आसाम राज्यातील राज्यसभा निवडणुकींच्या जागांसाठी भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी देण्यात आली (फोटो - सोशल मीडिया)
भाजप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी सोमवारी बिहार, हरियाणा आणि ओडिशा या तीन महत्त्वाच्या राज्यांसाठी केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती जाहीर केली आहे. निवडणुकीदरम्यान पक्षातील समन्वय आणि उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी यासंबंधित अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये नियुक्त केलेल्या नेत्यांची नावे देण्यात आली आहे.
हे देखील वाचा : “भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध! परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे युद्धजन्य परिस्थितीवर राज्यसभेत भाष्य
बिहारसाठी केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा आणि छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांना राज्यातील राज्यसभा निवडणुकीच्या देखरेखीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बिहारची राजकीय संवेदनशीलता लक्षात घेता, या दोन्ही अनुभवी नेत्यांना एकत्र जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर हरियाणा राज्यासाठी गुजरातचे प्रमुख उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हरियाणामध्ये संघवी यांच्या संघटनात्मक कौशल्याचा फायदा घेण्याची पक्षाला अपेक्षा आहे. त्याचबरोबर ओडिशा राज्यातील राजकारणासाठी महाराष्ट्रातील नेत्याला जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ओडिशामध्ये केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री @NitinNabin ने राज्य सभा चुनाव हेतु विभिन्न राज्यों के केंद्रीय पर्यवेक्षक की नियुक्ति की है। pic.twitter.com/0VhojZMUjL — BJP (@BJP4India) March 9, 2026
हे देखील वाचा : “हा भारतीय संघाचा खात्रीशीर विजय..! T20 विश्वविजेता संघाचे CM देवेंद्र फडणवीसांनी केले अभिनंदन
पक्षश्रेष्ठींनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना जबाबदारी दिल्यामुळे त्यांनी पक्षाचे धन्यवाद मानले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करत चंद्रशेखर बावनकुळे यांनी लिहिले आहे की, नितीन नबिनजी यांनी माझ्यावर पक्षाचा केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी सोपवली आहे.ही महत्त्वपूर्ण जबाबदारी विश्वासाने सोपवल्याबद्दल देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह तसेच भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. नितीन नबीनजी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, अशा शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप पक्ष नेतृत्वाचे धन्यवाद मानले आहेत.
🔸ओडिशा राज्यातील राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. नितीन नबिनजी यांनी माझ्यावर पक्षाचा केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी सोपवली आहे. ही महत्त्वपूर्ण जबाबदारी विश्वासाने सोपवल्याबद्दल देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री मा.… pic.twitter.com/moKyAldcVg — Chandrashekhar Bawankule (@cbawankule) March 9, 2026






