Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजित पवारांना डावललं; नरहरी झिरवळांचा आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा

आपल्या वेगवेगळ्या राजकीय भूमिकांमुळे नरहरी झिरवाळ सातत्याने चर्चेत असतात.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 20, 2024 | 01:54 PM
सौजन्य- सोशल मिडीया

सौजन्य- सोशल मिडीया

Follow Us
Follow Us:

नाशिक :  लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालानंतर भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील मतभेदाची चर्चा संपूर्ण राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. अजित पवार गटाचे नेते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

आपल्या वेगवेगळ्या राजकीय भूमिकांमुळे नरहरी झिरवाळ सातत्याने चर्चेत असतात. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत झिरवाळांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार संदीप गुळवे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय़ घेतला आहे. संदीप गुळवे हे ठाकरे गटाचे उमेदवार असून झिरवाळ गुळवे यांच्या प्रचारात सहभागी होणार आहेत.

गुळवे यांना पाठिंबा देण्यामागचे कारणही त्यांनी सांगितले आहे. गुळवे यांच्या कुटूंबियांशी आपले वैयक्तिक संबंध असल्याने आपण त्यांना पाठिंबा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहेत. पण राजकीय भूमिका आणि वैयक्तिक संबंध वेगवेगळे विषय आहेत. राजकारणात वैयक्तिक संबंधांपेक्षा राजकीय भूमिका महत्त्वाचे असतात. त्यामुळे गुळवे यांना पाठिंबा देण्याचा विषय सध्या चर्चेत आला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत दरी पडली आहे. भाजप, आरएसएस, आणि शिंदे गटाकडून अजित पवार यांच्यावर आरोप होत असल्याने त्यांच्या आमदारांमध्येही नाराजीचा सूर आहे. या सर्व गदारोळात झिरवळ यांनी वाट बदलली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दुसरीकडे महायुतीचे अनेक आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा दावा आघाडीतील नेते करत आहेत. अशातच झिरवाळ यांच्या या भूमिकेने त्याला दुजोरा मिळत असल्याचेही काहींचे म्हणणे आहे. पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Web Title: Narahari jhirwalas support for the leading candidate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2024 | 01:54 PM

Topics:  

  • ajit pawar
  • nashik political news
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Amol Kolhe News:  सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली का? अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं
1

Amol Kolhe News: सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली का? अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं

‘अर्थखातं लवकरच राष्ट्रवादीकडे येणार’; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं आश्वासन, जय पवारांचा मोठा दावा
2

‘अर्थखातं लवकरच राष्ट्रवादीकडे येणार’; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं आश्वासन, जय पवारांचा मोठा दावा

Pravin Tarde : ‘पहिली भेट दादांच्या चरणी’; ‘देऊळबंद 2’ सिनेमाचे 100 कोटी पार! अजित पवारांच्या स्मृतिस्थळी केले वंदन
3

Pravin Tarde : ‘पहिली भेट दादांच्या चरणी’; ‘देऊळबंद 2’ सिनेमाचे 100 कोटी पार! अजित पवारांच्या स्मृतिस्थळी केले वंदन

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत
4

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.