नाट्य पंढरी म्हणून संपूर्ण जगात ओळख असणाऱ्या सांगलीमध्ये विशेषत: मराठी संगीत नाट्य विश्वामध्ये आपल्या गायीकीने आणि दमदार अभिनयाने ही रंगभूमी समृद्ध करणाऱ्या अनेकांपैकी एक असणाऱ्या आणि ज्यांचा उल्लेख संगीतसूर्य म्हणून केला जातो अशा मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या नावाने सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिके च्या असणाऱ्या नाट्यगृहाची अवस्था प्रशासनाने कचराकुंडी सारखी करून ठेवली आहे. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात अतिक्रमण झालेल्या अनेक हात गाड्या, फ्लेक्स, डिजिटल बोर्ड, यासह इतर अनेक अनावश्यक वस्तू या नाट्यगृहाच्या आवारामध्ये टाकण्यात आलेल्या आहेत त्याशिवाय नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारामध्येच महापालिकेतील दप्तराची रद्दी मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेली आहे. ज्यांनी एकेकाळी राजवैभव कलेच्या माध्यमातून निर्माण केले त्यांच्या प्रतिमांच्याखालीच अशा तऱ्हेने मोठ्या प्रमाणावर उकिरडा केल्याचे दिसून येत आहे. प्रत्यक्ष रंगमंच आणि त्यासमोरील बैठक व्यवस्था, दरवाजे खिडक्या स्वच्छतागृह मेकअप रूम हे सर्व पूर्णपणे खराब झालेले आहे. शिवाय ठिकठिकाणी झाडेही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत.असे असतानाही महापालिका प्रशासनाने 2019 च्या पुरानंतर याकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे या नाट्यगृहाचे नूतनीकरण व्हावे आणि सर्वसामान्य गोरगरीब कलाकार नागरिक यांना हे नाट्यगृह वापरता यावे यासाठी प्रशासनासह राजकीय पातळीवरही पाठपुरावा करणार असल्याचा विडा नगरसेवक केदार खाडीलकर यांनी उचलला आहे.यासंदर्भात सर्व नगरसेवक विरोधी पक्षनेते यांनी पुढाकार घेऊन या संदर्भामध्ये महासभेत मागणी करावी अशी प्रतिक्रिया नगरसेवक केदार खाडीलकर यांनी नवराष्ट्र शी बोलताना व्यक्त केलीय.