Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

यंदाच्या वर्षी नागपुरात जिल्हा परिषदांच्या निवडणुका नाहीच; जुलैमधील सुनावणीनंतरच होणार निर्णय

जुलैमध्ये निर्णय आला तरीही पावसाळ्यात निवडणुका होण्याची शक्यता नाही. मात्र, सुनावणी आणखी पुढे ढकलल्यास यावर्षी निवडणुका अशक्य असतील.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 04, 2026 | 02:49 PM
१४ जिल्ह्यांत ४७ जागांवर पोटनिवडणूक जाहीर

१४ जिल्ह्यांत ४७ जागांवर पोटनिवडणूक जाहीर

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : आरक्षण 50 टक्क्यांवर गेल्यामुळे राज्यातील उर्वरित २२ जिल्हा परिषद व संबंधित पंचायत समितीच्या निवडणुका यावर्षी होण्याची शक्यता मावळली आहे. उन्हाळी परीक्षेनंतर निवडणुका होतील, असे मानले जात होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण मर्यादेवर बोट ठेवल्यानंतर याचिकेच्या सुनावणीसाठी जुलै महिना निश्चित केला आहे. या निर्णयावर निवडणुकांचे भवितव्य अवलंबून आहे.

जुलैमध्ये निर्णय आला तरीही पावसाळ्यात निवडणुका होण्याची शक्यता नाही. मात्र, सुनावणी आणखी पुढे ढकलल्यास यावर्षी निवडणुका अशक्य असतील. राज्य सरकार, संबंधित पक्षांना त्यांचे युक्तिवाद व माहिती सादर करण्यासाठी जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. आरक्षण मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या १२ जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका झाल्या आहेत. यात विदर्भातील एकही जिल्हा परिषद नाही.

हेदेखील वाचा : मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तीव्र चटका; शेतीपिकांसह आरोग्यावर होणार गंभीर परिणाम?

सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी निवडणूक आयोगाला सूचना दिल्या होत्या की, कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त असता कामा नये, असे असूनही निवडणूक विभागाने वेगवेगळे सूत्र वापरून २२ जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण घोषित केले. याविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केली. निवडणूक आयोगाकडून आरक्षणांबाबत लवकरच निर्णय अपेक्षित होता. परंतु, तो झाला नाही.

पोटनिवडणुकांची शक्यता बळावली

अनेक नगर परिषदा, नगर पंचायत आणि महानगरपालिकांमध्ये आरक्षण मर्यादा ५० टक्क्यांवर गेली आहे. मात्र, निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली होती. वेळापत्रकही जाहीर झाले होते. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून निवडणुका घेतल्या. जर अनुसूचित जाती/जमाती ५० टक्के आरक्षण मर्यादेवर ठाम राहिले तर नागपूर, चंद्रपूर आणि काही महानगरपालिका आणि नगर परिषदांमधील ओबीसी नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द केले जाईल. यामुळे पोटनिवडणुका घ्याव्या लागतील. नागपूर जिल्हा परिषदेत असा प्रकार यापूर्वी घडला आहे. १६ ओबीसी सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आणि खुल्या प्रवर्गातील जागांसाठी पुन्हा निवडणुका घ्याव्या लागल्या होत्या.

ज्यांचे सरकार, त्यांची सत्ता

नागपूर जिल्हा परिषदेवर सामान्यतः राज्यातील सत्ताधारी पक्षाची सत्ता राहिली आहे. राज्यात महाविकास आघाडी सत्तेत असताना काँग्रेसने जिल्हा परिषदेत पूर्ण बहुमताने विजय मिळवला. महाविकास आघाडीचा भाग असलेल्या संयुक्त राष्ट्रवादी पक्षानेही ८ जागा जिंकल्या. शिवसेनेने १ जागा जिंकली. महाविकास आघाडी पक्षांचे एकूण ४१ सदस्य होते. भाजपचा दारुण पराभव झाला होता. त्यांना केवळ १४ जागेवर विजय मिळाला.

…तर जिल्हा परिषदेत भाजप पुन्हा येऊ शकते सत्तेत

काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांनी अडीच वर्षे अध्यक्षपद भूषवले. त्यानंतर पुढील अडीच वर्षासाठी मुक्ता कोकडे या अध्यक्ष झाल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. महायुतीची सत्ता आली. सध्या १३ महिन्यांपासून जिल्हा परिषदेवर प्रशासकीय राजवट आहे. राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा निवडून आले आहे. त्यामुळे निवडणुका झाल्यास भाजप जिल्हा परिषदेत पुन्हा सत्तेत येऊ शकते, अशी अटकळ आहे.

Web Title: There will be no zilla parishad elections in nagpur this year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • Nagpur

संबंधित बातम्या

देशातील पहिल्या एकीकृत शहर घनकचरा प्रक्रिया केंद्रामुळे कचरामुक्त शहराची संकल्पना होणार साकार – मुख्यमंत्री फडणवीस
1

देशातील पहिल्या एकीकृत शहर घनकचरा प्रक्रिया केंद्रामुळे कचरामुक्त शहराची संकल्पना होणार साकार – मुख्यमंत्री फडणवीस

Nagpur Crime: भीषण प्रकार! जळत्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अर्धवट जळालेला मृतदेह; स्त्री-पुरुष ओळखणंही कठीण
2

Nagpur Crime: भीषण प्रकार! जळत्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अर्धवट जळालेला मृतदेह; स्त्री-पुरुष ओळखणंही कठीण

NAGPUR : सततच्या लोडशेडिंगमुळे नागपूरकर हवालदिल, उकाड्याने हैराण
3

NAGPUR : सततच्या लोडशेडिंगमुळे नागपूरकर हवालदिल, उकाड्याने हैराण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.