Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राखेतून उभारणार महाराष्ट्राचे महामार्ग! 6.17 कोटी मेट्रिक टन राखेच्या वापरासाठी महानिर्मिती-MSRDC मध्ये करार

MSRDC : महाराष्ट्रातील द्रुतगती मार्ग आणि खनिज वाहतूक मार्गांसाठी 6.17 कोटी मेट्रिक टन राखेच्या वापराचा महानिर्मिती आणि एमएसआरडीसीमध्ये करार झाला आहे. नागपूर–गोंदिया, भंडारा–गडचिरोली आणि नागपूर–चंद्रपूर मार्गांसाठी राख वापरण्याचे नियोजन आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 22, 2026 | 08:43 PM
राखेतून उभारणार महाराष्ट्राचे महामार्ग! ६.१७ कोटी मेट्रिक टन राखेच्या वापरासाठी महानिर्मिती-MSRDC मध्ये करार

राखेतून उभारणार महाराष्ट्राचे महामार्ग! ६.१७ कोटी मेट्रिक टन राखेच्या वापरासाठी महानिर्मिती-MSRDC मध्ये करार

Follow Us
Follow Us:
  • ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची उपस्थिती
  • असंख्य मार्गांसह खनिज वाहतूक मार्गासाठीही राखेचा वापर
  • प्रकल्प पूर्ण होईपर्यंत कराराची वैधता
 

औष्णिक विद्युत केंद्रांमधून निर्माण होणाऱ्या राखेचा शाश्वत वापर करून पर्यावरण संवर्धनासह राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी महानिर्मिती आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांच्यात ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार जानेवारी 2027 ते डिसेंबर 2028 या कालावधीत पूर्व महाराष्ट्रातील प्रस्तावित द्रुतगती मार्ग आणि खनिज वाहतूक मार्ग प्रकल्पांसाठी 6.17 कोटी मेट्रिक टन राखेचा वापर प्रस्तावित आहे.

महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी. आणि एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार बी. गायकवाड यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी महानिर्मितीचे संचालक (प्रकल्प) अभय हरणे, कार्यकारी संचालक (पर्यावरण) डॉ. नितीन वाघ, एमएसआरडीसीचे मुख्य महाव्यवस्थापक (पर्यावरण) नरेंद्र टोके आदी मान्यवर उपस्थित होते.

 

विविध औष्णिक विद्युत केंद्रांतील राखेचा वापर

या करारामुळे महानिर्मितीच्या कोराडी, खापरखेडा आणि चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रांमधील राखेचा वापर राज्यातील महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी करण्यात येणार आहे. यामध्ये नागपूर-गोंदिया द्रुतगती मार्गासाठी 2.09 कोटी मेट्रिक टन, भंडारा-गडचिरोली द्रुतगती मार्गासाठी 1.14 कोटी मेट्रिक टन, नागपूर-चंद्रपूर द्रुतगती मार्गासाठी 2.79 कोटी मेट्रिक टन आणि नवेगाव मोरे-सुरजागड खनिज वाहतूक मार्गासाठी 0.15 कोटी मेट्रिक टन राखेची अंदाजित आवश्यकता आहे.

नागपूर परिसरातील प्रकल्पांसाठी कोराडी किंवा खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातून, तर चंद्रपूर परिसरातील प्रकल्पांसाठी चंद्रपूर केंद्रातून राख उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रकल्पांची तांत्रिक आवश्यकता, प्रत्यक्ष स्थळस्थिती आणि राखेची उपलब्धता यानुसार वापराच्या प्रमाणात बदल होऊ शकतो.

MSRTC: एसटी स्थानकांवरील प्रसाधनगृहांची स्वच्छता राखण्यात हलगर्जीपणा…; सरनाईकांचा अधिकाऱ्यांना इशारा

स्वतंत्र त्रिपक्षीय करार

प्रकल्पनिहाय राखेचे प्रमाण, उचल वेळापत्रक, राखेचा स्रोत, वाहतूक व्यवस्था आणि आर्थिक साहाय्याच्या अटी निश्चित करण्यासाठी संबंधित औष्णिक विद्युत केंद्र, एमएसआरडीसी आणि अधिकृत कंत्राटदार किंवा संबंधित संस्थेदरम्यान स्वतंत्र त्रिपक्षीय करार करण्यात येणार आहेत. राखेचे मोजमाप, वापराचे प्रमाणीकरण आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून पात्र आर्थिक साहाय्याच्या दाव्यांवर कार्यवाही केली जाईल.

