
Eknath Shinde TMC
ठाणे : उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा आपल्या निर्णयाने राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेतलं आहे. यावेळी ठाणे महापालिकेतील स्थायी समिती सदस्यांच्या निवडीत त्यांनी अनपेक्षित नावांना संधी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या दिग्गज नगरसेवकांची नावे चर्चेत होती, त्यांना पहिल्याच वर्षी संधी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्यातील शिवसेनेच्या राजकीय वर्तुळात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (TMC Standing Committee)
ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीवर 16 सदस्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेनेच्या वाट्याला 9 जागा आल्या आहेत. या जागांसाठी अनेक अनुभवी आणि ज्येष्ठ नगरसेवक इच्छुक होते. काहींनी सदस्यत्वासाठी जोरदार फिल्डिंगही लावली होती.
मात्र, एकनाथ शिंदे यांनी अंतिम यादीत अनेक चर्चेतील नावांना स्थान दिलं नाही. सुधीर कोकाटे, विकास रेपाळे, राम रेपाळे, योगेश जानकर, रमाकांत मढवी, विमल भोईर आणि संजय भोईर यांना पहिल्या वर्षी संधी मिळालेली नाही. यातील काही नगरसेवकांची नावे स्थायी समिती सभापतीपदासाठीही चर्चेत होती.
मीनाक्षी शिंदे यांनाही समितीत स्थान मिळालेलं नाही. पूर्णेकर प्रकरणामुळे त्यांना संधी मिळाली नसावी, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र, याबाबत अधिकृत कारण स्पष्ट झालेलं नाही.
एकनाथ शिंदे यांनी दिलीप बारटक्के, राजेश मोरे, पवन कदम, बाबाजी पाटील, संध्या मोरे, प्रमिला केणी, आदेश भगत, विक्रांत तांडेल आणि महेश साळवी या नऊ जणांची निवड केली आहे.
विशेष म्हणजे, चर्चेत असलेल्या काही प्रस्थापित नावांऐवजी या सदस्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता स्थायी समिती सभापतीपदाची जबाबदारी नेमकी कोणाकडे जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
शिवसेनेसोबतच इतर पक्षांच्या सदस्यांचीही घोषणा झाली आहे. भाजपकडून भरत चव्हाण, मृणाल पेंडसे आणि कमल चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पल्लवी जगताप आणि यासीन कुरेशी, अजित पवार गटाकडून सुहास देसाई, तर एमआयएमकडून शोएब डोंगरे यांची निवड झाली आहे.
आता स्थायी समिती सभापतीपदासाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकीकडे दिग्गजांना संधी न मिळाल्याची चर्चा, तर दुसरीकडे नव्या सदस्यांची निवड यामुळे ठाणे महापालिकेतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
Ans: ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीवर एकूण 16 सदस्यांची निवड झाली आहे.
Ans: दिलीप बारटक्के, राजेश मोरे, पवन कदम, बाबाजी पाटील, संध्या मोरे, प्रमिला केणी, आदेश भगत, विक्रांत तांडेल आणि महेश साळवी यांची निवड करण्यात आली आहे.
Ans: भाजपला स्थायी समितीमध्ये तीन जागा मिळाल्या आहेत. भरत चव्हाण, मृणाल पेंडसे आणि कमल चौधरी यांची निवड झाली आहे.