Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur : भर पावसात वेकोलिच्या खाणीत आग; नेमकं कारण काय?

Nagpur : नागपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू असतानाही वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) च्या एका कोळसा खाण परिसरात आग लागल्याची घटना समोर आली आहे. भर पावसात आग लागल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत असून, या घटनेमागचे नेमके कारण काय, याबाबत चर्चा सुरू आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Jul 31, 2026 | 03:37 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • उपाय न केल्याने पसरतेय आग
  • प्रभावी पाऊले उचलण्यात अकार्यक्षम
  • आगीच्या ज्वाळांमध्ये सुरु कोळसा लोडींग
  • जळालेल्या कोळसा ग्राहकांना पुरवल्याचा आरोप
▶ नागपूर: उमरेड येथील वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (वेकोलि) च्या मकरधोकडा-३ (दिनेश माइन्स) परिसरातील कोळसा साठवण क्षेत्राला आग लागल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहा दिवसांपासून कोळशाला लागलेली आग धुमसत आहे. ती हळूहळू परिसरात पसरत आहे. आग कोळसा साठवून ठेवण्यात येणाऱ्या ठिकाणी लागली आहे. आग लागल्यानंतरही व्यवस्थापनाने ही बाब गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. वेकोलिच्या सुरक्षा व्यवस्थेतील ही गंभीर त्रुटी मानली जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सुरुवातीला आग मर्यादित स्वरूपाची होती. मात्र, वेळेत आवश्यक उपाययोजना न केल्याने पसरत गेली. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रभावी पावले न उचलल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. परिणामी, परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरत असून, प्रदूषणात वाढ झाली आहे. स्थानिकांनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतलेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

नागपूरमध्ये उभारण्यात येणार जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आगीच्या ज्वाळांमध्ये सुरु कोळसा लोडींग

घटनास्थळावरील व्हिडीओमध्ये आगीच्या ज्वाळांजवळ कोळसा डम्परमध्ये भरला जात असल्याचे दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. व्हिडीओमध्ये डम्पर आणि लोडर कार्यरत असून, त्यामध्ये चालक असल्याचेही दिसते. आग लागलेल्या परिसरात यंत्रसामग्री कशी कार्यरत ठेवली, याबाबत व्यवस्थापनाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी होत आहे.

जळालेल्या कोळसा ग्राहकांना पुरवल्याचा आरोप

आग लागलेल्या ठिकाणाहून कोळसा बाहेर काढून त्याचा पुरवठा केला जात असल्याचा आरोप काही ग्राहकांकडून करण्यात आला आहे. काही ग्राहकांनी उच्च दर्जाचा कोळसा मिळावा यासाठी ५० ते १४८ टक्क्यांपर्यंत अधिक दर मोजल्याचा दावा केला आहे. मात्र, त्यानंतरही जळालेला कोळसा पुरविला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Nagpur Crime : फरार “इक्का” ला २४ तासांत केले जेरबंद

‘स्वच्छ नागपूर’चा प्रचार; मुख्यालयातील फलकच जीर्ण
एकीकडे वेकोलिकडून’ स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूर’ आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रचार केला जात असल्याचे दिसून येते. दुसरीकडे मुख्यालय परिसरातील फलक अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याचा दावा केला जात आहे. संबंधित फलक गंजलेला आहे. तो धोकादायक अवस्थेत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. फलकाची तातडीने दुरुस्ती अथवा बदल करण्याची मागणी होत आहे.

 

 

Web Title: Nagpur fire at wcl mine amidst heavy rain what is the exact cause

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • Breaking News
  • Coal india
  • Nagpur

संबंधित बातम्या

Police Bharti: महाराष्ट्र पोलिसात भरती होण्याची मोठी संधी! ८,१०० जागांवर मेगाभरती होणार? वाचा डिटेल्स
1

Police Bharti: महाराष्ट्र पोलिसात भरती होण्याची मोठी संधी! ८,१०० जागांवर मेगाभरती होणार? वाचा डिटेल्स

Nagpur News : बीपीच्या गोळीवरच प्रश्नचिन्ह! मेयोतील ‘टेल्मिसार्टन’ ‘नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी’
2

Nagpur News : बीपीच्या गोळीवरच प्रश्नचिन्ह! मेयोतील ‘टेल्मिसार्टन’ ‘नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी’

Power Crisis In India : देशात अंधाराचे सावट? वीज प्रकल्पांकडे उरला अवघा काही दिवसांचा कोळसा; केंद्राची चिंता वाढली
3

Power Crisis In India : देशात अंधाराचे सावट? वीज प्रकल्पांकडे उरला अवघा काही दिवसांचा कोळसा; केंद्राची चिंता वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.