Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विठुरायाच्या नगरीत स्वच्छतेचा जागर; प्लास्टिकमुक्त वारीसाठी MPCB ची विशेष मोहीम; एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रचार बसचे उद्घाटन

Pandharpur Kartiki Plastic Free Wari MPCB Campaign: कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये ‘स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर’ आणि ‘प्लास्टिकमुक्त वारी’चा संदेश देण्यासाठी MPCB ने विशेष पर्यावरण जनजागृती मोहीम सुरू केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 20, 2026 | 07:31 PM
Pandharpur Kartiki Plastic Free Wari

Pandharpur Kartiki Plastic Free Wari

Follow Us
Follow Us:
  • कार्तिकी वारीत भक्तीसोबत पर्यावरणाचा संदेश
  • प्लास्टिकमुक्त पंढरपूरसाठी MPCB सरसावले
  • एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रचार बसचे उद्घाटन
पंढरपूर : विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकऱ्यांची पावले पंढरीकडे वळली असताना यंदाच्या कार्तिकी यात्रेत भक्तीसोबतच पर्यावरण संवर्धनाचाही जागर सुरू झाला आहे. ‘स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर’ आणि ‘प्लास्टिकमुक्त वारी’चा संदेश देण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या पर्यावरण जनजागृती प्रचार बसचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

Maharashtra Government : फडणवीस सरकारचा मोठा प्लॅन! जमीन अधिग्रहणापासून वाढवण बंदरापर्यंत महत्त्वाचे निर्णय

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या विशेष बसच्या माध्यमातून राज्यभरातील नागरिकांपर्यंत वसुंधरा संरक्षण, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्यात येणार आहे. ‘सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळा’, ‘कापडी पिशव्यांचा वापर करा’, ‘निसर्ग वाचवा’ अशा संदेशांद्वारे नागरिकांना पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगीकार करण्याचे आवाहन केले जाणार आहे.

कार्तिकी यात्रेत लाखो भाविक दाखल होत असल्याने प्लास्टिक कचरा, नदीपात्रातील अस्वच्छता आणि यात्रा परिसरातील प्रदूषण रोखण्याचे मोठे आव्हान असते. याच पार्श्वभूमीवर मंडळाने जनजागृतीसाठी पारंपरिक लोककलेचा आधार घेतला आहे. कीर्तन, भारूड आणि पोवाड्यांच्या माध्यमातून वारकरी व भाविकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. भक्तीच्या सुरांतून पर्यावरण रक्षणाचा विचार रुजविण्याचा हा प्रयत्न आहे.

प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर, कचरा उघड्यावर न टाकणे, चंद्रभागा नदीचे पात्र स्वच्छ ठेवणे आणि यात्रा परिसरात स्वच्छतेचे नियम पाळणे, असा या मोहिमेचा संदेश आहे. पंढरीतून सुरू झालेला हा पर्यावरणाचा जागर राज्यभर पोहोचविण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे.

यावेळी रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, आमदार राजू खरे, आमदार अभिजीत पाटील, नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके, संजय भुसकुटे, माजी आमदार शहाजी पाटील, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे आदी उपस्थित होते.

बाणेरमधील दोन मेट्रो स्थानके डिसेंबरमध्ये प्रवाशांच्या सेवेत? सीएमआरएसच्या सुरक्षा तपासणीनंतरच अंतिम मुहूर्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: पंढरपूरमध्ये प्लास्टिकमुक्त वारी मोहीम कोणी सुरू केली?

    Ans: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) ही मोहीम सुरू केली.

  • Que: जनजागृती बसचे उद्घाटन कोणी केले?

    Ans: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

  • Que: प्लास्टिकमुक्त वारी मोहिमेचा उद्देश काय आहे?

    Ans: प्लास्टिक कचरा रोखणे आणि पंढरपूर स्वच्छ ठेवणे हा उद्देश आहे.

Web Title: Pandharpur kartiki wari plastic free campaign mpcb eknath shinde pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 07:31 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Kartiki Yatra
  • Pandharpur News
  • plastic bag

संबंधित बातम्या

Pandharpur Cleanliness Drive : कार्तिकी पौर्णिमेनिमित्त पंढरपूर स्वच्छतेसाठी सुमीत ग्रुप सरसावले, आठवडाभर विशेष मोहीम
1

Pandharpur Cleanliness Drive : कार्तिकी पौर्णिमेनिमित्त पंढरपूर स्वच्छतेसाठी सुमीत ग्रुप सरसावले, आठवडाभर विशेष मोहीम

TMC Standing Committee : शिंदेंचा एक निर्णय अन् ठाण्यात मोठे फेरबदल! दिग्गज नगरसेवकांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी
2

TMC Standing Committee : शिंदेंचा एक निर्णय अन् ठाण्यात मोठे फेरबदल! दिग्गज नगरसेवकांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी

Eknath Shinde Ashwini Vaishnav :एकनाथ शिंदेंचा एक फोन अन् कारवाईला ब्रेक; थेट केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी केला संवाद
3

Eknath Shinde Ashwini Vaishnav :एकनाथ शिंदेंचा एक फोन अन् कारवाईला ब्रेक; थेट केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी केला संवाद

Mahayuti Politics: महायुतीत मोठी फूट; काँग्रेससोबत हात मिळवत शिंदे गट-राष्ट्रवादीचा भाजपला धक्का
4

Mahayuti Politics: महायुतीत मोठी फूट; काँग्रेससोबत हात मिळवत शिंदे गट-राष्ट्रवादीचा भाजपला धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.