Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded News : नांदेडमध्ये राजकीय घडामोडींना वेग; विविध घटनांनी जोरदार गाजला आठवडा

Nanded News : नांदेडमध्ये निवडणुकांचा कालावधी नसल्याने अनेक नेते आणि कार्यकर्ते शांत असल्याचे चित्र असले, तरी लोहा व कंधार मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 30, 2026 | 03:36 PM
Meetings among political leaders have increased in Nanded political news

Meetings among political leaders have increased in Nanded political news

Follow Us
Close
Follow Us:

Nanded Political News : अमृत देशमुख : नांदेड : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात वाढत्या उष्णतेबरोबरच राजकीय व सामाजिक घडामोडींनीही जोर धरल्याचे दिसून आले. निवडणुकांचा कालावधी नसल्याने अनेक नेते आणि कार्यकर्ते शांत असल्याचे चित्र असले, तरी लोहा व कंधार मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लोहा येथे पार पडलेल्या भव्य शेतकरी मेळाव्यात धोंडगे यांनी आपल्या सुपुत्र शिवराज आणि दिलीप यांची राजकीय एंट्री घडवून आणत आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली. महानगरपालिका निवडणुकांनंतर भाजपने सत्ता स्थापन केली असून महापौर, उपमहापौर आणि विविध समित्यांचे सभापती निवडले गेले आहेत. (Nanded News)

खासदार, आमदारांची वारी 

मात्र, विरोधी पक्षनेत्याची निवड अद्याप प्रलंबित असून सत्ताधा-यांकडून विरोधकांना फारसे महत्व दिले जात नसल्याची चर्चा रंगत आहे. मनपामध्ये आता प्रशासनिक कामकाज वेगाने सुरू झाले असून अर्थसंकल्पाची तयारीही सुरू आहे.
खासदार आणि आमदार दिल्ली व मुंबई येथे शासकीय कामकाजासाठी जात असले, तरी सुट्टीच्या काळात ते नांदेडमध्ये येऊन स्थानिक प्रश्न मांडत आहेत. विकासाच्या विविध मुद्द्यांवर शासनदरबारी पाठपुरावा सुरू असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सामाजिक पातळीवर रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील भव्य शोभायात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून धार्मिक एकतेचे दर्शन घडवले. रामनवमी निमित्त काढलेली शोभायात्रा दीर्घकाळ नांदेडकरांच्या स्मरणात राहील, अशीच होती.

हे देखील वाचा : पार्थ पवार अन् राज ठाकरेंची भेट; तब्बल दीड तास चर्चा, कारण मात्र गुलदस्त्यात

उपमहानिरिक्षक कार्यालय अव्वल

महाराष्ट्र शासनाने प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने राबविलेला १५० दिवसीय ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम हा राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. या उपक्रमात नांदेड पोलीस परिक्षेत्राने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत केवळ यश मिळवले नाही, तर आधुनिक प्रशासनाचा एक आदर्श नमुना निर्माण केला आहे. एकूणच, वाढत्या तापमानासोबतच नांदेड जिल्ह्यात राजकीय हालचाली, सामाजिक उपक्रम आणि प्रशासनिक घडामोडींनी वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून आरोग्य विभागाने आला उन्हाळा आरोग्य सांभाळा,’ असे म्हणत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

हे देखील वाचा : काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचा भीषण अपघात; एअरबॅग उघडल्या नाहीच अन्..

नांदेडमध्ये शेतकरी मेळावा 

शिवसेनेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा असून शेतकऱ्यांसाठी अहोरात्र झटणारे कार्यकर्ते म्हणजे शंकरअण्णा धोंडगे आहेत, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात केले. लोहा येथील बैल बाजार मैदानावर माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्या पुढाकारातून शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर खासदार ज्योती वाघमारे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी मंत्री सिद्धराम मेहत्रे, आमदार हेमंत पाटील, बालाजी कल्याणकर, आनंदराव बोंढारकर, बाबुराव कदम कोहळीकर, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, दत्ता पवार, शिवराज धोंडगे, दिलीप धोंडगे उपस्थित होते.

Web Title: Meetings among political leaders have increased in nanded political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • nanded news
  • political news

संबंधित बातम्या

आधार-पॅनचा गैरवापर करून निर्माण केली कंपनी; वसमतमध्ये १०५ कोटींच्या व्यवहाराचा धक्कादायक प्रकार
1

आधार-पॅनचा गैरवापर करून निर्माण केली कंपनी; वसमतमध्ये १०५ कोटींच्या व्यवहाराचा धक्कादायक प्रकार

Nanded News : धोंडगेंचा प्रवेश कलाटणी देणारा…; नांदेडमध्ये DCM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
2

Nanded News : धोंडगेंचा प्रवेश कलाटणी देणारा…; नांदेडमध्ये DCM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

Tamil Nadu Election 2026 : थलपथीची राजकीय खेळी: अभिनेता विजय दोन जागांवरून लढवणार निवडणूक
3

Tamil Nadu Election 2026 : थलपथीची राजकीय खेळी: अभिनेता विजय दोन जागांवरून लढवणार निवडणूक

राजकीय पटावर धोंडगे बंधूंची दमदार एंट्री; नांदेडमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन
4

राजकीय पटावर धोंडगे बंधूंची दमदार एंट्री; नांदेडमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.