Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, हिम्मत असेल तर…; नाना पटोलेंचं आव्हान

राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर निवडणूक आयोग पुराव्यासह खुलासा का करत नाही, असा संतप्त सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी विचारला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 07, 2025 | 06:26 PM
निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, हिम्मत असेल तर...; नाना पटोलेंचं आव्हान

निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, हिम्मत असेल तर...; नाना पटोलेंचं आव्हान

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : लोकसभा निवडणुकीत घवघवीत विजय मिळवलेल्या महाविकास आघाडीचा पाच महिन्यातच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव होतो हे अनाकलनीय आहे. रात्रीच्या अंधारात मतांवर दरोडा टाकून भाजपा युती निवडणूक आयोगाच्या मदतीने विजयी झाली आहे. राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर निवडणूक आयोग पुराव्यासह खुलासा का करत नाही, असा संतप्त सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी विचारला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना नाना पटोले म्हणाले की, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदान झाले, त्याच रात्री ११.३० वाजता ते ६५.०२ टक्के तर दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५ टक्के झाल्याचे सांगितले, यात एकूण ७.८३ टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. तब्बल ७६ लाख मतांची ही वाढ असून मतदानाचा टक्का कसा वाढला? हा मतांवर सरळ सरळ दरोडा टाकलेला आहे.

चंदिगड महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतपत्रिकेत कसा घोटाळा करून भाजपाला विजयी घोषित केले होते हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून जगाने पाहिले आहे. वाराणसी लोकसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर होते नंतर यंत्रणा कामाला लागली व निकाल वेगळा लागला हे उघड झाले आहे. निवडणूक काळात भाजपाच्या मर्जितील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कशी जबाबदारी दिली हेही उघड आहे. भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने निवडणूक जिंकलेली आहे. लोकशाहीला हा कलंक असून निवडणूक आयोगाच्या विश्वासाहर्तेवरही मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे.

पुढे बोलतांना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसने मतांच्या चोरीचा प्रश्न उपस्थित केला असता भाजपा नेतेच त्याला उत्तर देत आहेत. नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः निवडणूक आयोगाची बाजू मांडली. आताही फडणवीस, बावनकुळे हे निवडणूक आयोगाची बाजू मांडत आहेत. भाजपाचे नेते निवडणुक आयोगाचे वकील आहेत का. शिर्डी मतदारसंघात ७ हजार मतदार कसे वाढवले याचे पुरावे आहेत. ज्या मतदारसंघात मतदारांची जेवढी मतदार संख्या बोगस पद्धतीने वाढविली तेवढेच मताधिक्य त्या मतदारसंघात भाजपाला मिळाले आहे. आम्ही पुराव्यानिशी मतदारयाद्यातील घोटाळा व बोगस मतदान दाखवतो, हिम्मत असेल तर भाजपा नेत्यांनी ते खोडून दाखवावे, असे आव्हान नाना पटोले यांनी दिले आहे.

Web Title: Nana patole has questioned the election commission regarding the results of the assembly elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2025 | 06:26 PM

Topics:  

  • Congress
  • Election Commission
  • Nana patole
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

PM Modi Live: “महिलांच्या स्वप्नांचा ज्यांनी चक्काचूर केला त्यांना….”; महिला आरक्षणावरून पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्लाबोल
1

PM Modi Live: “महिलांच्या स्वप्नांचा ज्यांनी चक्काचूर केला त्यांना….”; महिला आरक्षणावरून पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्लाबोल

DA Hike Calculation : 60% महागाई भत्ता लागू! 20000, 30000 आणि 40000 बेसिक Sallary असणाऱ्यांचा किती वाढणार पगार?
2

DA Hike Calculation : 60% महागाई भत्ता लागू! 20000, 30000 आणि 40000 बेसिक Sallary असणाऱ्यांचा किती वाढणार पगार?

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! महागाई भत्त्यात २ टक्क्यांची वाढ; पेन्शनधारकांनाही मिळणार लाभ
3

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! महागाई भत्त्यात २ टक्क्यांची वाढ; पेन्शनधारकांनाही मिळणार लाभ

आज रात्री मोठा निर्णय होणार? PM Narendra Modi येणार लाईव्ह; भाषणाकडे अवघ्या देशवासियांचे लक्ष
4

आज रात्री मोठा निर्णय होणार? PM Narendra Modi येणार लाईव्ह; भाषणाकडे अवघ्या देशवासियांचे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.