Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur : मनपाचा ‘तो’ निर्णय कागदावरच , सी आणि डी कचरा व्यवस्थापनाचा दावा फोल; प्रशासनाचे दुर्लक्ष !

Nagpur : पर्यावरण रक्षण आणि बांधकाम व पाडकाम कचऱ्याच्या योग्य व्यवस्थापनासाठी नागपूर महानगरपालिकेने सर्व विकासकामांमध्ये किमान १० टक्के पुनर्प्रक्रिया केलेल्या (रिसायकल) साहित्याचा वापर अनिवार्य केला होता. मात्र, परिपत्रक काढून प्रशासन हे नियम लागू करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 09, 2026 | 04:09 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • या कामांमध्ये वापर केला होता अनिवार्य
  • कडक अटी तरीही अंमलबजावणी शून्य
  • भांडेवाडी प्लांटमधून साहित्याचा पुरवठा
Nagpur Crime : विवाहितेची पोर्तुगाल मध्ये विक्री ;आठ जणांविरुद्ध गुन्हा

Nagpur :  कंत्राटदारांकडून या नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. मनपाचा ‘दणका’ केवळ कागदावरच मर्यादित राहिल्याचे दिसून येत आहे. ‘पर्यावरण (बांधकाम आणि पाडकाम) कचरा व्यवस्थापन नियम २०२५’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मनपाने कंत्राटदारांवर ही अट लादली होती. मात्र, प्रत्यक्ष कामांमध्ये या नियमाचे पालन होत नसल्याचे हा ढिसाळ कारभार असून याची जबाबदारी कोण पुढे येऊन घेईल असे वाटत नाही असे सूत्रांनी सांगितले.

Nagpur : महिंद्रा सुसाट, जेएसडब्ल्यू ‘ भटकला ‘ ; महिंद्राला मिळणार ८०० एकर जमीन !

या कामांमध्ये वापर केला होता अनिवार्य

मनपाच्या नवीन निविदांनुसार गार्डन पाथ-वे, पदपथ (फूटपाथ), ड्रेनेज व सीवर लाईनच्या खोदकामानंतरचे भराव कार्य, बेडिंग वर्क आणि ग्रॅन्युलर सब-बेस यासारख्या कामांमध्ये किमान १० टक्के रिसायकल साहित्य वापरणे बंधनकारक करण्यात आले होते.

कडक अटी तरीही अंमलबजावणी शून्य

नियमानुसार, कंत्राटदारांना भाडेवाडी प्लांटमधून खरेदी केलेले पावती बिल सादर केल्याशिवाय आणि संबंधित अभियंत्याने १० टक्के वापराचे प्रमाणपत्र दिल्यास अंतिम देयक दिले जाणार नव्हते. तसेच प्लांटमध्ये साहित्य उपलब्ध नसल्यास चालकाला दरमहा व्हीएनआयटीकडून चाचणी अहवाल आणि साहित्यांचे दरपत्रक मनपाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या सर्व कड़क अटी कागदावरच राहिल्याने नैसर्गिक संसाधनांची बचत आणि कचरा व्यवस्थापनाचा उद्देश धुळीस मिळाला आहे.

Nagpur : १३ ऑगस्टला हॉकीचे अस्तित्व संपणार ; भवितव्यावर प्रश्नचिन्ह

भांडेवाडी प्लांटमधून साहित्याचा पुरवठा

  1. मनपाने मे. हैदराबाद सी अॅण्ड डी वेस्ट प्रा. लिमिटेडच्या सहकार्याने भांडेवाडी येथे १५० टन दैनंदिन क्षमतेचा प्रक्रिया केंद्र सुरू केला आहे.
  2. या प्लांटमध्ये बारीक वाळू, जाड वाळू, १० मिमी, २० मिमी व ४० मिमी गिट्टी आणि चिकणी माती यांसारखे पुनर्प्रक्रियेतून तयार केलेले साहित्य उपलब्ध आहे.
  3. व्हीएनआयटीकडून या साहित्याची गुणवत्ता तपासण्यात आली असून, कंत्राटदारांना येथूनच साहित्य खरेदी करणे अनिवार्य करण्यात आले होते.
 

Web Title: Nagpur municipal corporations decision remains only on paper claims regarding c and d construction and demolition waste management prove hollow administration remains negligent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 04:09 PM

Topics:  

  • Nagpur
  • Nagpur Municipal Corporation
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur News : कोराडी उड्डाणपुलाला ‘ब्लॉक ‘चा ब्रेक
1

Nagpur News : कोराडी उड्डाणपुलाला ‘ब्लॉक ‘चा ब्रेक

Nagpur News : रूफटॉप सोलरधारकांच्या बचतीवर नवा ‘चार्ज’
2

Nagpur News : रूफटॉप सोलरधारकांच्या बचतीवर नवा ‘चार्ज’

Nagpur News :आता चेहरा ओळखताच उघडणार विमानतळाचे गेट
3

Nagpur News :आता चेहरा ओळखताच उघडणार विमानतळाचे गेट

सराईताने स्वत:च्या आईवरच केला चाकूने हल्ला; दारूसाठी पैसे न मिळाल्याने चांगलाच संतापला
4

सराईताने स्वत:च्या आईवरच केला चाकूने हल्ला; दारूसाठी पैसे न मिळाल्याने चांगलाच संतापला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.