Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीए मराठीतून, भाषांतर करण्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या सूचना

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतील शिक्षणावर मोठा भर देण्यात आला आहे. धोरणात उच्च शिक्षणही मातृभाषेतच द्यावे, अशी आग्रही सूचना करण्यात आली आहे. काही दिवसांपुर्वीच मध्य प्रदेशात वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण हिंदीमध्ये सुरू करण्यात आले आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Oct 22, 2022 | 02:32 PM
आता इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीए मराठीतून, भाषांतर करण्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या सूचना
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली – लवकरच इंजिनीअरिंग, फार्मसी आणि एमबीए या व्यवसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण आता सहजसोप्या मराठीत घेता येणार आहे. या तिन्ही अभ्यासक्रमांचे इंग्रजीतून मराठीमध्ये भाषांतर करण्याच्या सूचना उच्च शिक्षण विभागाने विद्यापीठांना दिल्या आहेत. नागपूर, अमरावती आणि गडचिरोली या तीन विद्यापीठांवर हे अभ्यासक्रम मराठीत आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतील शिक्षणावर मोठा भर देण्यात आला आहे. धोरणात उच्च शिक्षणही मातृभाषेतच द्यावे, अशी आग्रही सूचना करण्यात आली आहे. काही दिवसांपुर्वीच मध्य प्रदेशात वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण हिंदीमध्ये सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातही व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण मराठी भाषेतून देण्याकरिता पावले उचलण्यात येत आहेत.

नागपूरमध्ये शुक्रवारी उच्च शिक्षण विभागाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि विद्यापीठांची प्रगती या विषयावर आयोजित केलेल्या या बैठकीत उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक धनराज माने तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.

बैठकीत उच्च शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी इंजिनीअरिंग, फार्मसी आणि एमबीए अशा तीन व्यावसायिक अभ्यासक्रमांचे भाषांतर मराठीत करण्याच्या सूचना केल्या. नागपूर, अमरावती आणि गडचिरोली या तीन विद्यापीठांकडे हे काम सोपविण्यात आले आहे. तसेच, हे भाषांतर कशाप्रकारे करण्यात येईल, याचा आराखडा २४ नोव्हेंबरपर्यंत सादर करावा, अशा सूचनाही उच्च शिक्षण विभागाने विद्यापीठांना दिल्या आहेत.

Web Title: Engineering pharmacy mba education will be in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2022 | 02:32 PM

Topics:  

  • Marathi News
  • MBA
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Karjat : भरत गोगावलेंचा मोठा दावा; महेंद्र थोरवे होणार तिसऱ्यांदा आमदार!
1

Karjat : भरत गोगावलेंचा मोठा दावा; महेंद्र थोरवे होणार तिसऱ्यांदा आमदार!

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान
2

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
3

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
4

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.