Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur : दूध ,खाद्यतेल आणि मसाल्यांमध्ये मोठी भेसळ ; ३.४० कोटींहून जास्त माल जप्त !

Nagpur : जिल्ह्यात तुमच्या ताटात येणाऱ्या दूध, खाद्यतेल आणि मसाल्यांच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाने चार महिन्यांत टाकलेल्या धाडींमधून धक्कादायक खुलासे झाले आहेत.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 10, 2026 | 01:11 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • २४ दुग्धजन्य पदार्थ निकृष्ट दर्जाचे
  • दुग्धजन्य पदार्थांचे १७८ नमुने जप्त
  • नियमित तपासणी करणे सुरू
  • आकडेवारीतील भेसळीचे भीषण सत्य
  • महाराष्ट्रात ‘झिरो टॉलरन्स’ मोहीम तीव्र
Nagpur : प्रशासनाच्या दक्षता आणि जागरूकतेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केवळ चार महिन्यांतील कारवायांमधून अन्नपदार्थांमधील मोठ्या प्रमाणावरील भेसळ उघड झाली आहे. विशेषतः सरकारी तपासणीच्या आकडेवारीतून दूध, खाद्यतेल आणि मसाल्यांमध्ये भेसळ होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

Nagpur : मनपाचा ‘तो’ निर्णय कागदावरच , सी आणि डी कचरा व्यवस्थापनाचा दावा फोल; प्रशासनाचे दुर्लक्ष !

मिळालेल्या माहितीनुसार, १ एप्रिल ते ३० जुलै दरम्यान राबवलेल्या विशेष तपासणी मोहिमेतून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. एफडीएच्या तपासणी पथकांनी ३ कोटी ४० लाख ७९ हजार ३२८ रुपयांचे २३ हजार ७७८.४ किलोग्रॅम भेसळयुक्त आणि धोकादायक खाद्यपदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईतील सर्वांत चिंताजनक बाब म्हणजे दुग्धजन्य पदार्थ आणि खाद्यतेलातील भेसळ. शुद्धतेच्या नावाखाली या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार केला जात असल्याचे तपासणीतून समोर आले आहे.

दुग्धजन्य पदार्थांचे १७८ नमुने जप्त

एफडीएच्या आकडेवारीनुसार, चार महिन्यात दुग्धजन्य पदार्थांचे एकूण १७८ नमुने घेतले. त्यापैकी २४ नमुने प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये निकृष्ट दर्जाचे आढळले. विभागाने डेअरी आणि पुरवठादारांकडून ३,९२७, २१४ किमतीचा ४,०८५ किलोग्रॅम संशयित मावा, चीज, लोणी आणि तूप जप्त केले.

Nagpur : महिंद्रा सुसाट, जेएसडब्ल्यू ‘ भटकला ‘ ; महिंद्राला मिळणार ८०० एकर जमीन !

नियमित तपासणी करणे सुरू

एफडीए विभाग अन्न भेसळ रोखण्यासाठी सक्रियपणे काम करीत आहे. पूर्ण जोमाने नियमित तपासणी करीत आहे. आम्ही ग्राहकांना आवाहन करतो की, अन्न भेसळीचा कोणताही संशय आल्यास तत्काळ एफडीएला कळवावे, पोर्टलवर ऑनलाईन तक्रारी देखील दाखल करू शकतात, त्यांच्या तक्रारीवर त्वरित कारवाई केली जाईल.असे आवाहन कृष्णा जयपूरकर, सहआयुक्त, एफडीए नागपूर यांनी केले आहे .

आकडेवारीतील भेसळीचे भीषण सत्य

  • तपासणीसाठी पाठवलेले नमुने : ७०६
  • जप्त मालाचे वजन: २३,७७८.४ किलो
  • जप्त मालाचे एकूण मूल्य ३४,०७९.३२८
  • प्रयोगशाळा चाचणी अहवाल ३४ निकृष्ट दर्जाचे, ३५ चुकीचे लेबल लावलेले
  • ३२ असुरक्षित
  • प्रलंबित अहवाल : ३९४ नमुन्यांचे निकाल अद्याप प्रलंबित आहेत

महाराष्ट्रात ‘झिरो टॉलरन्स’ मोहीम तीव्र

नागपूरमधील ही कारवाई राज्यभरात सुरू असलेल्या व्यापक अन्न सुरक्षा मोहिमेचा भाग आहे. महाराष्ट्रामध्ये अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र अभियानांतर्गत भेसळ करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. भेसळयुक्त दूध, पाम तेलात मिसळलेले खाद्यतेल आणि रसायनेयुक्त मसाल्यांचा काळाबाजार करणा-यांवर एफआयआर दाखल करणे आणि आस्थापना सील करणे यासह कठोर कारवाई केली जात आहे. काही दिवसांत धाडी आणि नमुना तपासणी अधिक तीव्र केली जाईल.

 

Web Title: Nagpur massive adulteration in milk edible oil and spices goods worth over 340 crore seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 01:11 PM

Topics:  

  • FDI
  • food news
  • Food Safety
  • Nagpur News
  • Tukaram Munde

संबंधित बातम्या

पनीरच्या नावावरून देशभर चर्चा; FSSAIचा प्रस्ताव अन् तुकाराम मुंढेंच्या कारवाईला श्रेय देण्याची सोशल मीडियावर चढाओढ
1

पनीरच्या नावावरून देशभर चर्चा; FSSAIचा प्रस्ताव अन् तुकाराम मुंढेंच्या कारवाईला श्रेय देण्याची सोशल मीडियावर चढाओढ

Nagpur News : कोराडी उड्डाणपुलाला ‘ब्लॉक ‘चा ब्रेक
2

Nagpur News : कोराडी उड्डाणपुलाला ‘ब्लॉक ‘चा ब्रेक

Nagpur News : रूफटॉप सोलरधारकांच्या बचतीवर नवा ‘चार्ज’
3

Nagpur News : रूफटॉप सोलरधारकांच्या बचतीवर नवा ‘चार्ज’

Nagpur News :आता चेहरा ओळखताच उघडणार विमानतळाचे गेट
4

Nagpur News :आता चेहरा ओळखताच उघडणार विमानतळाचे गेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.