Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivsena : “संजय राऊत आता भुंकतोय, थोड्या दिवसांनी चावायला लागेल…”, नरेश म्हस्के यांची सडकून टीका

उबाठा पक्षाचं वाटोळं करणारे राऊत मिडियात चर्चेत राहण्यासाठी वेड्यासारखे बरळतात. लवकरच ते फाटक्या कपड्यांमध्ये रस्त्यांवर फिरणार असून नाईलाजाने त्यांना ठाण्याच्या मनोरुग्णालयात दाखल करावं लागेल...

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 11, 2025 | 05:39 PM
"संजय राऊत आता भुंकतोय, थोड्या दिवसांनी चावायला लागेल…", नरेश म्हस्के यांची सडकून टीका (फोटो सौजन्य-X)

"संजय राऊत आता भुंकतोय, थोड्या दिवसांनी चावायला लागेल…", नरेश म्हस्के यांची सडकून टीका (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:

ठाणे : शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेतल्याशिवाय संजय राऊतांना घशाखाली अन्न जात नाही आणि सामनाचा पगार देखील मिळत नाही. राऊत आता भुंकत असून थोड्या दिवसांनी ते चावायला लागतील, अशी सडकून टीका खासदार म्हस्के यांनी केली. उबाठा पक्षाचं वाटोळं करणारे राऊत मिडियात चर्चेत राहण्यासाठी वेड्यासारखे बरळतात. लवकरच ते फाटक्या कपड्यांमध्ये रस्त्यांवर फिरणार असून नाईलाजाने त्यांना ठाण्याच्या मनोरुग्णालयात दाखल करावं लागेल, असा टोला खासदार म्हस्के यांनी केला. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 “मुंबई महानगरपालिकेत फक्त भगवे बसणार…”, नितेश राणेंचं मोठं विधान

खासदार म्हस्के म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयातील याचिकेसंदर्भात वरिष्ठ वकिलांशी चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत गेले होते. देशाचे गृहमंत्री अमित शहा काल दिल्लीत नव्हते. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या भेटीचा प्रश्नच उद्भवत नाही, असे खासदार म्हस्के म्हणाले. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा काल वाढदिवस होता. शिंदे दिल्लीत असल्याने त्यांनी राजनाथ सिंग यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या, असे खासदार म्हस्के म्हणाले.

खासदार राऊत जेव्हा दिल्लीत असतात आणि गटनेत्यांच्या बैठकीला जात नाहीत, तेव्हा ते सोनिया गांधी यांच्या घरची भांडी घासायला, राहुल गांधी यांच्या घरी झाडू मारायला गेले होते, असे म्हणायचे का, अशी खरमरीत टीका खासदार म्हस्के यांनी केली. उबाठाचे पक्ष नेते दिल्लीत सोनिया गांधी यांच्या पाया पडायला जातात का, याचे उत्तर राऊत यांनी द्यावे. राऊत यांनी उबाठा पक्षाचे वाटोळं केलं, अशी टीका खासदार म्हस्के यांनी केली. मातोश्रीचे पावित्र्य उबाठाने नष्ट केलं त्यामुळे गुरुपौर्णिमेला बाळासाहेबांना वंदन करायला लोक मातोश्रीवर फिरकले नाहीत, असे खासदार म्हस्के म्हणाले.

ते पुढे म्हणाले, उबाठाने सत्तेसाठी शिवसेनेचे हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार काँग्रेसच्या दावणीला बांधले. याउलट शिवसेनेने ८० जागा लढवल्या आणि ६० जागांवर विजय मिळवला.हिंदुह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने हा पक्ष पुढे नेण्याचे काम एकनाथ शिंदे करत आहेत. शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनाच खरी आहे यावर महाराष्ट्रातील लोकांनी शिक्कामोर्तब केलंय, असे खासदार म्हस्के यांनी म्हटले आहे. ऑगस्टमध्ये उबाठाला मोठं खिंडार पडेल, असे भाकित खासदार म्हस्के यांनी यावेळी केले. महायुतीत कितीही भांडणं लावण्याचा प्रयत्न केला तरी महायुती अभेद्य आहे, असा पुनरुच्चार खासदार म्हस्के यांनी केला.

Raigad News : चिमुकलीला न्याय मिळणार तरी केव्हा ; खुशबू मृत्यूप्रकरणी पेणमध्ये ठिय्या बेमुदत आंदोलन

Web Title: Naresh mhaske on sanjay raut is barking now soon he will start biting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2025 | 05:39 PM

Topics:  

  • Naresh Mhaske
  • sanjay raut
  • shivsena

संबंधित बातम्या

Maratha Reservation: राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे बंद केल्यानेच जरांगे मुंबईत; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल!
1

Maratha Reservation: राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे बंद केल्यानेच जरांगे मुंबईत; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल!

लंडनमध्ये विराट कोहली थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; क्रिकेटपासून महाराष्ट्राच्या विकासापर्यंत रंगली खास चर्चा!
2

लंडनमध्ये विराट कोहली थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; क्रिकेटपासून महाराष्ट्राच्या विकासापर्यंत रंगली खास चर्चा!

Uday Samant : ‘गटबाजी सोडा, संघटना मजबूत करा; ही शेवटची संधी!’ उदय सामंतांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांना घरचा आहेर
3

Uday Samant : ‘गटबाजी सोडा, संघटना मजबूत करा; ही शेवटची संधी!’ उदय सामंतांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांना घरचा आहेर

Eknath Shinde : लंडनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये एकनाथ शिंदेंचा गौरव; ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणांनी दुमदुमली ब्रिटिश संसद
4

Eknath Shinde : लंडनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये एकनाथ शिंदेंचा गौरव; ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणांनी दुमदुमली ब्रिटिश संसद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.