Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : विरोधी पक्षांचा असंवैधानिक पवित्रा…! महिला आरक्षणावरुन चव्हाण पिता-पुत्री आक्रमक

महिला आरक्षण विधेयक रद्द केल्यामुळे सत्ताधारी भाजप नेत्यांनी विरोधकांविरोधात आवाज उठवला आहे. खासदार अशोक चव्हाण व आमदार श्रीजया चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेतील आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 23, 2026 | 02:19 PM
Srijaya Chavan and Ashok Chavan Reaction to the Repeal of the Women Reservation Bill nanded news

Srijaya Chavan and Ashok Chavan Reaction to the Repeal of the Women Reservation Bill nanded news

Follow Us
Follow Us:

Nanded News : नांदेड : महिला आरक्षणाच्या मात्र मुद्द्यावर विरोधी पक्षाने घेतलेली भूमिक असंवैधानिक असल्याची टीका भाजपचे नेते अशोकराव चव्हाण आणि आमदार श्रीजया चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. महिला आरक्षणाबाबत (Women Reservation Bill) १६ ते १८ एप्रिल दरम्यान अधिवेशन बोलाविण्यात आले होते. विरोधकांच्या भूमिकेमुळे आरक्षण विधेयक मंजूर होऊ शकले नाही, यामुळे महिलांचे मोठे नुकसान झाले, असा आरोप आमदार श्रीजया चव्हाण यांनी केला. त्या म्हणाल्या, ‘आरक्षणाचे बिल मंजूर झाले असते तर लोकसभेतील सदस्यसंख्या ८१६ झाली असती आणि त्यात २७२ महिला खासदार असत्या.

सध्या लोकसभेत केवळ १० महिला खासदार आहेत. १९५२ च्य पहिल्या लोकसभा निवडणुकीत फक्त  ४
व महिला खासदार होत्या. महिलांना आरक्षण मिळण्यासाठी अजूनही बराच काळ लागू शकतो.’ खासदार अशोकराव चव्हाण यांनी विरोधी पक्ष नेत्यांवर टीका करताना सांगितले की, ‘महिलांचा आरक्षणाचा विषय हा केवळ भाजपचा अजेंडा नसून महिलांना योग्य प्रतिनिधित्व मिळालेच पाहिजे. जगातील अनेक देशांच्या संसदेत महिलांचे प्रमाण अधिक आहे. भारतातही हे चित्र बदलण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

पुढे श्रीजया चव्हाण म्हणाल्या की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात महिलांन मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळाले आहे. महिला आरक्षणाच्या मुद्यावर स्थानिक पातळीवर भाजपकडून अपेक्षित हालचाल झालेल्या नाहीत, याकडे लक्ष वेधल असता, लवकरच आंदोलन उभारत जाईल,” असे श्रीजया चव्हाण यांनी स्पष्ट केले.

हे देखील वाचा : BJP विजयी मार्गावर? ममता दीदींनी सरळ राजकारण केलं असतं तर…राहुल गांधींच्या वक्तव्याने खळबळ

विरोधकांना परिणाम भोगावे लागतील

तसेच, पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये महिला आरक्षणाला विरोध केल्याचे परिणाम विरोधकांना भोगावे लागतील, असेही अशोक चव्हाण म्हणाले. महिला आरक्षण विधेयक यापूर्वी आठ वेळा नाकारले गेले असून २०२३ मध्ये ते मंजूर झाले, मात्र डिलिमिटेशनची प्रक्रिया प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले. या विधेयकाचे श्रेय भाजपला मिळू नये, या भीतीपोटी विरोधक अडथळे आणत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

हे देखील वाचा : बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार किती मतांनी निवडून होणार? रोहित पवार म्हणाले…

नांदेडमधील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिस आयुक्तालय स्थापन करण्याची गरज असल्याचे मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिस महासंचालक दाते यांची भेट घेतल्याचे सांगितले. लवकरच यासंदर्भात सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. चार मुलांच्या मृत्यू प्रकरणी संपूर्ण माहिती घेतली जात असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नांदेड महावितरणच्या कारभारावरही चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. ‘महावितरणचे कर्मचारी संवेदनशीलतेने काम करत नाहीत. उद्या होणाऱ्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल,’ असे त्यांनी सांगितले.

Web Title: Srijaya chavan and ashok chavan reaction to the repeal of the women reservation bill nanded news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • Ashok Chavan
  • nanded news
  • Nanded Politics

संबंधित बातम्या

Nanded Crime News: ‘मंगल, माझ्याशी लग्न कर!’ नकार मिळताच नात्याला रक्तरंजित वळण; तरुणीचा मृत्यू, प्रियकर फरार!
1

Nanded Crime News: ‘मंगल, माझ्याशी लग्न कर!’ नकार मिळताच नात्याला रक्तरंजित वळण; तरुणीचा मृत्यू, प्रियकर फरार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.