
crime (फोटो सौजन्य: social media)
नागपूर: गत काही दिवसांपासून चोरांनी हिंगणा परिसरात धुडगूस घातला. सोमवारी मध्यरात्री चोरांनी धनगरपुऱ्यातील हिंगणा टाऊन सोसायटीमध्ये ५ बंगल्यांचे कुलूप तोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला. यामध्ये हिंगणा पोलिस ठाण्यातील सहाव्यक पोलिस उपनिरीक्षकाच्या घराचाही समावेश आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
सोमवारी मध्यरात्री चोरांनी धनगरपुऱ्यातील हिंगणा टाऊन सोसायटीला लक्ष्य केले. त्यांनी हिंगणा ठाण्यात कायरत सहायक पालख न उपनिरीक्षक संदेश नाळे यांच्यासह श्यामराव झाडे, राजेंद्र उदासी, कांतिलाल महाजन, आशिष जक्के यांच्या घरांचे कुलूप तोडून रोकड व सोन्याचांदीच्या दागिन्यांसह लाखोंच्या मालावर डल्ला मारला. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहित्ती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक तपासानंतर अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला. पोलिस अधिकारी नाळे वगळता इतर सर्वजण अजूनही बाहेरगावी असल्याची माहिती आहे. यापूर्वी १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्री चोरांनी देशमुखवाडीतील नायब तहसीलदार नरेंद्र दाते यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारून घरफोडीचा प्रयत्न केला, त्यानंतर १९ फेब्रुवारीला भोसलेवाडी येथे अजय धर्मपुरीवार यांच्या घरी घरफोडी झाली.
सुधाकर बावीस्कर यांच्या घरीही चोरी झाली. महिनाभरापूर्वी पुरुषोत्तम राजने व विश्वास घनचक्कर यांच्या घरीही घरफोडी झाली. या सर्व घटनांमध्ये लाखोंचा ऐवज चोरट्यांनी वगळता इतर सर्वजण अजूनही बाहेरगावी असल्याची माहिती आहे. यापूर्वी १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्री चोरांनी देशमुखवाडीतील नायब तहसीलदार नरेंद्र दाते यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारून घरफोडीचा प्रयत्न केला, त्यानंतर १९ फेब्रुवारीला भोसलेवाडी येथे अजय धर्मपुरीवार यांच्या घरी घरफोडी झाली.
Ans: नागपूरच्या हिंगणा परिसरातील हिंगणा टाऊन सोसायटीत.
Ans: एकूण पाच बंगल्यांमध्ये घरफोडी झाली.
Ans: अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.