बारामती अपघात प्रकरणातील मृत पिंकी माळीच्या कुटुंबियांना VSR कंपनीकडून धमकी मिळत असल्याचा दावा केला जात आहे (फोटो - सोशल मीडिया)
मृत पिंकी माळी यांच्या आई रुग्णालयामध्ये दाखल आहेत. मागील 13 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांची रुग्णालयामध्ये जाऊन विचारपूस करत भेट घेतली आहे. या भेटीमध्ये पिंकी माळी यांच्या आईने त्यांच्या कुटुंबियांना धमकवले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आणली आहे. अपघातीग्रस्त विमान असलेल्या कंपनीच्या लोकांकडून या धमक्या येत असल्याचा दावा केला आहे.
हे देखील वाचा : चंद्रशेखर बावनकुळे आता दुसऱ्या राज्यामध्ये खेळणार राजकीय डाव; पक्षाने सोपवली मोठी जबाबदारी
आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन या भेटीची माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, “गेल्या तेरा दिवसांपासून उपचार घेत असलेल्या पिंकी माळीच्या आईच्या तब्येतीची आज हॉस्पिटल ला जाऊन विचारपुस केली. यावेळी तिचे वडील व भाऊ उपस्थित होते. VSR चा मालक VK सिंग याने वॉट्सअप कॉल करून मीडियापासुन दुर राहण्याची भावाला धमकी दिल्याचे Recorded कॉल वर ऐकले.ज्यात पायलट ने “अजित पवार इनके फ्लाईट को ठोक दिया” अशी वापरलेली भाषा ही VSR चे अंडरवर्ल्ड शी संबंध तर नाही ना ?अशी शंका उपस्थित करते ..एक मात्र खरंय हे प्रकरण वरवर जस दिसतय तस सोप नाहीये. आपल्या दादांचा घात झालाय,”असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे.
गेल्या तेरा दिवसांपासून उपचार घेत असलेल्या पिंकी माळीच्या आईच्या तब्येतीची आज हॉस्पिटल ला जाऊन विचारपुस केली. यावेळी तिचे वडील व भाऊ उपस्थित होते. VSR चा मालक VK सिंग याने वॉट्सअप कॉल करून मीडियापासुन दुर राहण्याची भावाला धमकी दिल्याचे Recorded कॉल वर ऐकले.ज्यात पायलट ने “अजित… pic.twitter.com/URP2RaXTX6 — आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 9, 2026
हे देखील वाचा : अजित पवार अपघात प्रकरणाची चर्चा 3 दिवस पुढे ढकलली; राष्ट्रवादीचे नेते नाराज
दिवंगत नेते अजित पवार यांचे 28 फेब्रुवारी रोजी बुधवारी विमान अपघात झाला. लँडिंगदरम्यान विमान (Learjet 45) धावपट्टीजवळ कोसळले. यामुळे विमानामध्ये तीन स्फोट झाले. विमानाला लागलेल्या आगीमध्ये सर्व प्रवासी आणि विमान जळून खाक झाले. या विमानाचा अपघात इतका भीषण होता की यामध्ये उपमुख्यमंत्र्यांसह पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सुरक्षारक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी, पायलट-इन-कमांड कॅप्टन सुमित कपूर आणि सेकंड-इन-कमांड कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश होता. गुरुवारी बारामतीतील काटेवाडी येथील विद्या प्रतिष्ठान मैदानावर अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.






