Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime : चिमुकलीवरील गैरप्रकाराच्या आरोपाने शिवनगर हादरले; जमावाच्या मारहाणीत इसमाचा मृत्यू

Nagpur Crime : शिवनगरमध्ये चिमुकलीसोबत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून ३५ वर्षीय नारायण वैष्णवला संतप्त नागरिकांनी मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या नारायणचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 07, 2026 | 03:04 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • चिमुकलीला वडील बोलावत असल्याचे सांगून घरी नेल्याचा आरोप
  • संतप्त नागरिकांची मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
  • झटपट न्याय पुन्हा चर्चेत
Nagpur Crime:नागपूरच्या शिवनगर परिसरात चिमुकलीसोबत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून संतप्त नागरिकांनी एका ३५ वर्षीय इसमाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या नारायण मोहनदास वैष्णव याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, वैष्णवचा मृत्यू नेमका मारहाणीमुळे झाला की अन्य कारणाने, हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

चिमुकलीला वडील बोलावत असल्याचे सांगून घरी नेल्याचा आरोप

शिवनगर परिसरात मस्कऱ्या गणपतीची स्थापना करण्यात आली असून, त्यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत. सोमवारी रात्री चिमुकली आईसोबत गणपतीचा देखावा पाहण्यासाठी गेली होती. त्यानंतर आई-वडील जवळच राहणाऱ्या नातेवाइकाकडे गेले. याचदरम्यान शेजारी राहणाऱ्या नारायण वैष्णवने चिमुकलीला तिचे वडील बोलावत असल्याचे सांगून स्वतःच्या घरी नेल्याचा आरोप आहे.

घरातील दिवा बंद करून दरवाजा लावण्याचा प्रयत्न होत असताना चिमुकलीला संशय आला. तिने नारायणच्या हाताला चावा घेत तेथून पळ काढला आणि घरी पोहोचून आई-वडिलांना प्रकार सांगितला.

Nagpur Crime : चार ट्रकांना एकच नंबर; कर्जाच्या जाळ्यातून वाचण्यासाठी बनावट नंबरप्लेटचा फंडा

संतप्त नागरिकांची मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

घटनेची माहिती परिसरात पसरताच काही नागरिक संतप्त झाले. त्यांनी नारायणला घेरून त्याला हातबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पारडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला मेयो रुग्णालयात दाखल केले.

मात्र, उपचारादरम्यान मंगळवारी दुपारी साडेदोनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनेची नोंद करून चिमुकलीसोबत घडलेल्या कथित प्रकारासह नारायणच्या मृत्यूचे नेमके कारण आणि मारहाणीच्या घटनेचा तपास सुरू केला आहे.

मैत्रिणीच्या माध्यमातून ओळख; कॅफेत नेऊन अत्याचार केल्याचा आरोप, धमकीनंतर गरोदरपणाची तपासणी करण्यासाठी दबाव

झटपट न्याय पुन्हा चर्चेत

चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळताच संतप्त नागरिकांनी कायदा हातात घेतल्याचा आरोप आहे.
अलिकडेच बेलतरोडी परिसरातही जमावाच्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे गंभीर आरोप असलेल्या प्रकरणांत कायदा हातात घेण्याची प्रवृत्ती आणि त्यातून होणारे परिणाम पुन्हा चर्चेत आले आहेत.
नारायणचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, है शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Web Title: Nagpur crime shivnagar shaken by allegations of misconduct against a young girl man dies after being beaten by a mob cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nagpur Crime News
  • Nagpur Police Department

संबंधित बातम्या

Janak Marathi Movie : सत्यासाठी पेटणार स्वाभिमानाची लढाई; ‘जनक’च्या मोशन पोस्टरने वेधलं लक्ष
1

Janak Marathi Movie : सत्यासाठी पेटणार स्वाभिमानाची लढाई; ‘जनक’च्या मोशन पोस्टरने वेधलं लक्ष

Nagpur News : दीक्षाभूमीवर २४ तास CCTVचा ‘वॉच’; धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तयारीला मनपा आयुक्तांचा वेग
2

Nagpur News : दीक्षाभूमीवर २४ तास CCTVचा ‘वॉच’; धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तयारीला मनपा आयुक्तांचा वेग

Sanju Rathod Nakhre Song: ‘नखरे’चा मराठी फ्लेवर अन् ईशा-गुरमीतची एनर्जी; संजू राठोडचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
3

Sanju Rathod Nakhre Song: ‘नखरे’चा मराठी फ्लेवर अन् ईशा-गुरमीतची एनर्जी; संजू राठोडचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त
4

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.