Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : पश्चिम नागपुरात DJच्या सुरांचा सवाल; यंदा DJ वाजणार की बंदी कायम?

Nagpur News : पश्चिम नागपुरात यंदा DJ वाजवण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. उत्सवांच्या पार्श्वभूमीवर DJला परवानगी मिळणार की बंदी कायम राहणार, याकडे नागरिक आणि मंडळांचे लक्ष लागले आहे. ध्वनिप्रदूषण, कायदा-सुव्यवस्था आणि प्रशासनाच्या नियमांमुळे DJच्या वापराबाबतचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 07, 2026 | 04:42 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • भाजयुमोचा डीजेमुक्त दहीहंडी उत्सव साजरा
  • परंपरेची जोपासना
  • डीजे लावलेल्या वाहनांचा समावेश
Nagpur News : पुण्यातील नारायण पेठेत राहणारे विद्यानंद बापट यांच्या निमित्ताने यावर्षी महाराष्ट्रात पुन्हा डीजेचा मुद्दा शिगेला पोहोचला आहे . यामुळे महाराष्ट्रात आता दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत . एक डीजेला विरोध करणारे आणि डीजेला समर्थन . तसेच काही राजकीय नेते ही आता उघडपणे एकमेकांच्या समोर समर्थन आणि विरोध ही भूमिका घेऊन उभे राहत आहेत . यासगळ्या मुळे सवंग महाराष्ट्र आता सण उत्सव आणी डीजे मध्ये ढवळून निघत आहेत .

Nagpur News : सभापतींच्या वाहनावर ‘महाराष्ट्र सरकार’चा फलक; GADची कारवाई

भाजयुमोचा डीजेमुक्त दहीहंडी उत्सव साजरा

सण उत्सवांमधील डीजेच्या वापरावरून शहरात वेगवेगळ्या भूमिका समोर येत असताना
रविवारी पश्चिम नागपुरात एकीकडे डीजेमुक्त तर दुसरीकडे डीजेसह उत्त्सवी वातावरण पाहायला मिळाले. पश्चिम नागपुरात भाजयुमोने डीजेमुक्त दहीहंडी उत्सव साजरा केला तर त्याच परिसरात विश्व हिंदू परिषदेकडून डीजेसह कृष्ण जन्माष्टमी शोभायात्रा काढली.

Nagpur News : क्रीडा क्षेत्रात मनमानी; महिला प्रशिक्षकाला हटवण्याची धमकी

परंपरेची जोपासना

पश्चिम नागपूर भाजयुमोच्यावतीने लक्ष्मीभुवन चौकात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले. माजी आमदार संदीप जोशी यांच्या हस्ते ढोल-ताशांसह पारंपरिक वाद्यांचे पूजन झाल्यानंतर भजन, जॅमिंग आणि ढोल-ताशा पथकाच्या सादरीकरणाने उत्सव साजरा करण्यात आला.

‘मिर्झापूर’ फेम दिव्येंदू यांची विशेष उपस्थिती आकर्षण ठरली. अक्षय शर्मा, उदय मिश्रा, सौरभ साहू यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डीजेच्या कर्णकर्कश आवाजाऐवजी पारंपरिक वाद्यांवर भर दिल्याने नागरिकांनी उपक्रमाचे स्वागत केले.

Nagpur News : बनावट इंजिनीअरिंग प्रवेशाचा पर्दाफाश; २ प्रवेश रद्द

डीजे लावलेल्या वाहनांचा समावेश

पश्चिम नागपुरातील गिट्टीखदान येथून विश्व हिंदू परिषदेच्या वतीने कृष्ण जन्माष्टमीची शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत डीजे लावलेल्या एकापेक्षा अधिक वाहनांचा समावेश होता. गौरक्षणपर्यंत निघालेल्या शोभायात्रेत विहिंपचे कार्यकर्ते दुचाकी रॅलीद्वारे सहभागी झाले.

मार्गावर डीजेवर संगीत सुरू होते. मात्र, पोलिसांचे पथक ध्वनिक्षमतेची तपासणी करणाऱ्या यंत्रांसह शोभायात्रेसोबत होते. त्यामुळे डीजेच्या आवाजावर निर्धारित नियमांनुसार नियंत्रण ठेवले. एकाच भागात एका बाजूला डीजेमुक्त दहीहंडी तर दुसरीकडे डीजेसह शोभायात्रा निघाल्याने डीजेच्या वापरावरून सुरू असलेली वेगवेगळी मते पुन्हा चर्चेत आली.

Web Title: Nagpur news question marks over dj music in west nagpur will djs be allowed to play this year or will the ban remain in force

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • DJ
  • Nagpur
  • Nagpur News
  • Nagpur Police

संबंधित बातम्या

Nagpur News : सभापतींच्या वाहनावर ‘महाराष्ट्र सरकार’चा फलक; GADची कारवाई
1

Nagpur News : सभापतींच्या वाहनावर ‘महाराष्ट्र सरकार’चा फलक; GADची कारवाई

Nagpur News : क्रीडा क्षेत्रात मनमानी; महिला प्रशिक्षकाला हटवण्याची धमकी
2

Nagpur News : क्रीडा क्षेत्रात मनमानी; महिला प्रशिक्षकाला हटवण्याची धमकी

Nagpur News : बनावट इंजिनीअरिंग प्रवेशाचा पर्दाफाश; २ प्रवेश रद्द
3

Nagpur News : बनावट इंजिनीअरिंग प्रवेशाचा पर्दाफाश; २ प्रवेश रद्द

Nagpur Crime : ५०० कॅमेऱ्यांनी उलगडला गोळीबाराचा थरार; नगरसेवकावरील हल्ल्यात ७ जेरबंद!
4

Nagpur Crime : ५०० कॅमेऱ्यांनी उलगडला गोळीबाराचा थरार; नगरसेवकावरील हल्ल्यात ७ जेरबंद!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.