फोटो सौजन्य AI
वेतनातील तफावत: कंत्राटाच्या नियमानुसार प्रत्येक सुरक्षारक्षकाला दरमहा २५,६०० रुपये वेतन मिळणे बंधनकारक होते, मात्र प्रत्यक्षात हाती पडलेली रक्कम कर्मचाऱ्यांना केवळ १५,५०० रुपये दिले जात होते.
वार्षिक अपहार त्यामुळे १७ सुरक्षारक्षकांचे दरमहा १,७१,७०० रुपये म्हणजेच वर्षाला तब्बल २०,६०,४०० रुपये हडपण्यात आले.
पीडित सुरक्षा रक्षकांच्या शिष्टमंडळाने आमदार विकास ठाकरे यांची भेट घेऊन या गैरप्रकाराची पोलखोल केली. नोव्हेंबर २०१९ पासून ‘आर्मर सिक्युरिटी इंडिया लिमिटेड’ या एजन्सीने सूर्योदय स्मॉल फायनान्स बैंकेत (बडीं शाखा) सुरक्षारक्षकांची कोणतीही संमती नसताना त्यांच्या नावाने खाती उघडली.
संपूर्ण कंत्राट कालावधीतील सर्व आर्थिक व्यवहारांचे तात्काळ विशेष ऑडिट करण्यात यावे. बनावट खाती उघडणारी सुरक्षा एजन्सी, एजी एन्व्हायरो, सूर्योदय बैंक आणि मनपाच्या दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत. कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या वेतनाची थकीत रक्कम व्याजासह त्वरित अदा करण्यात यावी.
मे २०२६ मध्ये जेव्हा सुरक्षारक्षकानी या अन्यायाविरोधात आवाज उठवला, तेव्हा एजन्सीने सुडाचे राजकारण करत त्यांचे वेतनच रोखून धरले, पगार न मिळाल्याने जून २०२६ पासून या कर्मचा-यांवर काम बंद करण्याची वेळ आली.
Nagpur Health : रुग्णांच्या जीवाशी खेळाल तर कारवाई अटळ; आरोग्य विभागाचा इशारा
मनपा ही ‘मुख्य नियोक्ता’ असताना कंत्राटदार कंपनी कामगार कायद्यांचे पालन करतेय की नाही, याची कोणतीही तपासणी अधिकाऱ्यांनी केली नाही. इतकेच नव्हे तर वाद निर्माण झाल्यानंतर एजी एन्व्हायरोने जुन्याच मालकांशी संबंधित असलेल्या ‘एलिट सिक्युरिटास’ या दुसऱ्या एजन्सीला कंत्राट दिले. केवळ नाव बदलून तोच गैरप्रकार सुरू ठेवण्यात आल्याचा संशय आमदार ठाकरे यांना आहे.






