Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : जन्म-मृत्यू नोंदींसाठी महापालिकेची धावपळ; ५ हजारांवर अर्ज प्रलंबित, तीन शिफ्टमध्ये २४ तास कामकाज

Nagpur News : नागपूर महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागातील प्रलंबित अर्जांचा निपटारा करण्यासाठी प्रशासनाने २४ बाय ७ कामकाज सुरू केले आहे. तीन शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, पाच हजारांहून अधिक प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आव्हान विभागासमोर आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 12, 2026 | 02:43 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • १२० वर्षाच्या नोंदींचे आव्हान
  • सीआरएस पोर्टलमुळे काम संथ
  • अधिक लॉगिंसाठी केंद्राकडे पाठपुरावा
Nagpur News : महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाने आत्ता ‘२४ बाय ७’ कामकाज सुरू केले आहे. प्रलंबित अर्जाचा वाढता आकडा लक्षात घेता मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी कामकाजाला गती देण्याचे निर्देश दिले. त्यानंतर विभागाची जबाबदारी सांभाळणारे डॉ. गोवर्धन नवघरे यांनी तातडीने नियोजन करून कर्मचाऱ्यांच्या तीन शिफ्ट तयार केल्या आहेत. प्रत्येक शिफ्टमध्ये तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

प्रत्येक शिफ्ट आठ तासांची आहे. एका प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी साधारणतः चार कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. मात्र, सध्या तीन कर्मचाऱ्यांच्या मदतीने कामकाज केले जात आहे. रविवारी एकच पथक कार्यरत राहते तर उर्वरित दोन पथकांना विश्रांती दिली जाते. जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी दररोज सुमारे १०० अर्ज प्राप्त होत असताना केवळ ४० अर्जाचाच निपटारा होत आहे. त्यामुळे प्रलंबित अर्जाची संख्या पाच हजारांवर पोहोचली आहे. नव्या बारकोडयुक्त प्रमाणपत्रासाठी नागरिकांना १५ ते २० दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे.

१२० वर्षाच्या नोंदींचे आव्हान

डॉ.नवघरे यांच्या माहितीनुसार, २०१६ नंतरच्या जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी अर्जाची प्रक्रिया तुलनेने सुरळीत सुरू आहे. मात्र, २०१६ पूर्वीच्या नोंदी शोधण्याचे मोठे आव्हान आहे. तब्बल १२० वर्षांपर्यंतच्या जुन्या नोंदी तपासून प्रमाणपत्रे द्यावी लागत आहेत.

जुन्या काळात जन्मलेल्या किंवा मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनाही विविध शासकीय व वैयक्तिक कामांसाठी प्रमाणपत्रांची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे जुन्या नोंदी शोधणे आणि त्यांची पडताळणी करणे यामध्ये कर्मचाऱ्यांचा मोठा वेळ खर्च होत आहे.

Nagpur Sports : ‘त्या’ हॉकी मैदानावरच आता स्पर्धा

सीआरएस पोर्टलमुळे काम संथ

संथ जन्म-मृत्यू नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि बनावट प्रमाणपत्रांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेली सीआरएस (सेंट्रल रजिस्ट्रेशन सिस्टीम) पोर्टल व्यवस्था मनपासाठी अडचणीची ठरत आहे. यापूर्वी जन्म-मृत्यू विभागात प्रमाणपत्र प्रक्रियेसाठी पाच लॉगिन उपलब्ध होते.

मात्र, नवीन प्रणालीत सध्या केवळ एकच लॉगिन उपलब्ध असल्याने कामकाजाची गती मंदावली आहे. त्यातच प्रत्येक प्रमाणपत्राला मंजुरी देण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर येणारा ओटीपी आवश्यक असतो. ओटीपी मिळविणे आणि पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सुमारे १० ते १५ मिनिटे लागतात. परिणामी, दररोज प्राप्त होणाऱ्या अर्जाचा वेळेत निपटारा करणे कठीण होत आहे.

Nagpur News : पुन्हा २४ तास शटडाऊन ;काटकसरीचा दिला सल्ला; मनपा-ओसीडब्ल्यूचे अपयश

अधिक लॉगिंसाठी केंद्राकडे पाठपुरावा

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांच्या विलंबाचा मुद्दा सप्टेंबरमध्ये झालेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी उपस्थित केला होता. एकाच लॉगिनमुळे नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. आता आयुक्तांनीही या समस्येची गंभीर दखल घेतली आहे. अधिक लॉगिन उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Nagpur news municipal corporation scrambles to handle birth and death registrations over 5000 applications pending operations running round the clock in three shiftscp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nagpur Municipal Corporation
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Chandrapur News: चिमूरमध्ये पाणी, वीज आणि अनुदानाचे प्रश्न प्रलंबित; अशोक चौधरींचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
1

Chandrapur News: चिमूरमध्ये पाणी, वीज आणि अनुदानाचे प्रश्न प्रलंबित; अशोक चौधरींचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Dhule News: “मागण्या मान्य होईपर्यंत तलावातून बाहेर पडणार नाही!” धुळ्यात शेकडो आदिवासींचे जलसमाधी आंदोलन
2

Dhule News: “मागण्या मान्य होईपर्यंत तलावातून बाहेर पडणार नाही!” धुळ्यात शेकडो आदिवासींचे जलसमाधी आंदोलन

Sindhudurg News: देवगडमध्ये ‘काय गो देवगड’ बोटिंग प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध! मच्छीमारी व्यवसायावर परिणाम होण्याची भीती
3

Sindhudurg News: देवगडमध्ये ‘काय गो देवगड’ बोटिंग प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध! मच्छीमारी व्यवसायावर परिणाम होण्याची भीती

Darjeelingमध्ये Toy Train आणि स्कूटीची टक्कर! VIDEO पाहून नेटकऱ्यांचं भन्नाट उत्तर, ‘चूक पटरीची!’
4

Darjeelingमध्ये Toy Train आणि स्कूटीची टक्कर! VIDEO पाहून नेटकऱ्यांचं भन्नाट उत्तर, ‘चूक पटरीची!’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.