खासदार पार्थ पवार आणि मनसे नेते राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट झाली (फोटो - सोशल मीडिया)
Parth Pawar Raj Thackeray Meet : मुंबई : दोन महिन्यांपूर्वी दिवंगत नेते अजित पवार यांचे निधन झाले, अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे राजकीय क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. यानंतर आता सुनेत्रा पवार यांनी राज्याची आणि पक्षाची धुरा हाती घेतली आहे. तसेच अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे राजकारणामध्ये सक्रीय झाले आहेत. पार्थ पवार यांनी मनसे नेते राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे आणि पार्थ पवार (Parth Pawar) यांची ही भेट चर्चेचा विषय ठरला आहे.
मनसे नेते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी खासदार आणि युवा नेते पार्थ पवार हे सकाळी पावणे अकराच्या सुमारास दाखल झाले. त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाली. या प्रदीर्घ चर्चेमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या भेटीनंतर पार्थ पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. त्यामुळे चर्चा तीव्र झाल्या आहेत.
हे देखील वाचा : नीलम गोऱ्हे सुद्धा अशोक खरातच्या भक्त? राजकीय फायद्यासाठी केली नाशिकवारी
अजित पवार यांच्या बारामती अपघातावर मनसे नेते राज ठाकरे यांनी संशय व्यक्त केला होता. या अपघातावर प्रतिक्रिया दिल्यानंतर पार्थ पवारांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. यापूर्वी आमदार रोहित पवार यांनी देखील राज ठाकरेंची भेट घेतली होती. अजित पवारांच्या अपघातावर संशय आणि कंपनीविरोधात कारवाई यासंदर्भात राज ठाकरेंनी रोहित पवारांना मार्गदर्शन केले होते. यानंतर आता पार्थ पवार यांनी देखील भेट घेतली.
खासदार पार्थ पवार आणि मनसे नेते राज ठाकरेंच्या भेटीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. ही भेट राजकीय होती की वैयक्तिक होती हे समोर आलेले नाही. तसेच सदर भेटीत नेमकी कोणती राजकीय चर्चा झाली? याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी आगामी राजकारणात या भेटीचे परिणाम दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे देखील वाचा : काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचा भीषण अपघात; एअरबॅग उघडल्या नाहीच अन्..
खासदार डॉ. प्रशांत पडोळेंचा अपघात
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. नागपूर एअरपोर्टच्या दिशेने प्रवास करताना खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या चारचाकी गाडीचा अपघात झाला. सुदैवाने यामध्ये खासदार डॉ. प्रशांत पडोळे हे किरकोळ जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र यामुळे पुन्हा एकदा राजकीय नेत्यांच्या सुरक्षेचा आणि सतत होत असलेल्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अपघातात काँग्रेस खासदारांसह त्यांचा ड्रायव्हर जखमी झाला आहे. सध्या दिल्लीमध्ये संसदेचं अधिवेशन सुरु आहे. त्यात सहभागी होण्यासाठी डॉ. प्रशांत पडोळे चालले होते. यामुळे नागपूर एअरपोर्टच्या दिशेने ते चारचाकीने चालले होते. मात्र त्यांच्या गाडीचा अपघात झाला. आश्चर्याची बाब म्हणजे यापूर्वी देखील 2025 मध्ये खासदार प्रशांत पडोळे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. त्यावेळी सुद्धा सुदैवाने त्यांचे प्राण वाचले होते.






