Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गरिबाच्या फ्रीजला वाढली मागणी; कुंभारवाड्यांमध्ये माठ बनवणाऱ्या कारागीरांची लगबग सुरू

सध्या उन्हाच्या झळा जाणू लागल्यामुळे गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाला मागणी वाढली आहे. कुंभारवाड्यांमध्ये माठ बनवणाऱ्या कारागीरांची लगबग वाढली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 17, 2026 | 04:22 PM
गरिबाच्या फ्रीजला वाढली मागणी; कुंभारवाड्यांमध्ये माठ बनवणाऱ्या कारागीरांची लगबग सुरू

गरिबाच्या फ्रीजला वाढली मागणी; कुंभारवाड्यांमध्ये माठ बनवणाऱ्या कारागीरांची लगबग सुरू

Follow Us
Follow Us:

पारगाव शिंगवे : सध्या उन्हाच्या झळा जाणू लागल्यामुळे गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाला मागणी वाढली आहे. कुंभारवाड्यांमध्ये माठ बनवणाऱ्या कारागीरांची लगबग वाढली आहे. परंतु, परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून बाजारपेठेत व गावोगावी कमी किंमतीत माठ विक्रीस येत आहेत. यामुळे स्थानिक कारागिरांनी बनवलेले माठ विक्रीत घट झाली आहे. सर्व सामान्य लोकांना थंड पिण्याच्या पाण्यासाठी फ्रीज घेणे परवडत नाही. त्यामुळे लोक थंड पाण्यासाठी माठ खरेदी करतात. या माठातील पाणी आरोग्यासाठी चांगले असते.

 

माठ बनविण्यासाठी नदी काठच्या परिसरातून पोयटा चिकणमाती गोळा करुन ती माती मळली चाळली जाते. त्यामध्ये राख व लिद टाकून भिजत ठेवली जाते. कारगीर चाकावर मातीचा गोळा ठेऊन त्याला माठाचा आकार देतात. तयार झालेल्या माठाला थोडे सुकून पुन्हा आकार देऊन माठाला मण्याच्या सह्याने घासून चकाकी देतात. माठ आव्यात (भट्टीत )ठेऊन ते भाजून काढले जातो. त्यानंतर माठ तयार होतो. या माठामध्ये पाणी थंड होते. या माठांचे वैशिष्ट्य म्हणजे पाणी कायमच थंड रहात असते, असे माठ बनविणारे कारागीर यांनी सांगितले.

आधुनिक युगात तरुण पिढीने या व्यवसायाकडे पाठ फिरवली. माठ बनवणारे कुशल कारागिरही मिळत नाहीत. जास्त कष्ट करुनही नफा चांगला मिळत नाही आणि त्यातच परराज्यातील परप्रांतीयांचा या व्यवसायात मोठ्या प्रमाणात शिरकाव झालेला आहे. यामुळे व्यवसायाला उतरती कळा लागली आहे.

आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील कुंभारवाड्यामध्ये माठ मोठ्या प्रमाणात बनविले जातात. या ठिकाणी मंचर, खेड, शिरुर, जुन्नर तसेच पुणे येथुन व्यापारी मोठ्या प्रमाणात येतात. माठ खरेदी करुन विक्री घेऊन जातात. परंतु, या व्यवसायात परप्रांतीयांनी शिरकाव करून कमी दारात माठ विक्री करु लागले आहेत. त्यामुळे स्थानिक कुंभारवाड्यातील कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे, असे व्यवसायिक सुभाष राऊत, रंगनाथ राऊत, सुरेश राऊत, खंडू राऊत यांनी सांगितले.

माठ शास्त्रीय दृष्टिकोनातून उत्तम

कुंभारवाड्यातील माठ चांगल्या दर्जाचे, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात प्रक्रिया करून ते बनवले जातात. त्यामुळे कुंभार वाड्यात बनवलेले माठ उत्तम दर्जाचे असतात. त्याच्यामध्ये पाणी ओतल्यास ते हळूहळू थंड होते. यामधील पाणी कायमच थंड राहत असते. हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे, तसेच या माठातून पाणी झिरपत असल्याने हा माठ कायम थंड राहतो.

परप्रांतीयांनी बनवलेले माठ दर्जाहीन

परप्रांतीयांनी बनवलेले माठ हे लाल रंगाचे असतात. या माठाला बनवण्यासाठी कमी खर्च येतो व दर्जाहीन असतात. त्यामध्ये पाणी झिरपत नाही. यामुळे पाणी लवकर थंड होत नाही. तसेच जास्त वेळ पाणी त्याच्यामध्ये ठेवल्यास या माठामधील पाण्याची चवही बदलत असते. माठ हे दर्जाहीन असतात ते टिकण्यास कमी असतात.

Web Title: The demand for matha has increased as the summer heat is starting to set in

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 04:22 PM

Topics:  

  • pune news
  • Summer
  • summer heat

संबंधित बातम्या

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी
1

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी

पुण्यात दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर कोसळली; 45 वर्षीय महिलेचा मृत्यू
2

पुण्यात दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर कोसळली; 45 वर्षीय महिलेचा मृत्यू

धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; धारदार हत्याराने वार केले अन्…
3

धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; धारदार हत्याराने वार केले अन्…

पुणेकरांनो, शहर परिसरात येताय? तर थांबा ! वाहतुकीतील ‘हे’ बदल एकदा जाणून घ्या
4

पुणेकरांनो, शहर परिसरात येताय? तर थांबा ! वाहतुकीतील ‘हे’ बदल एकदा जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.