राखेची वाहतूक, हाताळणी आणि वापर करताना पर्यावरणीय नियम, तांत्रिक मानके आणि वैधानिक तरतुदींचे पालन केले जाणार आहे. केंद्र सरकारच्या 31 डिसेंबर 2021 च्या राख अधिसूचनेनुसार राखेचा शंभर टक्के वापर साध्य करणे आणि राज्य शासनाच्या 19 सप्टेंबर 2025 च्या राख उपयोग धोरणाची अंमलबजावणी करण्याचा उद्देश आहे.

Maharashtra-cbg-projects : कचऱ्यातून स्वच्छ इंधननिर्मितीला बळ! सीबीजी प्रकल्पांसाठी महाराष्ट्र सरकारची ५०० कोटींची तरतूद

या सामंजस्य करारामुळे औष्णिक विद्युत केंद्रांतील जुन्या राखेचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होण्यास मदत होणार असून, दीर्घकालीन राख साठवणुकीशी संबंधित पर्यावरणीय व कार्यान्वयन जोखीम कमी होण्यास हातभार लागेल.
तसेच, राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी राखेच्या शाश्वत वापराची व्यवस्था निर्माण होईल. हा करार 31 मार्च 2032 पर्यंत किंवा संबंधित प्रकल्प पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत वैध राहणार आहे. दोन्ही संस्थांच्या सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने कराराची मुदत वाढविता येणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांसाठी किती राख वापरण्याचे नियोजन आहे?

    Ans: महानिर्मिती आणि एमएसआरडीसी यांच्यातील करारानुसार ६.१७ कोटी मेट्रिक टन राखेचा वापर प्रस्तावित आहे.

  • Que: राखेचा वापर कोणत्या प्रकल्पांसाठी होणार आहे?

    Ans: नागपूर–गोंदिया, भंडारा–गडचिरोली आणि नागपूर–चंद्रपूर द्रुतगती मार्गांसह नवेगाव मोरे–सुरजागड खनिज वाहतूक मार्गासाठी राख वापरण्याचे नियोजन आहे.

  • Que: राख कोणत्या औष्णिक विद्युत केंद्रांतून उपलब्ध होणार आहे?

    Ans: राख कोणत्या औष्णिक विद्युत केंद्रांतून उपलब्ध होणार आहे?

Web Title: Msrdc maharashtra highway projects fly ash utilisation agreement rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 08:43 PM

Topics:  

  • gondiya
  • MSRDC
  • Nagpur

संबंधित बातम्या

नागपूर पदवीधर निवडणुकीआधी शरद पवार गटाची मोठी कारवाई! नितेश कराळेंची सहा वर्षांसाठी हकालपट्टी
1

नागपूर पदवीधर निवडणुकीआधी शरद पवार गटाची मोठी कारवाई! नितेश कराळेंची सहा वर्षांसाठी हकालपट्टी

BJP-RSS Internal Politics: भाजप आणि आरएसएसमध्ये अंतर्गत धुसफूस; जगदीप धनखड यांना व्यासपीठावर स्थान देण्यामागे नेमका उद्देश काय?
2

BJP-RSS Internal Politics: भाजप आणि आरएसएसमध्ये अंतर्गत धुसफूस; जगदीप धनखड यांना व्यासपीठावर स्थान देण्यामागे नेमका उद्देश काय?

Mohan Bhagwat Dussehra Speech : स्वातंत्र्य चळवळीपेक्षा मोठं बलिदान आता पुन्हा द्यावं लागेल – मोहन भागवत
3

Mohan Bhagwat Dussehra Speech : स्वातंत्र्य चळवळीपेक्षा मोठं बलिदान आता पुन्हा द्यावं लागेल – मोहन भागवत

Gondiya News: १०८ रुग्णवाहिकेचा ३ लाख रुग्णांना लाभ! रुग्णांना मिळाली तातडीची मदत, गोंदियात आपत्कालीन रुग्णवाहिकासेवेचा विस्तार
4

Gondiya News: १०८ रुग्णवाहिकेचा ३ लाख रुग्णांना लाभ! रुग्णांना मिळाली तातडीची मदत, गोंदियात आपत्कालीन रुग्णवाहिकासेवेचा विस्तार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.