षांची मंजुरी मिळाल्यावर संबंधित प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी वित्त विभागाकडे पाठविले जातात.मात्र, चालू आर्थिक वर्षात ३५ कोटींची तरतूद असताना वित्त विभागाकडे ५५ कोटींच्या कामांची मंजुरीपत्रे पोहोचल्याची माहिती आहे. त्यामुळे अतिरिक्त निधीची तरतूद कशी करायची, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Nagpur News : दिवाळीत ऑटोमोबाईल बाजाराला वेग; विक्रीत १२ टक्क्यांची वाढ

वरिष्ठांच्या निर्देशानुसार मंजुरी :समिती अध्यक्ष

या प्रकरणावर दुर्बल घटक समितीच्या अध्यक्ष लक्ष्मी हत्तीटेले यांनी स्पष्टीकरण दिले आहे. वरिष्ठ अधिकारी आणि नेत्यांच्या निर्देशानुसार नगरसेवकांच्या प्रस्तावांना मंजुरीपत्रे दिल्याचे त्यांनी सांगितले. निधी मर्यादित असल्याने प्रत्येक नगरसेवकाची मागणी पूर्ण करणे शक्य नव्हते. त्यामुळे उपलब्ध तरतुदीपेक्षा अधिक रकमेची मंजुरीपत्रे दिल्याचेही त्यांनी मान्य केले.

अतिरिक्त मंजूर कामांचा समावेश आगामी सुधारित अर्थसंकल्पात करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र, सुधारित अर्थसंकल्पात अतिरिक्त निधीची तरतूद झाली नाही तर मंजूर कामांचे भवितव्य काय, असा प्रश्न कायम आहे.

सुधारित अर्थसंकल्पाकडे लक्ष

उपलब्ध निधीपेक्षा अधिक रकमेच्या कामांना मंजुरीपत्रे दिल्याने प्रत्यक्षात कोणती कामे पूर्ण होणार आणि कोणती कागदावरच राहणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. यामुळे स्थानिक नागरिक आणि बगरसेवकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आता मनपाच्या आगामी सुधारित अर्थसंकल्पात अतिरिक्त २० कोटींची बरतूद केली जाणार का, की निधीअभावी काही विकासकामांना कात्री लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Nagpur News : बाजारपेठा गजबजल्या, वाहतूक कोंडीने रस्ते गुदमरले! वाहनांच्या गर्दीत नागरिकांची कसरत

संजय महाकाळकर, विरोधी पक्षनेते, मनपा

मनपाच्या सर्वसाधारण मंजुरी मिळाल्यानंतरही चालू आर्थिक वर्षातील निधीशी संबंधित एकही प्रस्ताव अद्याप स्थायी समितीसमोर आलेला नाही. दुर्बल घटक समितीची बैठक झाल्याची माहितीही विरोधी पक्षनेता म्हणून मला दिलेली नाही. समितीची बैठकच झाली नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणात निधीच्या मंजुरीची प्रक्रिया कोणत्या आधारावर राबवली, हा प्रश्न आहे. कोणत्या प्रभागासाठी किती निधी मंजूर केला आणि कोणत्या नगरसेवकाला किती निधी दिला, याचा सविस्तर खुलासा मनपाने करावा.

Web Title: Dalit settlement improvement fund in trouble projects worth 55 crore approved against an allocation of 35 crorecp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 05:26 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nagpur Municipal Corporation
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Punah Nakki Bhetu Marathi Play: मुक्ता बर्वे–प्रियदर्शन जाधव पहिल्यांदाच एकत्र! ‘पुन्हा नक्की भेटू’मधून रंगणार नात्यांचा अनोखा खेळ
1

Punah Nakki Bhetu Marathi Play: मुक्ता बर्वे–प्रियदर्शन जाधव पहिल्यांदाच एकत्र! ‘पुन्हा नक्की भेटू’मधून रंगणार नात्यांचा अनोखा खेळ

Nagpur News : दिवाळीत ऑटोमोबाईल बाजाराला वेग; विक्रीत १२ टक्क्यांची वाढ
2

Nagpur News : दिवाळीत ऑटोमोबाईल बाजाराला वेग; विक्रीत १२ टक्क्यांची वाढ

Khagras Marathi Movie: नावातच गूढ, पोस्टरमध्ये रहस्य! ‘खग्रास’ चित्रपटाची पहिली झलक समोर
3

Khagras Marathi Movie: नावातच गूढ, पोस्टरमध्ये रहस्य! ‘खग्रास’ चित्रपटाची पहिली झलक समोर

Jhumka Patola Song: सीमा पाहवा यांचा डान्स पाहून बॉलिवूडही थिरकलं! सेलिब्रिटींच्या कमेंट्सनी वेधलं लक्ष!
4

Jhumka Patola Song: सीमा पाहवा यांचा डान्स पाहून बॉलिवूडही थिरकलं! सेलिब्रिटींच्या कमेंट्सनी वेधलं लक्ष!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.