Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur : एआय एमआरओला संपाचा फटका; कामकाज अजूनही संथ

Nagpur : संप मागे घेतल्यानंतरही एअर इंडियाच्या एमआरओ (Maintenance, Repair and Overhaul) विभागाचे कामकाज अद्याप पूर्णपणे पूर्वपदावर आलेले नाही. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांचा वेग मंदावल्याने काही विमानांच्या देखभालीच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 05, 2026 | 03:45 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • दोन महिन्यांपासून केवळ एका एआय बोईंग-७७७वरच सुरू काम
  • येणार होते एअरबस ए-३२० विमान
  • नागपूरच्या भूमिकेवरही परिणाम होण्याची शक्यता
  • इंडामेर एमआरओमध्ये कामकाज सुरळीत
Nagpur : एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडच्या नागपूरस्थित मेंटेनन्स, रिपेअर अॅण्ड ओव्हरहॉल (एमआरओ) केंद्रात कर्मचाऱ्यांच्या संप आणि कामबंद आंदोलनानंतर कामकाजाचा वेग मंदावला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, २ महिन्यांपासून एमआरओमध्ये केवळ एका बोईंग-७७७ विमानाच्या देखभाल-दुरुस्तीचे काम सुरू आहे. या विमानाचे मेंटेनन्स सुरू असले तरी ते एमआरओमधून बाहेर जाण्याबाबत अद्याप कोणतेही निश्चित वेळापत्रक समोर आलेले नाही.

Nagpur News : लग्नपत्रिका डाऊनलोड करताच मोबाईल हॅक ;६लाखांची सायबर फसवणूक

काही महिन्यांपूर्वीपर्यंत नागपूर एमआरओमध्ये एअर इंडियाची दरमहा सरासरी २ ते ३ विमाने नियोजित देखभालीसाठी येत होती. त्यामुळे अभियंते आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांना नियमित काम मिळत होते आणि एमआरओ पूर्ण क्षमतेने कार्यरत होता. मात्र, संपानंतर परिस्थिती बदलली आहे. सध्या एअर इंडिया नागपूर एमआरओकडे नवीन विमाने पाठविणे टाळत असल्याने येथील कामकाज अत्यंत मर्यादित झाले आहे.

येणार होते एअरबस ए-३२० विमान

सूत्रांच्या माहितीनुसार, एअरबस ए-३२० विमानही देखभालीसाठी नागपूरला पाठवण्याचे नियोजन केले होते. मात्र, नंतर हा कार्यक्रम रद्द केला. त्यानंतर एकही नवीन विमान एमआरओमध्ये आलेले नाही. त्यामुळे कर्मचा-यांमध्ये भविष्यासंदर्भात चिंता वाढू लागली आहे.
एमआरओमधील सातत्याने घटणाऱ्या कामामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. नवीन विमाने आली नाहीत तर केवळ केंद्राच्या उत्पादकतेवरच नव्हे तर भविष्यातील रोजगार आणि कामाच्या स्वरूपावरही परिणाम होऊ शकतो, अशी भीती कर्मचा-यांनी व्यक्त केली आहे.

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांनी नुकतेच विविध मागण्यांसाठी आंदोलन आणि कामबंद पुकारले होते.
राजीनाम्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्याच्या नियमांमध्ये बदल, समान कामासाठी समान वेतन तसेच सेवेतून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या.

नागपूरच्या भूमिकेवरही परिणाम होण्याची शक्यता

कोणत्याही एमआरओची क्षमता प्रभावीपणे वापरायची असेल तर तेथे नियमितपणे देखभालीसाठी विमाने येणे आवश्यक असते. आता सर्वांचे लक्ष एअर इंडियाकडे लागले आहे. कंपनीने पुन्हा नागपूर एमआरओला नियमित देखभाल कामे दिल्यास येथील कामकाजाला पुन्हा गती मिळू शकते, मात्र, सध्याची परिस्थिती दीर्घकाळ कायम राहिल्यास देशातील प्रमुख एमआरओ केंद्रांमध्ये गणल्या जाणाऱ्या नागपूरच्या भूमिकेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

AIIMS Nagpur : शस्त्रक्रियेसाठी तीन-तीन महिने वाट; रुग्णांच्या वाढल्या फेऱ्या..

इंडामेर एमआरओमध्ये कामकाज सुरळीत

एअर इंडियाच्या एमआरओमधील कामकाज मंदावले असताना इंडामेर एमआरओमध्ये विमान देखभालीचे काम नियमित सुरू आहे.
उपलब्ध माहितीनुसार, तेथे दरमहा ४ ते ५ विमाने देखभालीसाठी येत आहेत. यावरून विमान देखभालीची कामे इतर एमआरओ केंद्रांकडे वळत असल्याचे किवा खासगी क्षेत्रातील एमआरओंना अधिक काम मिळत असल्याचे संकेत मिळत आहेत.

Web Title: Nagpur ai mro hit by strike work still slow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • Aviation
  • Nagpur
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur News : देशातील मोठी सोलर इकोसिस्टीम आता नागपुरात !
1

Nagpur News : देशातील मोठी सोलर इकोसिस्टीम आता नागपुरात !

Nagpur Crime : पोलिस पहाऱ्यातून मकोका आरोपी पसार !
2

Nagpur Crime : पोलिस पहाऱ्यातून मकोका आरोपी पसार !

Devendra Fadnavis : ‘अमृत-2’ची सर्व कामं मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा, कुचराई करणाऱ्यांवर कारवाई,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा आदेश
3

Devendra Fadnavis : ‘अमृत-2’ची सर्व कामं मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा, कुचराई करणाऱ्यांवर कारवाई,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा आदेश

Nagpur News : व्यापाऱ्यांनी जावे तरी कुठे? रोख व्यवहारांवरील बंदी, वाढते बँकिंग शुल्क, डिजिटल पेमेंटचा खर्च
4

Nagpur News : व्यापाऱ्यांनी जावे तरी कुठे? रोख व्यवहारांवरील बंदी, वाढते बँकिंग शुल्क, डिजिटल पेमेंटचा खर्च

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.