Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News :दत्ता मेघे इन्स्टिट्यूट झाले अदानीचे

Nagpur News : दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चला आता ‘अदानी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च’ हे नवे नाव मिळाले आहे. या नामकरणाला UGCची मंजुरी मिळाली असून, नागपूर आणि वर्धा येथील वैद्यकीय शिक्षण व आरोग्य सेवांच्या विस्तारासाठी अदानी समूहाकडून निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 27, 2026 | 03:56 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • वर्ध्यात आरोग्य केंद्र उभारणार
  • दरवर्षी १०० कोटींची करणार गुंतवणूक
  • ग्रामीण आणि वंचित समुदायांवर लक्ष केंद्रित करणे
Nagpur News : नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये स्थित असलेल्या दत्ता मेघे इन्स्टट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चचे नाव आता बदलून अदानी इनस्टट्यूट ऑफ डायर एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर असे ठेवण्यात येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) संस्थेच्या नवीन नावाला मंजुरी दिली आहे. ही माहिती संस्थेचे कुलगुरू डॉ. ललित भूषण वाघमारे आणि मुख्य सेवा अधिकारी रवींद्र मेहेरे यांनी दिली.

दत्ता मेघे यांनी १९९० मध्ये या संस्थेची स्थापना किली. वैद्यकीय महाविद्यालय महणून सुरू झालेली ही संस्था आता नागपूर आणि वर्धा येथे कॅम्पससह एक बहुशाखीय विद्यापीठ म्हणून विस्तारली आहे. या नवीन नावामुळे अदानी फाउंडेशन आणि डीएमआयएचईआर चांच्यातील सहकार्याला एक नवीन दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. हा उपक्रम परवडणारे शिक्षण आणि दर्जेदार आरोग्यसेवा प्रदान करण्यासाठी उत्कृष्टता केंद्रे विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करेल.

Nagpur News : जिल्ह्यातील १४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित

ग्रामीण आणि वंचित समुदायांवर लक्ष केंद्रित करणे

डॉ. वाघमारे यांनी सांगितले की, दर्जेदार शिक्षण आणि संवेदनशील आरोग्यसेवा देण्याची संस्थेची वचनबद्धता कायम राहील. ग्रामीण भाग आणि वंचित समुदायांसोबत काम करण्यावर विशेष भर दिला जाईल. याव्यतिरिक्त, संशोधन मजबूत करण्यासाठी, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी आणि विद्यार्थी, प्राध्यापक,संशोधक, रुग्ण आणि समाजातील विविध घटकांना नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.

रवींद्र मेहेरे यांनी सांगितले की, आरोग्यसेवा शिक्षण आणि आरोग्यसेवेला पुढील स्तरावर नेण्याच्या या उपक्रमाला प्रीती अदानीदेखील पाठिंबा देतील.

Nagpur News : कोराडी उड्डाणपुलाला ‘ब्लॉक ‘चा ब्रेक

वर्ध्यात आरोग्य केंद्र उभारणार

अदानी सोशल फाऊंडेशन आरोग्य क्षेत्रातील संशोधन मजबूत करण्यावर विशेष भर देईल. डॉ. वाघमारे यांच्या मते, नागपूरमध्ये पुरेशा संशोधन जागेच्या अभावामुळे, येथे प्रामुख्याने उपचार सेवांवर लक्ष केंद्रित केले जाईल. दरम्यान, वर्ध्यात संशोधनासाठी पुरेशी जमीन उपलब्ध असल्याने, तेथे एक मोठे आरोग्य संशोधन केंद्र विकसित करण्याची योजना आहे.

दरवर्षी १०० कोटींची करणार गुंतवणूक

त्यांनी सांगितले की, दत्ता मेघे डेंटल कॉलेजमध्ये आधीच १०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. नागपूर आणि वर्धा या दोन्ही कॅम्पसमध्ये मिळून दरवर्षी अंदाजे १०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. यापैकी, अंदाजे ५५ कोटी रुपयांची अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे.

जागतिक दर्जाची उपकरणे आणि अनुभवी प्राध्यापक उपलब्ध करून देण्यावरही संस्था लक्ष केंद्रित करेल, दत्ता मेघे इर्नस्टट्यूट आणि अदानी फाऊंडेशन यांच्यातील करारानुसार, ‘शून्य व्यवस्थापन प्रणाली ‘द्वारे काम केले जाईल, यामध्ये रुग्णांना प्रथम, त्यानंतर विद्यार्थी, कर्मचारी आणि स्थानिक रोजगाराला प्राधान्य दिले जाईल, संस्थेने असेही सांगितले की, आतापर्यंत विद्यार्थ्यांना अंदाजे ६० कोटी रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे.

Web Title: Nagpur news datta meghe institute acquired by adani

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • Adani News
  • Marathi News
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur News :स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांची १० कोटींची बचत; दिवसा वीज वापरावर प्रति युनिट ८५ पैसे सवलत
1

Nagpur News :स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांची १० कोटींची बचत; दिवसा वीज वापरावर प्रति युनिट ८५ पैसे सवलत

Chandrapur News: दिवाळी संपली, आता निवडणुका कधी? इच्छुक उमेदवारांची तयारी सुरू, ग्रामीण भागात चर्चांना वेग
2

Chandrapur News: दिवाळी संपली, आता निवडणुका कधी? इच्छुक उमेदवारांची तयारी सुरू, ग्रामीण भागात चर्चांना वेग

Nagpur News : १४.१३ कोटींचा प्रकल्प अमृत २.० मधून वगळण्याची मनपाची तयारी; अतिक्रमणांमुळे लेंडी तलावाच्या पुनरुज्जीवनाला खीळ
3

Nagpur News : १४.१३ कोटींचा प्रकल्प अमृत २.० मधून वगळण्याची मनपाची तयारी; अतिक्रमणांमुळे लेंडी तलावाच्या पुनरुज्जीवनाला खीळ

सांगलीतील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहाची दुरवस्था; रंगमंचापासून स्वच्छतागृहापर्यंत सगळेच खराब
4

सांगलीतील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहाची दुरवस्था; रंगमंचापासून स्वच्छतागृहापर्यंत सगळेच खराब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.