Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : कागदी आदेश झुगारला; प्रत्यक्ष जप्ती करा, हायकोर्टाचा दणका

Nagpur News : कागदी आदेश काढून कारवाई झाल्याचे दाखवू नका, तर प्रत्यक्ष जप्तीची प्रक्रिया राबवा, अशा कडक शब्दांत नागपूर खंडपीठाने प्रशासनाला सुनावले. न्यायालयाच्या या भूमिकेमुळे संबंधित प्रकरणातील कारवाईला वेग येण्याची शक्यता आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 12, 2026 | 02:36 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • १ नोव्हेंबरपर्यंत डीजे आणि मॉडिफाय वाहनांवर पूर्ण बंदी
  • न्यायालयाची महत्त्वाची निरीक्षणे
  • पोळा मिरवणुकीतील व्हिडीओने उघड केली पोलखोल
Nagpur News : सण-उत्सवांच्या काळात वाजणाऱ्या बेकायदेशीर आणि कानठळ्या बसवणाऱ्या डीजे तसेच साऊंड सिस्टीमवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. केवळ मनाई आदेश किंवा अधिसूचना काढल्याने ध्वनीप्रदूषणाची समस्या सुटणार नाही, असे स्पष्ट करीत न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठाने पोलिसांना मैदानावर उतरून थेट उपकरणे जप्त करण्याचे व कडक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहे. नियम मोडणाऱ्या डीजे चालकांसह उत्सव आयोजकांवरही गुन्हे दाखल करण्याचे संकेत कोर्टाने दिले आहे.

१ नोव्हेंबरपर्यंत डीजे आणि मॉडिफाय वाहनांवर पूर्ण बंदी

सुनावणीदरम्यान पोलिस प्रशासनाने न्यायालयात शपथपत्र सादर करून माहिती दिली की, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३च्या कलम १६३ अन्वये २ सप्टेंबरला अधिसूचना काढली आहे. यानुसार आगामी दहीहंडी, पोळा, गणेशोत्सव, दुर्गापूजा, ताजुद्दीन बाबा उरूस आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर ३ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून १ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत सर्व प्रकारचे डीजे, मल्टी-स्पीकर, प्लाझ्मा साऊंड सिस्टीम आणि साऊंडसाठी बदल केलेल्या वाहनांच्या वापरावर पूर्ण बदी असेल. सर्व डीजे मालकांना ही उपकरणे कुलूपबंद ठेवण्याचे निर्देश दिले आहे.

Nagpur News : गोल्डन रिंग रोडवर उभारणार ‘युटिलिटी कॉरिडोर’

न्यायालयाची महत्त्वाची निरीक्षणे

कागदी घोडे नाचवणे थांबवा केवळ कागदावर आदेश काढून आणि नोटीस देऊन पोलिस प्रशासनाला जबाबदारी झटकता येणार नाही, असे कोर्टाने सुनावले. उपकरणे जप्त करा डीजे चालकांकडून नियमभंग होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी त्यांची वाहने आणि अवजड साऊंड सिस्टीम जप्त करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने मान्य केले.

घटनास्थळी ठोस कारवाई पोलिस आयुक्त आणि उपआयुक्तांनी स्वतः लक्ष घालून प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन जप्तीची आणि दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश हायकोर्टाने दिले.

Nagpur News : २५ हजार पगार, हातात १५ हजार! विकास ठाकरे आक्रमक; दोषींवर गुन्ह्याची मागणी

पोळा मिरवणुकीतील व्हिडीओने उघड केली पोलखोल

मंडलेकर यांनी न्यायालयात पोळा सणादरम्यान काढलेल्या मिरवणुकीचे चित्रीकरण सादर केले. पोलिसांनी मनाई हुकूम जारी केला असतानाही आवाजाच्या तीव्रतेच्या सर्व मर्यादा पायदळी तुडवल्याचे व्हिडीओतून स्पष्ट झाले. न्यायालयाने या फुटेजची आणि आवाजाच्या डेसिबल पातळीची पडताळणी केली असता ध्वनीची पातळी कायद्याने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा कितीतरी पटीने जास्त असल्याचे निष्पन्न झाले. या पार्श्वभूमीवर ११ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर कालावधीत विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यांत नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहे.

 

Web Title: Nagpur news paper orders flouted high court cracks the whip orders actual seizure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • DJ
  • High court
  • nagpur court
  • Nagpur News

संबंधित बातम्या

‘आता खूप झाले!’ : कचरा व्यवस्थापनावरून मुंबई हायकोर्ट पालिकेवर संतापले; एसओपी लागू करण्याचे निर्देश
1

‘आता खूप झाले!’ : कचरा व्यवस्थापनावरून मुंबई हायकोर्ट पालिकेवर संतापले; एसओपी लागू करण्याचे निर्देश

‘तुम्हीच आरोपींना फरार होण्याची संधी दिली’;रुग्णालयातील मारहाण प्रकरणी हायकोर्ट संतप्त, पोलिसांच्या दिरंगाईवर हायकोर्टाचे ताशेरे
2

‘तुम्हीच आरोपींना फरार होण्याची संधी दिली’;रुग्णालयातील मारहाण प्रकरणी हायकोर्ट संतप्त, पोलिसांच्या दिरंगाईवर हायकोर्टाचे ताशेरे

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन
3

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन

Nagpur News : गोल्डन रिंग रोडवर उभारणार ‘युटिलिटी कॉरिडोर’
4

Nagpur News : गोल्डन रिंग रोडवर उभारणार ‘युटिलिटी कॉरिडोर’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.