Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime : फरार “इक्का” ला २४ तासांत केले जेरबंद

घर फोडींमध्ये फेमस आणि कुख्यात असणारा एक चोर पोलिसांच्या नजरेसमोरून गायब झाला . असा हा गायब होण्याचा प्रकार हा पहिल्यांदाच त्याने केलेला नाही . असे मिळालेल्या माहिती वरून समजते .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Jul 29, 2026 | 03:09 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

▶ नागपूर, क्राईम रिपोर्टर, हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या कोठडीतून पोलिसांना गुंगारा देत पसार झालेला घरफोडीचा सराईत आरोपी इक्का ऊर्फ हर्ष महेंद्र रामटेके (२५) याला अवघ्या २४ तासांत तिरोडा येथून जेरबंद केले, तिरोडा पोलिसांनी त्याला अटक करून हुडकेश्वर पोलिसांच्या स्वाधीन केले. कोठडीतून आरोपी पसार झाल्यानंतर त्याला पुन्हा अटक करणे हे हुडकेश्वर पोलिसांसाठी प्रतिष्ठेचे आव्हान ठरले होते. विविध पथके रात्रंदिवस शोधमोहीम राबवत होती. तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि तिरोडा पोलिसांच्या समन्वयातून आरोपीला पुन्हा जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.

Farmer Suicides : कर्ज माफीत नाव नाही , शेतकऱ्याची आत्महत्त्या : यवतमाळ मध्ये टोकाचे पाऊल
घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केलेला इक्का न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस कोठडीत होता. सोमवारी सकाळी सुमारे ८ वाजता शौचालयाला जाण्याचा बहाणा करून त्याने पोलिस कर्मचाऱ्यांना गुंगारा दिला आणि पळ काढला. या घटनेनंतर हुडकेश्वर पोलिस, गुन्हे शाखा आणि विशेष पथकांनी त्याचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली. आरोपी सुरुवातीला एमआयडीसी परिसरात फिरत होता.
त्यानंतर दुचाकीवरून विविध ठिकाणी फिरून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो मामाच्या गावी तिरोडा येथे जाऊ शकतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

Nagpur : अकरावीवर SIR चा फटका , विद्यार्थ्यांचे नुकसान ..
तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक खबरींच्या आधारे आरोपी तिरोड्यात असल्याचे स्पष्ट झाले. हुडकेश्वर पोलिस तेथे पोहोचण्यापूर्वीच आरोपी पुन्हा पसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी तिरोडा पोलिसांशी संपर्क साधला. उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली तिरोडा पोलिसांनी संभाव्य ठिकाणांवर सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर हुडकेश्वर पोलिसांनी तिरोडा गाठून आरोपीला नागपुरात आणले. आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला पुन्हा अटक केली.

संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाईची टांगती तलवार
पोलिसांच्या माहितीनुसार, इक्का हा सराईत घरफोड्या असून, त्याच्याविरुद्ध नागपूर शहरातील विविध पोलिस ठाण्यांत घरफोडी आणि चोरीचे १९ गुन्हे नोंद आहेत. यापूर्वी १८ मे २०२५ रोजी तो वैद्यकीय रुग्णालयातूनही पोलिसांना चकवा देऊन पसार झाला होता. मात्र, त्यावेळीही पोलिसांनी त्याला दुसऱ्याच दिवशी अटक केली होती. या प्रकरणात पोलिस कोठडीतून आरोपी कसा पसार झाला, याची स्वतंत्र चौकशी करण्यात येणार आहे. निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. आरोपीविरुद्ध पोलिस कोठडीतून पळून गेल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. त्याला न्यायालयात हजर करून पुढील कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

Web Title: Nagpur crime the fugitive ace was arrested within 24 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • Breaking News
  • Crime in Nagpur
  • Criminals

संबंधित बातम्या

Nagpur Crime :नागपुरात इंदूरच्या ‘लाला कंपनी’चा शिरकाव?
1

Nagpur Crime :नागपुरात इंदूरच्या ‘लाला कंपनी’चा शिरकाव?

Nagpur Crime : एकाच फ्लॅटची दोघांना विक्री ,सव्वा कोटींचा गंडा
2

Nagpur Crime : एकाच फ्लॅटची दोघांना विक्री ,सव्वा कोटींचा गंडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.