Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाळूमाफियांना महादणका! २ कोटी ४ लाखांचा मुद्देमाल जप्त, उपसा करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अवैध वाळू उत्खननावर कारवाई करण्यासाठी विशेष पथक पाठविले होते. नांदडेमध्ये धाड टाकून तब्बल २ कोटी ४ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 13, 2026 | 03:43 PM
Nanded Police take action against illegal sand excavators property worth ₹2.04 crore seized

Nanded Police take action against illegal sand excavators property worth ₹2.04 crore seized

Follow Us
Close
Follow Us:

Nanded News : नांदेड : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौडगाव शिवारात धाड टाकून तब्बल २ कोटी ४ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Nanded News)

पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अवैध वाळू उत्खननावर कारवाई करण्यासाठी विशेष पथक पाठविले होते. या पथकाने ११ मार्च रोजी रात्री ८ वाजता कौडगाव शिवारातील वाळू धक्क्यावर छापा टाकला. कारवाईदरम्यान नदीपात्रातून इंजिन बोटीच्या साहाय्याने वाळूचा उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले. तसेच ही वाळू फायबर बोटीच्या माध्यमातून नदीकिनारी आणली जात असल्याचेही आढळून आले. या कारवाईत पथकाने भारत बेंझ कंपनीचे पाच हायवा, टाटा कंपनीचा एक टिपर, दोन पोकलेन मशीन, एक इंजिन बोट व एक फायबर बोट तसेच नदीपात्रातून काढून ठेवलेली ५५ ब्रास वाळू जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २ कोटी ४ लाख ७५ हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे देखील वाचा : अजित पवार अपघात की घातपात? ‘ब्लॅक बॉक्स’मध्ये छेडछाड होत असल्याचा रोहित पवारांचा खळबळजनक दावा

शेजारील जिल्ह्यात वाळूची होतेय वाहतूक

या प्रकरणी उस्माननगर पोलीस ठाण्यात नऊ आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक ५३/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२), ३ (५) तसेच खाण व खनिज अधिनियम १९५७मधील कलम ४ व २१ आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४८ (७) व ४८ (८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात आलेल्या बोटीही नष्ट करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन गाडेकर करीत आहेत. या कारवाईतून कौडगाव येथील गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू उपसा व वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही वाळू नांदेड जिल्हह्यासह शेजारील जिल्ह्यांमध्ये पुरवली जात असल्याची माहितीही समोर आली आहे. या कारवाईत पो.उप.नि पंकज इंगळे यांच्यासह पो. हे. कॉ.दीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, पो.कॉ. गणेश धुमाळ व कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला.

हे देखील वाचा : मार्च महिन्यातच परिस्थिती गंभीर? ‘या’ जिल्ह्यात केवळ 48.28 टक्केच पाणीसाठा

आता ‘खबर’ हेल्पलाईन सुरू

अवैध व्यवसायांविरोधात केलेल्या या धाडसी कारवाईबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. आणि नागरिकांना आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांपर्यंत सहज पोहोचविता यावी यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने ‘खबर’ हेल्पलाइन सुरू केली आहे. नागरिकांनी ९१५० १०० १०० या मोबाईल क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअॅप संदेशाद्वारे माहिती देण्याचे आवाहन शहाजी उमाप यांनी केले आहे. पोलिस उपमहानिरीक्षक कार्यालयाने हेल्पलाईन सुरू केल्यामुळे त्यावर किती तक्रारी किंवा अवैध व्यवसायाबद्दलची माहिती दिली जाते. हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Nanded police take action against illegal sand excavators property worth 204 crore seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • nanded news
  • Sand Mafia
  • Sand Smuggling

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.