Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur : साचणाऱ्या पाण्यावर कायमचा तोडगा द्या , हायकोर्टाचा नागपूर मनपाला आदेश !

Nagpur : उड्डाणपूल आणि रस्त्यांचे शहर म्हणून नागपूरने अलीकडच्या काळात नाव कमावले . पण पावसाळ्यात या शहराची झालेली अवस्था बघून कोर्टाने आदेश दिला कि , साचणाऱ्या पाण्यावर कायमचा तोडगा काढा . सबवे , सिमेंटचे रस्ते , आणि सार्वजनिक बांधकाम करताना पाणी जाण्यासाठी व्यवस्थित वाट नसल्याने शहराची हि अवस्था झाल्याचे बोलले जाते .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 01, 2026 | 03:24 PM
फोटो सोजन्य सोशल मीडिया

फोटो सोजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • हायकोर्टाने मागितले मनपाकडे प्रतिज्ञापत्र
  • नाले तुडुंब भरल्याने रस्त्यांवर पाणी
  • जनजीवन मोठ्या प्रमाणात प्रभावित
Nagpur : शहरातील सिमेंट रस्त्यांच्या बांधकामा संदर्भात जनमंचतर्फे जनहित याचिका दाखल करण्यात आली. याचिकेवरील सुनावणीदरम्यान शहरात एक दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या संकटाची हायकोर्टाने गंभीर दखल घेतली. याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिलेल्या आदेशानुसार शुक्रवारी मनपाचे वकील अॅड. जेमिनी कासट यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. मात्र, न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके आणि न्यायमूर्ती निवेदिता मेहता यांनी शहरातील साचणाऱ्या पाण्यावर कायमस्वरूपी उपाययोजनेसह प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.

अँड. कासट यांनी वेळ देण्याची विनंती केल्यानंतर हायकोर्टाने मंगळवारपर्यंतची मुदत देत सुनावणी तहकूब केली. याचिकाकत्यांतर्फे याचिकेत नमूद करण्यात आले की, नियमांना हरताळ फासून सिमेंट रस्त्यांचे बांधकाम केले. परिणामी नागरिकांची घरे रस्त्यांच्या पातळीपेक्षा, खाली गेली. त्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरते. इतकेच नव्हे तर सिमेंट रस्त्यांच्या बांधकामावेळी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज प्रणालीचाही। विचार केला नाही.

Nagpur : विदर्भ साहित्य संघ आपली जागा परत करणार !

नाले तुडुंब भरल्याने रस्त्यांवर पाणी

प्रतिज्ञापत्र सादर करताना मनपातर्फे बाजू मांडणारे अॅड. जैमिनी कासट यांनी न्यायालयाला सांगितले की, नरेंद्रनगर अंडरपासखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. प्रत्यक्षात रिंग रोडचे बांधकाम आणि देखभाल राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. मात्र, शहरात ज्या ठिकाणी पाणी साचले त्या परिसरातील नाले तुडुंब भरल्यामुळे रस्त्यांवर साचलेल्या पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. सोमलवार हायस्कूल परिसरातही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी बराच वेळ लागला. तरीही मनपातर्फे सुरक्षेची पक्की व्यवस्था केली होती.

जनजीवन मोठ्या प्रमाणात प्रभावित

सुनावणीदरम्यान न्यायालयाने टिप्पणी केली की, सततच्या पावसामुळे शाळा, महाविद्यालये, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहेत. विशेषतः २८ जुलैच्या साचलेल्या पाण्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांच्या सुरक्षेवर गंभीर परिणाम झाला. याचिकाकर्ते जनमंच तर्फे .अॅड परवेज मिर्झा आणि अॅड, मृणाल चक्रवर्ती यांनी बाजू मांडली.

NagpurCity: लीजसाठी व्हीएचए ची आयुक्तांकडे धाव,अहवालावर प्रश्नचिन्ह..

झोननिहाय केली कारवाई

प्रतिज्ञापत्रात मनपाने झोननिहाय माहिती न्यायालयासमोर मांडली, त्यामध्ये लक्ष्मीनगर, धरमपेठ, स्वावलंबीनगर आदी भागांतील पाणी साचण्याच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
मनपाने सांगितले की, स्वावलंबीनगरमधील सिमेंट रस्त्यांचे बांधकामही सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे.
काही प्रमाणात सिमेंट रस्त्यांच्या कडेला असलेली स्टॉर्म वॉटर ड्रेनेज प्रणाली पूर्णपणे स्वच्छ नसल्याने पाणी साचणाऱ्याची शक्यता नाकारता येत नाही. हायकोर्टाने कायमस्वरूपी उपायांच्या पर्यायांसह प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.

Web Title: Nagpur high court orders nagpur municipal corporation to provide a permanent solution to waterlogging

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • Court orders
  • Nagpur Flood
  • Nagpur Rain

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.