Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विभागीय आयुक्तालयाच्या प्रक्रियेला वेग; नांदेड जिल्ह्याच्या विकासाला मिळणार गती

राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला असून यामध्ये नांदेडच्या वाट्याला अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. याबाबत खासदार अजित गोपछडे यांनी माहिती दिली.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 09, 2026 | 05:19 PM
MP Ajit Gopchhade informed many schemes have been announced for Nanded in the Maharashtra budget

MP Ajit Gopchhade informed many schemes have been announced for Nanded in the Maharashtra budget

Follow Us
Follow Us:

Nanded News : नांदेड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून सादर केलेला अर्थसंकल्प राज्याला नवचैतन्य देणारा ठरेल. या अर्थसंकल्पामुळे मराठवाड्‌यासह नांदेड जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास भाजपाचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी व्यक्त केला. नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, नांदेड (Nanded News) येथे विभागीय आयुक्तालय स्थापन करण्यासाठी सध्या सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून ही प्रक्रिया गतीमान करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासोबतच जिल्ह्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी एमएसएमई उद्योग केंद्र तसेच जिओ टेक्नॉलॉजी सेंटर उभारणीसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ट्रॅफिक सर्वेक्षण करण्यात येणार असून दोन मोठ्या उड्डाणपुलांची योजना प्रस्तावित असल्याची माहिती त्यांनी दिली.

धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल

तसेच नांदेड रेल्वे स्थानकाचा अमृत योजनेत समावेश करण्यात आला असून वंदे भारत रेल्वेच्या विलंबाचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नांदेड-लातूर रोड आणि नांदेड-बिदर मार्गाच्या विकासाला गती देण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे गोपछडे यांनी सांगितले. धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी तख्त सचखंड गुरुद्वारा परिसराचे सुशोभीकरण व वारसा संवर्धनासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यासोबतच नांदेडला “पवित्र शहर” दर्जा मिळवून देण्यासाठी सर्वंकष प्रयत्न सुरू असून त्यामुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सूर्यधारा योजना, वृक्षलागवड अभियान तसेच पूरग्रस्तांना मदत यांसारख्या उपक्रमांवरही भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस संजय कौडगे, चैतन्यबापू देशमुख जिल्हाध्यक्ष अॅड. किशोर देशमुख, उपमहापौर दिपकसिंह रावत, दिलीप ठाकूर, शैलजा स्वामी, वैजनाथ देशमुख, शीतल खांडील आदींची उपस्थिती होती.

हे देखील वाचा : बारामती अपघात प्रकरणातील मृत पिंकी माळीच्या कुटुंबियांना धमकी? राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा

प्रश्न मार्गी लागणार

खासदार अजित गोपछडे म्हणाले की, “खासदार अशोक चव्हाण व मी एकत्रितपणे सभागृहात नांदेडच्या विकासाचे प्रश्न मांडत असून अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत, विभागीय आयुक्तालय नांदेडला होण्याबाबत सकारात्मक वातावरण निर्मिती झाली असून लवकरच याबाबतचा निर्णय होईल,” असा विश्वास खासदार अजित गोपछडे यांनी यावेळी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प राज्याच्या पर्यायाने नांदेडच्या विकासाला चालना देणारा आहे, असे ते यावेळी म्हणाले.

हे देखील वाचा : चंद्रशेखर बावनकुळे आता दुसऱ्या राज्यामध्ये खेळणार राजकीय डाव; पक्षाने सोपवली मोठी जबाबदारी

Web Title: Mp ajit gopchhade informed many schemes have been announced for nanded in the maharashtra budget

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 05:19 PM

Topics:  

  • nanded news
  • Nanded Politics

संबंधित बातम्या

नांदेड हादरलं! ५० हजारांच्या हुंड्यासाठी केला छळ; विवाहितेने गळफास घेऊन संपवलं जीवन
1

नांदेड हादरलं! ५० हजारांच्या हुंड्यासाठी केला छळ; विवाहितेने गळफास घेऊन संपवलं जीवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.