
Nagpur
यावेळी भाजपला ६ जागा कमी पडल्या. उलटपक्षी काँग्रेसचे गेल्यावेळच्या संख्याबळात ६ ची भर टाकत ३५ पर्यंत मजल मारली. एमआयएमचा ६ जागांवरील विजय सर्वाधिक धक्कादायक ठरला. १० वर्षांनंतर मुस्लिम लीगने पुन्हा मनपात एंट्री केली. इंडियन मुस्लिम लीगचे प्रदेशाध्यक्ष व माजी नगरसेवक असलम खान मुल्ला यांनी चारही सहकाऱ्यांसह पुन्हा मनपात प्रवेश केला, बसपाचा गड असलेल्या आसीनगर झोनमधील दोन प्रभागांत त्यांचा पराभव झाला. त्यांच्यातर्फे माजी नगरसेविका हर्षला जयस्वाल यांनी पक्षाची लाज राखली. शिवसेना दुभंगल्यानंतरही ठाकरे सेनेचे जुनेच दोन्ही नगरसेवक प्रभाग क्र. २८ मधून मनपात पोहोचले. आभा पांडे यांच्या रूपात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटालाही मनपात मान मिळाला. शिंदे सेनेने भाजपच्या कमळावर लढून इज्जत राखली.
गडकरी-फडणवीसांची जादू
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जादू आजही नागपूरकरांवर कायम आहे. दोघांच्या प्रचाराचा झंझावात व विकासकामांना मतदारांनी कौल दिला. बावनकुळे यांनीही विशेष प्रयत्न केले. गडकरींनी शहराला नंबर वन करायचे असल्याचा मनोदय व्यक्त केला. त्यास मतदारांनी प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरू केलेल्या विकास कामांना नागपूरकरांनी डोक्यावर घेतल्याचे निकालावरून दिसते आहे.
काँग्रेसने ‘स्टार’ गेले
काँग्रेसने स्टार प्रचारकाची यादी केली. यातील एक-दोन वगळता कुणीही भटकले नाही. नेत्यांनी प्रचाराकडे अक्षरक्षः पाठ फिरवली. जणू पराभव आधीच स्वीकारला होता. नेत्यांमधील वादावादी उफाळून आली नसली तरी उमेदवारी वाटपावरून त्यांचा राग दिसत होता. शंभरचे टारगेट घेतलेल्या पक्षाला अर्धशतकही गाठता आले नाही.
बसपाचे कॅडर अपयशी
बसपाचे २००२ पासून मनपात चांगले बळ होते. २०१७ मध्ये १० नगरसेवक निवडून आले. आसीनगर झोनमध्ये या पक्षाची ताकद आहे. यावेळी मात्र केवळ एकाच ठिकाणी यश मिळाले. पक्षाचे कॅडर उमेदवारीवरून नाराज असल्याचे यावरून दिसले. शिवाय पक्ष नेत्यांचा अतिआत्मविश्वासही नडल्याचे बोलले जात आहे.
हा विजय जनतेच्या विश्वासाचे द्योतक
देशात सुरू असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनला जनतेने पुन्हा एकदा कौल दिला आहे. भाजपच्या अजेंड्यात विकास आहे आणि म्हणूनच मुंबईपासून नागपूरपर्यंत जनतेने भाजपला मतदान केले आहे. नागपूरमध्येही भाजपला १०० पाय करण्याची संधी मिळाली असून, हे जनतेच्या विश्वासाचेच द्योतक आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की जनतेसाठी काम करा, उत्सव जरूर साजरा करा, मात्र उन्मादात जाऊ नका. जनतेने आपल्यावर विश्वास्स ठेवला आहे आणि त्यांच्या समस्या सोडवणे हीच आमची पहिली प्राथमिकता असली पाहिजे. मोदी यांच्या विकासाच्या अजेंड्यामुळेच भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. त्यावर खरे उतरायची जबाबदारी सर्वांची आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भरभरून कौतुक करत सांगितले की त्यांच्या नेतृत्वात भाजपने नागपूरमध्ये निवडणूक लढवली. जनतेने गडकरींच्या कामांवर शिक्कामोर्तब केले आहे. गडकरी यांनी गरीबातल्या गरीबासाठी काम केले आहे. सर्व नेते आणि पक्ष कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले आणि सर्वांच्या कठोर परिश्रमामुळेच हे यश शक्य झाल्याचे सांगितले. नागपूरला आंतरराष्ट्रीय शहर, औद्योगिक नगरी आणि मूलभूत विकासाचे आदर्श केंद्र बनवण्यासाठी आता कोणतीही कसर सोडली जाणार नाही, अशा ग्वाही त्यांनी दिली. राज्यातील २९ पैकी २५ महानगरपालिकांमध्ये मिळालेल्या यशाबद्दल गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांचे भरभरून कौतुक केले. मागील १५ वर्षांत केलेल्या कामांवरच जनतेने शिक्कामोर्तब केल्याचे त्यांनी सांगितले. जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरायचा प्रयत्न करा, जेणेकरून भविष्यातही मार्ग मोकळा राहील. विजयाचे श्रेय त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.
Ans: नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आणि विकासकामांवरील जनतेचा विश्वास.
Ans: एमआयएमचा ६ जागांवरील विजय आणि मुस्लिम लीगची पुनरागमन.
Ans: मागील वेळेपेक्षा ६ जागांची वाढ झाली, मात्र अपेक्षित यश मिळाले नाही.