Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ही राजकीय नव्हे, विकासाची स्पर्धा…; दिल्लीतील भेटीगाठीबाबत खासदार अशोक चव्हाण यांची मार्मिक टिप्पणी

दिल्लीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये नांदडेमधील राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी अनेक नेत्यांची भेट घेतली आहे. या भेटीवर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 06, 2026 | 02:12 PM
Nanded News, Ashok Chavan, Nanded BJP Core Committee

Nanded News, Ashok Chavan, Nanded BJP Core Committee

Follow Us
Follow Us:

Nanded News : नांदेड : नांदेडच्या विकासाची एक्स्प्रेस सुपरफास्टपणे धावत असून खासदार गोपछडे व मी दोघेही प्रयत्न करत आहोत, ही अतिशय चांगली बाब आहे, असे म्हणत खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी दिल्लीतील गाठीभेटी सत्रांवर मार्मिक टिप्पणी केली. ही राजकीय स्पर्धा नव्हे तर विकासाची स्पर्धा आहे असेही ते यावेळी म्हणाले. विकासाच्या स्थानिक प्रश्नांवर गांभीर्यपूर्वक काम केले जात असून नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे, मनपाची एकंदरीत परिस्थिती व शहरातील विविध महत्त्वपूर्ण प्रश्नांची माहिती आपण मुख्यमंत्र्यांना दिली असून त्यांनी शहराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे, असे खासदार चव्हाण यांनी यावेळी सांगितले. (Political News)

महापौर निवडीबाबत राज्याची कोअर कमिटीच निर्णय घेईल, असे म्हणत खासदार चव्हाण यांनी महापौर निवडीतील सस्पेन्स आणखी वाढवला आहे. महानगरपालिकेवर पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली असून शहराच्या विकासासाठी पहिल्या दिवसापासून काम करण्यासाठीची सज्जता खासदार चव्हाण यांनी अगोदरपासूनच करून ठेवली आहे, त्याचाच एक भाग म्हणून मागील आठवड्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून शहरविकासाबाबत विस्तारपूर्वक चर्चा केली होती.

हे देखील वाचा : पंजाबमध्ये कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा; AAP नेत्यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

निवडणुकीत जी आश्वासने दिली होती, त्याची पूर्तता करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. केंद्रीय अर्थसंकल्पावर भाष्य करतानाच शहरविकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची उजळणी खासदार चव्हाण यांनी केली. दिल्लीतील अधिवेशनाच्या निमित्ताने खासदार अजित गोपछडे व खासदार अशोकराव चव्हाण यांनी अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेत निवेदने दिली आहेत.

विकासाची गाडी धावतेय सुपरफास्ट

राज्यसभेत प्रश्न मांडण्याची तसेच भेटीगाठी घेण्याची या दोन नेत्यांमध्ये जणू स्पर्धाच लागली आहे, याबाबत पत्रकार परिषदेत त्यांना विचारले असता, ते म्हणाले स्पर्धा लागली ही चांगली बाब असून आम्ही दोघेही विकासासाठी प्रयत्न करत आहोत. विकासाची गाडी सुपरफास्टपणे धावत आहे. गोदावरी शुद्धीकरणासाठी ‘नमामी गंगे’ च्या धर्तीवर ‘नमामी गोदे’ हा प्रकल्प राबविण्यात यावा, यासाठी खा. गोपछडे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांना माझे समर्थन आहे, असे खासदार चव्हाण यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा : फक्त चौकशीसाठी पोलिस कोणालाही अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

राजकीय चिमटा

खा. गोपछडे यांनी एक फोटो काढला की मी लगेच दोन फोटो काढतो असे म्हणत खा. चव्हाण यांनी दिल्लीतील मंत्र्यांच्या गाठीभेटीबाबत खुमासदार शैलीत राजकीय चिमटा काढला ते जे करत आहेत, त्या बाबींना माझे समर्थनच आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

सोमय्या व चव्हाण यांच्यात चर्चा

माध्यमांशी संवाद साधल्यानंतर खासदार अशोक चव्हाण है नियोजित कार्यक्रमासाठी रवाना होणार होते, यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या हे शासकीय विश्रामगृहात दाखल झाले होते. बाजूच्या कक्षात ते थांबले होते, यावेळी खा. चव्हाण, खा. गौपछडे यांनी सोमय्या यांची भेट घेतली. खा. चव्हाण व सोमय्या यांच्यात बंददाराआड काही वेळ चर्चा झाली. त्यानंतर खा. चव्हाण व सोमय्या है आप आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.

Web Title: Mp ashok chavan explained the reason for his meetings with leaders in delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • Ashok Chavan
  • nanded news
  • political news

संबंधित बातम्या

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
1

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
2

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
3

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद
4

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.