Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: चिमूरमध्ये पाणी, वीज आणि अनुदानाचे प्रश्न प्रलंबित; अशोक चौधरींचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

शेतकरी पुत्र अशोक चौधरी यांनी पुढाकार घेत जिल्हाधिकारी वसुमना पंत यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यामध्ये निराधार, वृद्ध आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित समस्या, जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न मार्गी लावण्याची विनंती करण्यात आली.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 12, 2026 | 02:53 PM
Chandrapur News: चिमूरमध्ये पाणी, वीज आणि अनुदानाचे प्रश्न प्रलंबित; अशोक चौधरींचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Chandrapur News: चिमूरमध्ये पाणी, वीज आणि अनुदानाचे प्रश्न प्रलंबित; अशोक चौधरींचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Follow Us
Follow Us:
  • पाणीपुरवठा योजना सुरू होऊन जवळपास ३ वर्षे झाली असतानाही ग्रामस्थांना अपेक्षित लाभ मिळाला नाही
  • समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
  • वृद्ध साहित्यिक व कलाकारांच्या मानधनाचा प्रश्न उपस्थित
चिमूर: शेतकऱ्यांच्या पिकांचा प्रश्न असो, शेतमजुरांच्या अडचणी असोत किंवा निराधार, वृद्ध आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित समस्या, जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेतकरी पुत्र अशोक चौधरी यांनी पुढाकार घेतला आहे. शेतकरी व शेतमजुरांच्या विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यामध्ये रखडलेली पाणीपुरवठा योजना, कृषी पंपांचा खंडित वीजपुरवठा, ग्रामीण भागातील पाणीटंचाई, निराधारांचे प्रलंबित अनुदान आणि वृद्ध साहित्यिक व कलाकारांच्या मानधनाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.

Crime News: ‘टेम्पो हळू चालवा’ म्हटल्याचा राग; वराळेत दोन गटांत तुफान हाणामारी, एकाच्या डोक्याला ९ टाके

शंकरपूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाणीपुरवठा योजना सुरू होऊन जवळपास ३ वर्षे झाली असतानाही ग्रामस्थांना अपेक्षित लाभ मिळत नसल्याचा मुद्दा चौधरी यांनी उपस्थित केला. योजनेच्या कामाची सखोल चौकशी करून अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत आणि गावात नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी त्यांनी केली.  (फोटो सौजन्य – AI Created) 

पावसाच्या अनिश्चिततेमुळे धान पिकाला सिंचनाची गरज असताना कृषी पंपांचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले आहे. उभ्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतीला आवश्यक वीजपुरवठा सुरळीत व नियमित करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

चिमूर तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच विहिरी व पाइपलाइनची दुरुस्ती, बंद पडलेले पंप कार्यान्वित करणे, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि पशुधनासाठी पाण्याची व्यवस्था करण्यावरही भर देण्यात आला. जनतेला केवळ आश्वासन नको, तर त्यांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष उपाय हवा. शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठीचा आमचा लढा अविरतपणे सुरू राहील.,” अशी भूमिका अशोक चौधरी यांनी मांडली. आता प्रशासन या मागण्यांवर किती तत्परतेने कार्यवाही करते, याकडे शेतकरी, लाभार्थी आणि ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

शंकरपूर येथील वृद्ध साहित्यिक आणि कलाकारांनी मागील वर्षी मानधनासाठी अर्ज केले असतानाही त्यांना अद्याप लाभ मिळाला नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. संबंधित अर्जाची चौकशी करून पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार मानधन मंजूर करावे, अशी मागणी करण्यात आली.

आश्वासनानंतर आता कार्यवाहीकडे लक्ष

पाणी, वीज, शेती, सामाजिक सुरक्षा अनुदान आणि वृद्ध कलाकारांचे मानधन हे प्रश्न नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहेत. त्यामुळे संबंधित विभागांनी या समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी समस्यांची दखल घेतल्याबद्दल अशोक चौधरी यांनी आभार मानले. मात्र, प्रश्न मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

DCM Eknath Shinde : देवीच्या चरणी बळीराजासाठी साकडे; दुष्काळात सरकार खंबीरपणे पाठीशी – एकनाथ शिंदे

तीन महिन्यांपासून – अनुदानाची प्रतीक्षा

चिमूर तालुक्यातील निराधार, वृद्ध आणि विधवा लाभार्थ्यांचे मागील तीन महिन्यांपासून प्रलंबित असलेले अनुदान तातडीने त्यांच्या बँक खात्यांत जमा करावे, अशी मागणी चौधरी यांनी केली. यापुढे लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपूर्वी अनुदान मिळेल, यासाठी ठोस व्यवस्था करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Farmers farm workers and pensioners issues raised as ashok chaudhary submits memorandum to chandrapur collector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Nagpur News : जन्म-मृत्यू नोंदींसाठी महापालिकेची धावपळ; ५ हजारांवर अर्ज प्रलंबित, तीन शिफ्टमध्ये २४ तास कामकाज
1

Nagpur News : जन्म-मृत्यू नोंदींसाठी महापालिकेची धावपळ; ५ हजारांवर अर्ज प्रलंबित, तीन शिफ्टमध्ये २४ तास कामकाज

Dhule News: “मागण्या मान्य होईपर्यंत तलावातून बाहेर पडणार नाही!” धुळ्यात शेकडो आदिवासींचे जलसमाधी आंदोलन
2

Dhule News: “मागण्या मान्य होईपर्यंत तलावातून बाहेर पडणार नाही!” धुळ्यात शेकडो आदिवासींचे जलसमाधी आंदोलन

Sindhudurg News: देवगडमध्ये ‘काय गो देवगड’ बोटिंग प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध! मच्छीमारी व्यवसायावर परिणाम होण्याची भीती
3

Sindhudurg News: देवगडमध्ये ‘काय गो देवगड’ बोटिंग प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध! मच्छीमारी व्यवसायावर परिणाम होण्याची भीती

Darjeelingमध्ये Toy Train आणि स्कूटीची टक्कर! VIDEO पाहून नेटकऱ्यांचं भन्नाट उत्तर, ‘चूक पटरीची!’
4

Darjeelingमध्ये Toy Train आणि स्कूटीची टक्कर! VIDEO पाहून नेटकऱ्यांचं भन्नाट उत्तर, ‘चूक पटरीची!’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.