Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाचगणीमध्ये पाच लाखांचा अमली पदार्थ जप्त; पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत दहा जण ताब्यात

पाचगणी पोलीस यांनी संयुक्तपणे कारवाई करत कोकेनसारख्या अमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्या दहा जणांना ताब्यात घेतले आहे. पाच लाखांचा माल जप्त करण्यात आला.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 17, 2025 | 05:07 PM
Narcotics worth five lakhs seized in Panchgani joint operation by police and local crime branch

Narcotics worth five lakhs seized in Panchgani joint operation by police and local crime branch

Follow Us
Close
Follow Us:

Crime News : पाचगणी : पाचगणी येथील घाटजाई मंदिराजवळ स्थानिक गुन्हे शाखा आणि पाचगणी पोलीस यांनी संयुक्तपणे कारवाई करत कोकेनसारख्या अमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्या दहा जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून कोकण सदृश्यपदार्थ मोबाईल हँडसेट दोन-चार वाहने असा 42 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .सावरी येथील प्रकरणानंतर लगेचच पाचगणी पोलिसांनी कोकेन सदृश्य पदार्थ पकडल्याने जिल्ह्यात अमली पदार्थांचे नेटवर्क उभे राहत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.

याप्रकरणी मोहम्मद नावेद सलीम परमार (वय 32 राहणार हाजी बिल्डिंग तिसरा मजला रूम नंबर 34 भेंडी बाजार मुंबई), सोहेल हर्षद खान (वय 35 202 दुसरा मजला दीनानाथ बिल्डिंग पीबी मार्क मुंबई), मोहम्मद ओएस रिजवान अन्सारी (वय 32 राहणार गोल दरवाजा शुक्लाज इस्टेट नागपाडा मुंबई),वासिल हमीद खान (31 राहणार बोरी चाळ पहिला मजला नागपाडा मुंबई) ,मोहम्मद साहिल अन्सारी (वय 30 शिलाजी टावर मुंबई सेंट्रल) ,जीशान इरफान शेख (31 मुनसी बिल्डींग पहिला मजला भायखळा मुंबई),सैफ अली कुरेशी (31 हाजी सुलेमान बिल्डिंग दुसरा मजला मज्जिद गल्ली मुंबई),मोहम्मद उबेद सिद्दिकी (वय 27 नवाब आयास ट्रस्ट बिल्डिंग रूम नंबर 216 भेंडी बाजार मुंबई),आली अजगर सादिक राजकोट वाला (वय 30 आशियाना अपार्टमेंट दारुल मोहदा टॉवर नागपाडा मुंबई),राहीद मुक्तार शेख (31 राहणार अरबलेन बोरी बिल्डिंग रूम नंबर 45 ग्रँड रोड मुंबई) या दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हे देखील वाचा : मुंबईमध्ये अजित पवारांचा भाजपला दे धक्का? नाराजीनंतरही नबाव मलिकांकडे दिले नेतृत्व

या प्रकरणामध्ये मोहम्मद नावे परमार हा हिस्टरी शूटर असून त्याच्या माध्यमातून इतर नऊ जण मुंबईवरून पाचगणीत आले होते. परमार हा हिस्ट्री शूटर असून त्याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या ताब्यातील कोकण सदृश्य अमली पदार्थ हा त्यांनी सेवन करण्यासाठी अथवा विक्रीसाठी आणला होता का या दृष्टीने पाचगणी पोलिसांचा तपास सुरू आहे.

पाचगणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना घाटजाई मंदिराजवळ एक संशयित इसम अमली पदार्थ घेऊन आला असल्याची माहिती मिळाली पोलीस अधीक्षक तुषार दोशीयांच्या निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी तात्काळ पवार यांना तपासाच्या सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व पाचगणी पोलीस यांनी घाटजाई मंदिर परिसरात दोन वाहने अडवून त्यामधील इसमांची झडती घेतली. गाडीच्या ड्रायव्हर सीटवर बसलेला इसम हा प्राप्त वर्णन प्रमाणाने आढळून आला. या इसमांची झडती घेतली असता त्यांच्याकडे पाच लाख रुपये किमतीचे कोकण सदृश्य अमली पदार्थ मोबाईल हँडसेट इतर साहित्य व दोन चार चाकी वाहने असा 42 लाख 85000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या इसमांच्या विरोधात एनडीपीएस ऍक्ट कायद्यान्वये संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर करत आहेत .

हे देखील वाचा : कोकाटे कायद्यापेक्षा मोठे आहेत? आमदारकी रद्द करण्यासाठी रोहित पवार उतरले मैदानात

सातारा पोलिसांची यंत्रणा अलर्ट मोडवर

सावरी तालुका जावली येथे मुंबई पोलिसांनी छापा मारून 115 कोटी रुपये किमतीचे 43 किलोमीटर जप्त केले होते .या प्रकरणातील समीर डीजे याला सोडून देण्यात आल्याची चर्चा आहे .इतक्या मोठ्या प्रमाणावर एमडी ड्रग्स ताब्यात घेतल्यानंतर सातारा पोलिसांना त्याची गंधवारता नव्हती अशी माहिती समोर आली आहे .या प्रकरणाची धूळ खाली बसत असतानाच पाचगणी पोलिसांनी संबंधित इसमांकडून कोकण सदृश्य अमली पदार्थ जप्त केले .हे पदार्थ त्यांनी मुंबईतून आणले होते अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे .या प्रकरणाचा मास्टरमाइंड परमार हाच असून त्याने हे पदार्थ सेवनासाठी आणले होते का विक्रीसाठी यादृष्टीने कसून तपास केला जात आहे .या कारवाईत पोलिसामलदार आतिश घाडगे संतोष सपकाळ संजय शिर्के विजय कांबळे शरद बेबले निलेश फडतरे प्रवीण फडतरे विशाल पवार रवींद्र कदम श्रीकांत कांबळे तानाजी शिंदे उमेश लोखंडे अमोल जगताप गोकुळ बोरसे सतीश पवार विनोद पवार ज्योती पोळ यांनी भाग घेतला होता .

Web Title: Narcotics worth five lakhs seized in panchgani joint operation by police and local crime branch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 05:07 PM

Topics:  

  • crime news
  • Maharashtra Police
  • Pachgani

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: कोर्टाचे वॉरंट अन् इकडे Manikrao Kokate यांची तब्येत बिघडली? मंत्रिपद जाणार…
1

Maharashtra Politics: कोर्टाचे वॉरंट अन् इकडे Manikrao Kokate यांची तब्येत बिघडली? मंत्रिपद जाणार…

Land Fraud News: जमीन विक्रीच्या नावाखाली २.८९ कोटींचा गंडा! बीडच्या दोन व्यापाऱ्यांची अशी झाली फसवणूक
2

Land Fraud News: जमीन विक्रीच्या नावाखाली २.८९ कोटींचा गंडा! बीडच्या दोन व्यापाऱ्यांची अशी झाली फसवणूक

पतीच्या प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोन कुटुंबात राडा; महिलांसह अनेकजण जखमी, 14 जणांवर गुन्हा दाखल
3

पतीच्या प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोन कुटुंबात राडा; महिलांसह अनेकजण जखमी, 14 जणांवर गुन्हा दाखल

धक्कादायक ! कलाकेंद्रातील तरुणीवर सामूहिक अत्याचार; पीडितेला जबरदस्तीने लॉजवर नेलं अन्…
4

धक्कादायक ! कलाकेंद्रातील तरुणीवर सामूहिक अत्याचार; पीडितेला जबरदस्तीने लॉजवर नेलं अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.