फोटो सौजन्य AI
▶ नागपूर, सांस्कृतिक प्रतिनिधी.
जगभरातील कोट्यवधी फुटबॉलप्रेमींना खिळवून ठेवणाऱ्या फिफा विश्वचषकच्या अंतिम सामन्यादरम्यान नागपूरच्या सुपुत्राने संगीत क्षेत्रात इतिहास रचला. मूळ नागपूरचे युवा संगीत निर्माता अमन मोरोणे यांची सहनिर्मिती असलेले जागतिक कीर्तीच्या कोल्डप्ले बँडचे ‘वी डान्स’ हे गीत अंतिम सामन्याच्या हाफ टाइम शोमध्ये सादर करण्यात आले. त्यामुळे जागतिक स्तरावर नागपूरच्या प्रतिभेचा ठसा उमटला. तसेच शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला.
नागपूर पुन्हा हादरले ! भांडेवाडीत गुंडाचा तर कामठीत महिलेचा खून; पोलिसांचा शोध सुरु
नागपूरचे ज्येष्ठ तबलावादक अविनाश मोरोणे आणि गायिका मीना मोरोणे यांचे सुपुत्र असलेले अमन सध्या लॉस एंजेलिस (कॅलिफोर्निया, अमेरिका) येथे वास्तव्यास आहे. तीन वर्षे आंतरराष्ट्रीय संगीत विश्वातील आघाडीच्या गीतकार आणि संगीत निर्मात्यांसोबत कार्यरत आहेत. अमन हे द मीडिया ट्राइब या संस्थेचे प्रिन्सिपल फैकल्टी असून, त्यांनी निकटचे सहकारी झीक यांच्यासोबत ‘वी डान्स’ या गीताची सहनिर्मिती केली आहे. हे दोघे द इंडियन कनेक्ट या संगीत समूहाचे सदस्य आहेत. या समूहात प्रसिद्ध गीतकार व कलाकार नतानिया आणि सुभी यांचाही समावेश आहे. भारतीय संगीताचा आत्मा, आधुनिक जागतिक पॉप संगीताचा संगम घडवणारे नवे संगीत ते लॉस एंजेलिसमध्ये सातत्याने साकारत आहेत.
नागपूरला मिळणार अत्याधुनिक विमानतळ; मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
जागतिक स्तरावर वेगळी ओळख
सुप्रसिद्ध पीएस२२ चॉयरच्या सहभागाने साकारलेले हे गीत सादर झाल्यानंतर जगभरातील लाखो-कोट्यवधी प्रेक्षकांपर्यंत पोहोचले. हा क्षण अमन यांच्या आंतरराष्ट्रीय संगीत प्रवासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. यापूर्वीही अमन यांनी पैरामाउंट पिक्चर्सच्या द स्मर्क्स चित्रपटासाठी रिहाना यांच्या संगीताच्या गीतलेखन व निर्मिती टीममध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तसेच त्यांनी स्टारगेट आणि मॅक्स मार्टिनसारख्या जागतिक कीर्तीच्या संगीत निर्मात्यांसोबतही काम केले आहे. भारतीय संगीत निर्मात्यांची जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
Hit and Run Case : नागपुरात ‘हिट अँड रन’; दोघांचा मृत्यू, अपघातानंतर चालक पसार






