अमरावतीमध्ये पाणी टंचाई (फोटो- istockphoto)
अमरावती जिल्ह्यात पाणी पातळी घसरली
प्रकल्पात केवळ ४८.२८ टक्के जलसाठा
जिल्ह्यातील धरणांमध्ये अध्यपिक्षा कमी साठा
अमरावती: उन्हाळ्याची चाहूल लागताच अमरावती जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील पाणीपातळी झपाट्याने घटू लागली आहे. जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु अशा एकूण ५६ सिंचन प्रकल्पांमध्ये सध्या सुमारे ९८५.९० दलघमी इतकाच पाणीसाठा उपलब्ध असून तो एकूण क्षमतेच्या केवळ ४८.२८ टक्के आहे. त्यामुळे उन्हाळी पिकांचे नियोजन, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि नदीपात्रातील पाण्याबाबत प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात एक मोठा, सात मध्यम व ४८ लघुप्रकल्प असून त्यांची एकूण साठवण क्षमता २०४७.३० दलघमी आहे. त्यापैकी सध्या ९८५.९० दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे.
मोठ्या प्रकल्पामध्ये असलेल्या उर्ध्व वर्धा धरणाची साठवण क्षमता ५६४.०५ दलघमी असून सध्या त्यात ३२२.७१ दलघमी महणजे ५७.२१ टक्के पाणी उपलब्ध आहे. मध्यम प्रकल्पांची एकूण साठवण क्षमता २५६.२४ दलघमी असून सध्या १२७.१३ दलघमी म्हणजे सुमारे ४९.६२ टक्के पाणी आहे.
तर जिल्ह्यातील ४८ लघु प्रकल्पाची क्षमता २२७.०१ – दलघमी असून त्यात १२८.८६ दलघमी – म्हणजे ५६.७६ टक्के साठा उपलब्ध आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच – जलसाठा निम्म्याच्या आसपास राहिल्याने एप्रिल-मे महिन्यात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात – आहे. दरम्यान जिल्ह्यातील वर्धा, पूर्णा – आणि इतर उपनद्यांच्या प्रवाहातही पाणी कमी होत चालले आहे.
अप्पर वर्धात ५७ टक्क्यावर जलसाठा
उन्हाळा वाढल्यामुळे जिल्ह्यातील सर्व धरणांची पातळीत घटली आहे. परंतु अमरावती शहराला पाणी पुरवठा करणार्या अप्पर वर्धात अजूनही ५७ टक्क्यावर पाणी साठा आहे. परंतू जिल्ह्यातील मेळघाट परिसरात शेतकरी व ग्रामस्थ पाण्यासाठी ताणतणावाचा सामना करत आहेत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत, मात्र सतत वाढणाऱ्या तापमानामुळे पाण्याची समस्या दीर्घकाळ टिकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
समुद्राच्या एक लिटर पाण्यापासून किती मीठ तयार केले जाते? वाचून तुम्हीसुद्धा व्हाल आश्चर्यचकित
आ. सुरेश धस यांचे आदेश
आष्टी नगरपंचायत, पाटोदा आणि नगरपंचायत शिरूर कासार या तीन नगरपंचायतींमध्ये राज्याच्या नगरविकास विभागाच्या नगरोत्थान असलेल्या योजनेंतर्गत सुरू पाणीपुरवठा योजना व नळजोडणी कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत आ. सुरेश धस यांनी पावसाळ्यापूर्वी सर्व कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याचे महत्त्व सांगितले. बैठकीत तीनही नग्रपंचायतींमधील सध्या सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती तपासली. यामध्ये पाणीपुरवठा, नळजोडणी, पाणी टाक्या, फिल्टर युनिट, उपलब्ध पाणीसाठा आणि शहरांमध्ये सध्या मिळणारा पाणीपुरवठा यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.






