Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : झोनवाढीवरून सभागृहात ‘भारत माता’ विरुद्ध ‘जय संविधान’; घोषणांनी वातावरण तापले

Nagpur News : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी झोनची संख्या वाढविण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. तसेच महापौरांनी दहा मिनिटासाठी सभागृह तहकूब केले .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 11, 2026 | 03:11 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • सभागृहात संविधानाची प्रत
  • झोनवाढीचा प्रस्ताव कि राजकीय डाव
  • संसाधनांचा अभाव आणि अधिकाऱ्यांवर अतिरिक्त भार
Nagpur News :शहरातील विद्यमान झोनमध्येच अधिकारी कर्मचाऱ्यांची कमतरता असताना नव्या झोनची निर्मिती करण्याची गरज काय, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. या मुद्द्यावरून सदस्यांमध्ये शाब्दिक वाद झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली.

सत्ताधारी सदस्यांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. त्यास प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट, मुस्लिम लीग आणि एमआयएमच्या सदस्यांनी ‘जय संविधान’च्या घोषणा सुरू केल्या. त्यामुळे उडालेला गोंधळ लक्षात घेता महापौर निता ठाकरे यांनी सभा दहा मिनिटांसाठी तहकूब केली. सदर येथील नियोजन भवनात झालेल्या सभेत सत्ताधारी पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक बंडू राऊत यांनी झोनवाढीचा विषय उपस्थित केला. शहरात दहा झोनची रचना २००२ मध्ये केली होती.

Nagpur News : नागपूरच्या ग्रँडमास्टरची ऐतिहासिक कामगिरी ;रौनक ठरला शेल्डेमोंड आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ विजेता !

त्यानंतर महापालिका हद्दीत अनेक गावांचा समावेश झाला असून शहराची लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढते क्षेत्रफळ आणि लोकसंख्या लक्षात घेता प्रशासनाच्या दृष्टीने आणखी किती झोन आवश्यक आहेत, याचा अभ्यास करून त्याबाबतचा अहवाल पुढील सभेत मांडावा, अशी मागणी राऊत यांनी केली. या मागणीला विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. मुस्लिम लीगचे असलम खान आणि काँग्रेसचे शैलेश पांडे यांनी सध्याच्या दहा झोनमध्येच पुरेसे अधिकारी व कर्मचारी उपलब्ध नसल्याचे सांगितले.

सभागृहात संविधानाची प्रत

विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनीही झोनवाढीवरून भाजपला लक्ष्य केले. अनेक वर्षे महापालिकेत भाजपची सत्ता असताना झोनची संख्या वाढविण्याची आवश्यकता का जाणवली नाही, असा सवाल त्यांनी केला. हा विषय सभागृहाच्या पटलावर आणू नये, अशी मागणी होताच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यानंतर सत्ताधा-यांनी ‘भारत माता की जय च्या घोषणा दिल्या.

झोनवाढीचा प्रस्ताव कि राजकीय डाव

झोनची संख्या वाढवून काँग्रेसच्या झोन सभापतींना पदावरून हटविण्याचा राजकीय डाव असल्याचा आरोपही काँग्रेस सदस्यांनी केला. अखेर महापौर निता ठाकरे यांनी सध्या केवळ विषय चर्चेत असून त्याबाबत कोणताही औपचारिक प्रस्ताव आलेला नसल्याचे स्पष्ट केले. प्रशासनाने पुढील सभेत झोनवाढीचा सविस्तर प्रस्ताव सादर करावा.

Nagpur : दूध ,खाद्यतेल आणि मसाल्यांमध्ये मोठी भेसळ ; ३.४० कोटींहून जास्त माल जप्त !

संसाधनांचा अभाव आणि अधिकाऱ्यांवर अतिरिक्त भार

नगरसेवक आभा पांडे यांनी प्रत्यक्षातील वस्तुस्थिती मांडली. त्यांनी सांगितले की, सध्या प्रत्येक झोन अंतर्गत ४ प्रभाग आणि १६ नगरसेवक येतात, मात्र साफसफाईसाठी गाड्या आणि कर्मचारीच उपलब्ध नाहीत. सहायक आयुक्तांकडे कचरा उचलण्यासाठी अतिरिक्त ट्रक उपलब्ध करून देण्याइतके अधिकार नाहीत.

Web Title: Nagpur news jai constitution against bharat mata in the house over zoning the announcements heated up the atmosphere

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • Nagpur Municipal Corporation
  • Nagpur News
  • Nagpur Politics

संबंधित बातम्या

Nagpur District : पावसाने पाठ फिरवली, धरणे आटली; पाच प्रमुख जलाशयांत केवळ ६१% पाणीसाठा
1

Nagpur District : पावसाने पाठ फिरवली, धरणे आटली; पाच प्रमुख जलाशयांत केवळ ६१% पाणीसाठा

Nagpur News : तायडे पकडला, मेश्राम निसटला; २० हजारांची लाच गेली कुठे?
2

Nagpur News : तायडे पकडला, मेश्राम निसटला; २० हजारांची लाच गेली कुठे?

Nagpur Protest : शिक्षकांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू
3

Nagpur Protest : शिक्षकांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू

Nagpur News :इमारत-उपकरणे सज्ज; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल रखडले, आता ३ महिन्यांची नवी मुदत
4

Nagpur News :इमारत-उपकरणे सज्ज; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल रखडले, आता ३ महिन्यांची नवी मुदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.