Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नांदेड हादरलं! ५० हजारांच्या हुंड्यासाठी केला छळ; विवाहितेने गळफास घेऊन संपवलं जीवन

माहेरहून ५० हजार रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना विष्णुनगर येथे घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 22, 2026 | 04:44 PM
नांदेड हादरलं! ५० हजारांच्या हुंड्यासाठी केला छळ; विवाहितेने गळफास घेऊन संपवलं जीवन

नांदेड हादरलं! ५० हजारांच्या हुंड्यासाठी केला छळ; विवाहितेने गळफास घेऊन संपवलं जीवन

Follow Us
Follow Us:
  • ५० हजारांच्या हुंड्यासाठी केला छळ
  • विवाहितेने गळफास घेऊन संपवलं जीवन
  • नांदेड जिल्ह्यातील घटनेनं खळबळ
नांदेड : राज्यासह देशभरात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, दररोज वेगवेगळ्या भागात अनेकजण टोकाचा निर्णय घेत आहे. आत्महत्येच्या घटनांची आकडेवारी चिंताजनक आहे. अशातच आता माहेरहून ५० हजार रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना विष्णुनगर येथे घडली आहे. अश्विनी महेश भुसारे असे मृत विवाहितेचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती महेश नारायण भुसारे, विशाल नारायण भुसारे आणि प्रयागबाई नारायण भुसारे यांनी संगनमताने अश्विनी यांच्याकडे माहेरहून ५० हजार रुपये आणण्यासाठी वारंवार तगादा लावला. पैसे न आणल्यास जीवे मारण्याची धमकी देत मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून अश्विनी यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी त्यांचे भाऊ गोपाळ नामदेव नाटकर यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे विष्णुनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हुंड्यासाठी होणाऱ्या छळाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा : जमुई विनयभंग प्रकरणातील दोन आरोपींचे एन्कांऊटंर; पोलिसांच्या चकमकीत नेमकं काय घडलं?

सहावीतील विद्यार्थ्याने संपवलं जीवन

गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी वडिलांनी परवानगी न दिल्याने रागाच्या भरात चोपडा तालुक्यातील घुमावल येथील इयत्ता सहावीतील १२ वर्षीय मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घुमावल येथील एका कुटुंबातील १२ वर्षीय मुलाला गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी व्हायचे होते. मात्र, आई-वडिलांनी त्याला मिरवणुकीत जाण्यास परवानगी दिली नाही. याचा त्याला राग आला होता. त्यानंतर त्याने घरातील वरच्या मजल्यावर जाऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हे सुद्धा वाचा : अपघातग्रस्तांच्या मदतीला पुणे महापालिका धावणार? नगरसेवक अमोल बालवडकरांचा स्थायी समितीसमोर प्रस्ताव

Web Title: An incident where a married woman committed suicide has occurred in nanded district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 04:44 PM

Topics:  

  • crime news
  • nanded news
  • Suicide case

संबंधित बातम्या

Jamui Molestation Case: जमुई विनयभंग प्रकरणातील दोन आरोपींचे एन्कांऊटंर; पोलिसांच्या चकमकीत नेमकं काय घडलं?
1

Jamui Molestation Case: जमुई विनयभंग प्रकरणातील दोन आरोपींचे एन्कांऊटंर; पोलिसांच्या चकमकीत नेमकं काय घडलं?

गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांचा नकार, सहावीतील विद्यार्थ्याने संपवलं जीवन; जळगावमधील घटना
2

गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांचा नकार, सहावीतील विद्यार्थ्याने संपवलं जीवन; जळगावमधील घटना

बहिणीची छेड काढल्याचा राग, बेदम मारहाण करुन तरुणाचा खून; वाकडमधील घटनेनं खळबळ
3

बहिणीची छेड काढल्याचा राग, बेदम मारहाण करुन तरुणाचा खून; वाकडमधील घटनेनं खळबळ

नागपुरात ‘दृश्यम’ स्टाईल हत्या; जंगलात जमिनीत पुरलेला मृतदेह आढळला, कापलेले 2 लिंबू…
4

नागपुरात ‘दृश्यम’ स्टाईल हत्या; जंगलात जमिनीत पुरलेला मृतदेह आढळला, कापलेले 2 लिंबू…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.