Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Darjeelingमध्ये Toy Train आणि स्कूटीची टक्कर! VIDEO पाहून नेटकऱ्यांचं भन्नाट उत्तर, ‘चूक पटरीची!’

Darjeeling: पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथील प्रसिद्ध टॉय ट्रेनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अरुंद रस्त्याच्या बाजूने जाणारी टॉय ट्रेन प्रथम एका कारला आणि त्यानंतर एका स्कूटरला धडक देताना दिसते. धडकेमुळे स्कूटरवरील दोघेही खाली पडतात आणि स्कूटरचे नुकसान होते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 12, 2026 | 01:12 PM
Darjeeling (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Darjeeling (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • दार्जिलिंगच्या टॉय ट्रेनचा व्हिडिओ
  • अरुंद रस्त्यावरून जाताना टॉय ट्रेन प्रथम एका कारला धडकते.
  • त्यानंतर ट्रेन स्कूटरला धडकते आणि त्यावरील दोघेही खाली पडतात.
Darjeeling Toy Train Viral Video: पश्चिम बंगालमधले दार्जिलिंग हे सगळ्यांचे आवडते ठिकाण आहे. तिथे गेल्यावर टॉय ट्रेनमध्ये न बसणारा माणूस सापडणार नाही. ही टॉय ट्रेन तर युनेस्कोने पण जागतिक वारसा म्हणून घोषित केली आहे. पण याच टॉय ट्रेनचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये टॉय ट्रेन एका कारला आणि एका स्कूटरला धडक देते आणि स्कूटरवर बसलेले जोडपे खाली पडते. हा व्हिडिओ बघून लोक हसत पण आहेत आणि सुरक्षेचा प्रश्न पण विचारत आहेत. Darjeeling

व्हायरल व्हिडिओत काय आहे?

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर @sarfiratittoo.ig नावाच्या अकाउंटवरून टाकला गेला आहे. व्हिडिओत दिसते की रस्ता खूपच अरुंद आहे आणि रस्त्याच्या अगदी बाजूलाच रेल्वेचा ट्रॅक आहे. रस्त्यावर गाड्या उभ्या आहेत आणि काही चालत आहेत.तेवढ्यात मागून दार्जिलिंगची फेमस टॉय ट्रेन येते. ट्रेन येताना पहिला कारला धक्का लागतो. त्यांनतर लगेच ती बाजूला असलेल्या एका स्कूटरला ती जोरात धडकते. धडक बसताच स्कूटरवरचे दोघेही खाली पडतात आणि स्कूटरचे पण नुकसान होते. हे सगळे बघून ट्रेनमधले प्रवासी आणि रस्त्यावरचे लोक पण घाबरतात. धडक लागल्यावर ट्रेन पण लगेच थांबते.

खरतर दार्जिलिंगमध्ये असा प्रकार नवीन नाही. तिथे डोंगराळ भाग असल्यामुळे ट्रॅक आणि रस्ता एकदम जवळ आहे. थोडी जरी गाडी ट्रॅकच्या जवळ आली तरी अपघात होण्याची शक्यता असते.

लोकांच्या भारी कमेंट्स

या व्हिडिओवर लोकांनी खूपच मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले आहे की, “ही चूक रेल्वेच्या रुळाची आहे, रुळच खूप पुढे टाकले आहेत.”दुसरा म्हणतो, “अरे ट्रेन ड्रायव्हरने थोडे बाजूला घ्यायचे होते ना, तो सरळ का आला?”तिसरा म्हणतो, “ट्रेनने हॉर्न वाजवून बाजूने जायला पाहिजे होते.”अशा कमेंट्स वाचून हसू येते, पण यातून एक गंभीर प्रश्न पण उभा राहतो.

Paris Youth in Mumbai: मुंबईत फक्त 21 दिवस राहिला अन् Paris च्या तरुणाला उमगलं शहराचं गुपित! म्हणतो, ‘इथे…’

लोक विचारत आहेत की प्रशासन अशी वाहने ट्रॅकच्या इतक्या जवळ कशी येऊ देते? तिथे बॅरिकेट्स का नाहीत? सूचना फलक का नाहीत? जर असेच होत राहिले तर मोठा अपघात होऊ शकतो.अजून तरी या घटनेत कोणी जखमी झाले आहे का, किती नुकसान झाले आहे याची माहिती समोर आली नाही. तसेच स्थानिक प्रशासनाने पण यावर काही बोलले नाही.

टॉय ट्रेनबद्दल

दार्जिलिंग टॉय ट्रेन ही खूप जुनी आहे. ती छोट्या रुळावरून धावते, त्याला नॅरो गेज म्हणतात. ती डोंगरातून, रस्त्याच्या मधून जाते म्हणूनच पर्यटकांना ती खूप आवडते. पण हेच तिचे वैशिष्ट्य आता धोक्याचे बनत आहे. रस्ता आणि ट्रॅकमध्ये जागाच नसल्यामुळे अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. आधी पण अनेक गाड्या ट्रॅकजवळ लावल्याने अपघात झाले आहेत.

पाठीवर लेकरू आणि हातात कष्टांची जबाबदारी, मातेच्या अफाट जिद्दीने पाझरवले नेटकऱ्यांचे डोळे; Video Viral

त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन योग्य ते अडथळे लावले पाहिजेत, जेणेकरून पुन्हा असे होणार नाही. व्हिडिओ जरी मजेशीर वाटत असला तरी सुरक्षेचा मुद्दा महत्वाचा आहे.

Web Title: Darjeeling toy train viral video car scooter collision rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 01:12 PM

Topics:  

  • Marathi News
  • shocking viral news
  • West bengal

संबंधित बातम्या

Paris Youth in Mumbai: मुंबईत फक्त 21 दिवस राहिला अन् Paris च्या तरुणाला उमगलं शहराचं गुपित! म्हणतो, ‘इथे…’
1

Paris Youth in Mumbai: मुंबईत फक्त 21 दिवस राहिला अन् Paris च्या तरुणाला उमगलं शहराचं गुपित! म्हणतो, ‘इथे…’

World Energy Crisis : जगाची ८१% ऊर्जा अजूनही जीवाश्म इंधनांवर; युद्धामुळे पुरवठ्याची चिंता वाढली
2

World Energy Crisis : जगाची ८१% ऊर्जा अजूनही जीवाश्म इंधनांवर; युद्धामुळे पुरवठ्याची चिंता वाढली

Wai News : मांढरगडावर आदिशक्तीचा जागर! काळूबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ
3

Wai News : मांढरगडावर आदिशक्तीचा जागर! काळूबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ

Baramati News :सोमेश्वर कारखाना मतमोजणीचा वाहतुकीला फटका; शारदानगर ते राजहंस चौक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करा!
4

Baramati News :सोमेश्वर कारखाना मतमोजणीचा वाहतुकीला फटका; शारदानगर ते राजहंस चौक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.