Raigad News: माथेरानमध्ये १६ नोव्हेंबरपासून पाणी कपात! आठवड्यातून ३ दिवस पाणी बंद, हॉटेल व्यावसायिकांसमोर नवे संकट
माथेरान शहरात येणारे पर्यटक हे दहा लाखाहून अधिक असून यावर्षी पाणी कमी प्रमाणात पडले आहे. त्यामुळे सर्व शहरांनी पाणी कपात केली असून माथेरान शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने शहरात पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. माथेरानमध्ये ब्रिटिश कालीन शालोट लेक असून तेथून पाणी पुरवले जाते, मात्र उल्हास नदीवरून सर्वाधिक पाणी उपसा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करीत असते आणि उल्हास नदीवरून उचलले जाणारे पाणी कुंभे येथून नेरळ, जुम्मापट्टी, वॉटर पाईप पंप हाउस वरून माथेरान शहरात पोहचत असते. एवढा लांबचा प्रवास करून आल्याने माथेरानमध्ये पाणी महाग विकले जाते. (फोटो सौजन्य – AI Created)
देशातील सर्वात जास्त दराने पाणी जीवन प्राधिकरणकडून विकले जाते. मात्र त्याच माथेरानमध्ये आता प्राधिकरणकडून पाणी कपात सूचित केली आहे. उन्हाळी पर्यटन लक्षात घेऊन पाणी नियोजन करण्याचे धोरण निश्चित केले आहे. या पाणी कपातीमुळे पाण्यावर अवलंबून असलेला माथेरान येथील हॉटेल व्यवसाय धोक्यात येऊ शकतो.
सोमवार, बुधवार, शुक्रवार.
जुना मेरी रोड, ऑलम्पिया मेन आणि पीव्हीसी, पार्क व्यू साईट, कोतवाल नगर, संत रोहिदास नगर, छत्रपती शिवाजी महाराज नगर, शेलार गल्ली
मंगळवार, गुरुवार, शनिवार
मुस्लीम मोहल्ला, वाल्मिकी नगर, पार्क व्हा पॉईंट नवीन, मंकी पॉईंट, दस्तुरी, बाजार पीव्हीसी, इंदिरा नगर, ऑलिंपिया एसी
माथेरानमधील सर्व प्रकारचे व्यवसाय हे पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे पाणी कपात येथील पर्यटन व्यवसाय संपुष्टात आणणारा असल्याने सर्व ग्रामस्थांनी बुधवारी एकत्र जमून आवाज उठवण्याचा निर्णय घेऊ आणि त्यामुळे सर्वांनी व्यावसायिक यांनी देखील एकत्र यावे.- शिवाजी शिंदे, नगरसेवक
पाण्याचे नियोजन करावे.. आम्ही शहरातील नागरिक जपूनच पाणी वापरतो, पण पाण्याचे प्रति हजार लिटरचे दर पाहिले तर घाम फुटतो. त्यामुळे जीवन प्राधिकरणाने आधी पाण्याचे नियोजन करावे आणि नंतर पाणी कपात करावे.- चंद्रकांत जाधव, व्यवसायिक
पर्यटक पाण्याचा वापर आस्त करतात. ८०० मी. उंचीवर टँकरने देखील पाणी नेता येणार नाही. उल्हास नदीवरून उन्हाळी हंगामात १८- २० तास पाण्याचा उपसा केला जातो. भविष्याचा विचार करून माथेरानमध्ये पाणी कपात जाहीर केली.






