Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime : एकाच फ्लॅटची दोघांना विक्री ,सव्वा कोटींचा गंडा

नागपुरात चाललेल्या अनेक फसवणूक प्रकारात अजून एका फसणूकीची भर पडली आहे . एका बिल्डरने चक्क एकच फ्लॅट दोघांना विकून फसवले आहे . त्याच्यावर पोलीस कारवाई सुद्धा करण्यात आली आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Jul 25, 2026 | 02:45 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

▶ नागपूर, क्राईम रिपोर्टर :  एकाच फ्लॅटचा दोन वेगवेगळ्या व्यक्तींशी विक्री करार करून सुमारे १ कोटी २५ लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी निवृत्त सहायक कार्यकारी अभियंता प्रवीण उपलंचीवार (७०, रा. आरपीटीएस रोड, अजनी) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बिल्डर संतोषकुमार गंदेवार (४५, रा. श्रीनगर एम्प्रेस मिल हाऊसिंग सोसायटी) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

FIFA : फिफा चषकात गुंजले अमनचे संगीत , नागपूरच्या सुपुत्राची दमदार छाप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण उपलंचीवार हे सीडकोमधून सहायक कार्यकारी अभियंता पदावरून निवृत्त झाले आहे. मुलगा अमेरिकेत तर विवाहित मुलगी नागपुरात राहत असल्याने वृद्धापकाळात मुलीच्या घराजवळ राहण्यासाठी ते फ्लॅटच्या शोधात होते. दरम्यान, संतोषकुमार गंदेवार यांच्या जी. बी. रियल्टर्स या संस्थेने लक्ष्मीनगर परिसरात निवासी प्रकल्प उभारला होता. उपलंचीवार यांनी प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर सहाव्या मजल्यावरील ६०२ क्रमांकाचा फ्लॅट पसंत केला. दोघांमध्ये १ कोटीचा व्यवहार निश्चित झाला. त्यानंतर त्यांनी १ लाख ५१ हजार रुपये अनामत रक्कम भरून फ्लॅट आरक्षित केला. पुढील कालावधीत टप्प्याटप्प्याने ९४ लाख ५१ हजार रुपये अदा केले आणि विक्री करारही केला, करारानुसार तीन वर्षांत फ्लॅटचा ताबा देणे अपेक्षित होते.

StudentSafety: शाळेची बस आता पालकांच्या मोबाईलवर , राज्य सरकारचा निर्णय !

त्याच फ्लॅटचा दुसऱ्याशीही करार
तपासात बिल्डरने याच ६०२ क्रमांकाच्या फ्लॅटचा कविता वर्मा यांच्याशीही स्वतंत्र विक्री करार करून त्यांच्याकडून ३१ लाख रुपये स्वीकारल्याचे समोर आले. याच फ्लॅटची विक्री दर्शविणारी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर उपलचीवार यांना फसवणुकीची बाब लक्षात आली. याबाबत त्यांनी बिल्डरकडे वारंवार विचारणा केली. मात्र, फ्लॅटचा ताबा किंवा भरलेली रक्कम परत न मिळाल्याने त्यांनी बजाजनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली, वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेनसिंग चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार संतोषकुमार गंदेवार याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला.

Web Title: Nagpur crime same flat sold to two people 125 crore fraud

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • building
  • Crime in Nagpur
  • real estate

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.